थायलंड आणि कंबोडिया सीमेवरील गोळीबारात 16 जणांचा मृत्यू

0
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात संघर्षात वाढ झाली असून एकमेकांवर तोफगोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. किमान 16 लोकांचा बळी घेणाऱ्या या सीमा संघर्षात तात्काळ शस्त्रसंधीची प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मागणी असूनही, मागील एका दशकातील हा  सर्वात वाईट संघर्ष ठरला.थायलंडच्या सैन्याने उबोन रत्चथानी आणि सुरीन प्रांतांमध्ये पहाटेपासूनच संघर्ष झाल्याची नोंद केली आणि सांगितले की कंबोडियाने तोफा आणि रशियन निर्मित BM-21 रॉकेट प्रणालीचा वापर केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की थाई बाजूच्या संघर्षग्रस्त भागातून 1लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

थायलंड-कंबोडियाचा एकमेकांवर दोषारोप

“कंबोडियन सैन्याने अवजड शस्त्रे, तोफखाना आणि BM-21 रॉकेट सिस्टीमचा वापर करून सतत बॉम्बहल्ला केला आहे,” असे थाई सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.

“थाई सैन्याने सामरिक परिस्थितीनुसार योग्य प्रकारे गोळीबार करून प्रत्युत्तर दिले आहे.”

वादग्रस्त सीमा भागात गुरुवारी संघर्ष सुरू झाल्याबद्दल दोन्ही बाजूंनी एकमेकांना दोष दिला आहे. गेल्या एका शतकाहून अधिक काळ सार्वभौमत्वावर वाद असलेल्या सीमेवर 209 किमी (130 मैल) अंतरावर असलेल्या किमान सहा ठिकाणी लहान शस्त्रांमधून करण्यात आलेल्या गोळीबारापासून तोफांच्या माऱ्यापर्यंत संघर्ष वाढला आहे.

सुरिन प्रांतातील रॉयटर्सच्या पत्रकारांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान क्षेत्रात असणारे रस्ते आणि पेट्रोल पंपांवर सशस्त्र थाई सैनिकांच्या मोठ्या उपस्थितीत अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकल्याचे वृत्त दिले.

सुमारे एक डझन ट्रक, चिलखती वाहने आणि रणगाड्यांसह एक थाई लष्करी काफिला भातशेतींनी वेढलेले महामार्ग ओलांडून सीमेकडे सरकला.

थायलंडने आदल्या रात्री नोम पेन्ह येथील आपल्या राजदूताला परत बोलावून घेतले आणि कंबोडियाच्या राजदूताची हकालपट्टी केली. बँकॉकने अलीकडेच प्रतिस्पर्धी सैन्याने टाकल्याचा आरोप केलेल्या भूसुरुंगामुळे दुसऱ्या थाई सैनिकाचा एक अवयव गमावल्याच्या प्रत्युत्तरादाखल काही तासांतच गुरुवारी लढाई सुरू झाली. कंबोडियाने हे वृत्त निराधार म्हणून फेटाळले आहे.

मृत्यूची संख्या वाढली

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, थाई मृतांची संख्या शुक्रवारी पहाटेपर्यंत 15 वर पोहोचली, त्यापैकी 14 नागरिक आहेत. याशिवाय 15 सैनिकांसह 46 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

कंबोडियाच्या सरकारने कोणत्याही जीवितहानीचा किंवा काती नागरिकांना स्थलांतरित केला याबाबतचा कोणताही तपशील दिलेला नाही. अलीकडील संघर्षांवर भाष्य करण्याच्या विनंतीला सरकारी प्रवक्त्याने त्वरित प्रतिसाद दिला नाही.

कंबोडियाच्या ओड्डर मीन्चे प्रांताच्या प्रांतीय प्रशासनाचे प्रवक्ते मेथ मीस फेकडे यांनी सांगितले की, एक नागरिक ठार झाला आहे तर पाचजण जखमी झाले आहेत. याशिवाय दीड हजार कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

F-16 जेट्स

थायलंडने गुरुवारी दुर्मिळ लढाऊ तैनातीत सहा F-16 लढाऊ विमाने तैनात केली होती, त्यापैकी एक कंबोडियन लष्करी लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी तैनात करण्यात आले होते, कंबोडियाने या प्रकाराला “बेपर्वा आणि क्रूर लष्करी आक्रमकता” असे म्हटले आहे.

लंडनस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या मते, थायलंडने कंबोडियावर हल्ला करण्यासाठी  F-16 चा वापर केल्याने त्याचा लष्करी फायदा अधोरेखित होतो. कारण कंबोडियाकडे लढाऊ विमाने नाहीत. याशिवाय संरक्षण उपकरणे तसेच कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी आहेत.

थायलंडचा दीर्घकालीन करार मित्र असलेल्या अमेरिकेने “संघर्ष समाप्ती, नागरिकांचे संरक्षण आणि शांततापूर्ण तोडगा” अशी मागणी केली आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम जे असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्सचे अध्यक्ष असून ज्याचे थायलंड आणि कंबोडिया सदस्य आहेत, त्यांनी सांगितले की आपण दोन्ही देशांच्या नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

“बँकॉक आणि नोम पेन्ह या दोघांनी या मार्गाचा विचार करण्यासाठी दाखवलेल्या सकारात्मक संकेतांचे आणि इच्छेचे मी स्वागत करतो. आसियान एकता आणि सामायिक जबाबदारीच्या भावनेने या प्रक्रियेला मदत आणि सुविधा देण्यासाठी मलेशिया तयार आहे,” असे त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia-UK Vision 2035: Paving Way for Strategic Ties in Technology and Defence
Next articleDRDO Successfully Test-Fires Drone-Launched Precision Missile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here