दक्षिण विभाग मुख्यालयाच्या ‘कमांड सॉंग’चे अनावरण

0
दक्षिण विभाग
लष्करच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्या कमांड गीताचे (कमांड सॉंग) अनावरण दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग आणि प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी केले.

दि. ०६ मे: लष्करच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्या ‘वंदे माँ भारती’ या कमांड गीताचे (कमांड सॉंग) अनावरण दक्षिण विभाग मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते रविवारी आयोजित एका शानदार समारंभात करण्यात आले.  संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या सामूहिक प्रयत्नातून हे गीत साकारण्यात आले आहे.

प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी हे गीत गायले असून, ब्रिगेडियर बिक्रमजीत सिंग, सुभाष सहगल आणि करण मस्तानायांनी या गीताची रचना केली आहे. तर, संगीत संयोजन रणजीत बारोट यांचे आहे. या गीताचे व्हिडिओ संपादन अतुल चौहान, अवध नारायण सिंह, ब्रिगेडियर बिक्रमजीत, सुभाष सहगल आणि लेफ्टनंट कर्नल संदीप लेघा यांनी केले आहे. ‘प्रत्येक स्वर आणि भाव अतिशय उत्कटतेने आणि सर्जनशीलतेने मांडणारे हे गीत म्हणजे दक्षिण कमांडच्या सामूहिक मुल्ये आणि उत्कृष्टतेच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. परिश्रमपूर्वक संशोधन आणि सातत्यपूर्ण अभिजातता राखत, संगीतकारांनी ऐतिहासिक भान जागवत  सुरांनी ओतप्रोत अशा निनादणाऱ्या स्वरलयी गुंफल्या आहेत ज्या सर्व स्तरावर आणि कुटुंबांमध्ये वैश्विक भावना जागृत करतात.’ असे लेफ्टनंट जनरल सिंग या वेळी म्हणाले. या गीतामुळे लष्कराच्या दक्षिण विभागाचा गौरवशाली वारसा येणाऱ्या पिढ्यांना समजेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

विनय चाटी


Spread the love
Previous articleRussia To Practice Tactical Nuclear Weapon Scenario To Deter West
Next articleProfessional Military Education In India – Quo Vadis?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here