माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी हवाईदलाचा करार

0
हवाईदलाने ‘डिजीलॉकर’ची सेवा घेण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी परस्पर सामंजस्याचा करार केला.

डिजिलॉकर सुविधा: डिजिटल कायापालटाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल  

दि. २७ एप्रिल: डिजिटल कायापालटाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना हवाईदलाने ‘डिजीलॉकर’ची सेवा घेण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी परस्पर सामंजस्याचा करार केला. हवाईदलाचे मुख्यालय असलेल्या वायू भवनात झालेल्या कार्यक्रमात या करारावर उभय बाजूंनी स्वाक्षरी करण्यात आली. ‘डिजीलॉकर’ हा सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमातील एक प्रमुख उपक्रम आहे. या करारामुळे हवाईदलाला ‘डिजीलॉकर’च्या सुरक्षित आणि सुलभ दस्तावेज भांडार सेवेचा लाभ मिळणार आहे.

‘डिजीलॉकर’च्या सेवेशी जोडून घेतल्यामुळे हवाईदलाच्या सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण दस्तावेज डिजिटल पद्धतीने जारी करण्याच्या, ते उपलब्ध होण्याच्या आणि पडताळणी करण्याच्या पद्धतीत क्रांती घडेल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विदा सुरक्षा (डेटा सुरक्षा), कार्यान्वयन व कार्यक्षमतावृद्धी आणि विनाअडथळा माहिती यासाठी  हवाईदलाला उपयोग होणार आहे.

हवाईदलाने ही सुविधा घेतल्यामुळे हवाईदलाचे विविध विभाग आणि तुकड्या आता डिजीलॉकरचा वापर करून राष्ट्रीय डिजिटल भांडारात (डिपॉझिटरी) विविध दस्तावेज, प्रमाणपत्रे, रेकॉर्डस सुरक्षित जतन व विनाअडथळा अपलोड करू शकतील. तसेच, सेवा प्रमाणपत्र (सीओएस) आणि सेवा पुस्तिका अधिकारी (एसबीओ) या सारख्या महत्त्वपूर्ण दस्तावेजांचा थेट ‘ऍक्सेस’ हवाईदलातील  अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक डिजीलॉकर वॉलेटच्या माध्यमातून करता येईल. त्या मुळे ही दस्तावेज त्यांना अनेकवेळा पाहता येतील व त्यांची पडताळणी शक्य होईल. ‘डिजीलॉकर’मुळे हवाईदलातील अग्निवीर भरतीसह विविध प्रक्रिया सुटसुटीत होतील. तसेच, यामुळे उमेदवाराची शैक्षणिक दस्तऐवज पडताळणी डिजिटल पद्धतीने शक्य होऊन पारदर्शकता आणि विश्वासार्हता वृद्धिंगत होईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

विनय चाटी


Spread the love
Previous articleकारगिल विजय दिन : रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सेल्फी पॉइंटचे अनावरण
Next articleIAF: Digital Transformation With Digilocker Integration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here