संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली. याशिवाय मेम्फिस, टेनेसी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी गेल्या दशकभरातील भारताची विकासगाथा आणि आश्वासक भविष्यासह अमाप क्षमता याकडे लक्ष वेधले आणि भारतीय समुदाय हा भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढते संबंध आणि सौहार्द सांधणारा ‘जिवंत सेतू ‘ असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.
मेम्फिस, अटलांटा, नॅशविल आणि आसपासच्या परिसरातील भारतीय समुदायाशी संवाद साधताना, राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाच्या कामगिरीचे, समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेत ते देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की सिंह यांनी भारतीय समुदायाचा उल्लेख भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘जिवंत सेतू’ म्हणून केला, ज्यामुळे उभय देशांमधील घनिष्ट संबंध आणि सद्भावना वाढीला लागली. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या दशकातील भारताच्या विकासावर प्रकाश टाकला आणि त्याच्या आशादायक भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला.
Wrapping up his US visit, Raksha Mantri Shri @rajnathsingh visited National Civil Rights Museum and interacted with Indian community in Memphis, Tennessee. He termed the #IndianDiaspora as a living bridge between India & US. #IndiaUSPartnership
More: https://t.co/CjH7FqOySa pic.twitter.com/9JqFHnjh2L
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) August 26, 2024
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाजवळ महात्मा गांधींच्या जीवनावरील प्रदर्शन उभारण्यातआणि सिग्नलजवळ दोन मार्गांचे सन्मानाचे ‘गांधी वे’ म्हणून नामकरण करण्यासाठी भारतीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे संरक्षण मंत्री सिंह यांनी कौतुक केले. राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला दिलेल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले, “अमेरिकेतील 17व्या शतकापासून ते आतापर्यंतचा नागरी हक्क चळवळीचा इतिहास येथे मांडण्यात आला आहे. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची 1968 मध्ये ज्या ठिकाणी हत्या झाली होती, त्याभोवती हे संग्रहालय बांधण्यात आले आहे. अहिंसात्मक संघर्षासाठी प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळाही या ठिकाणी आहे, जो अहिंसक संघर्षावरील त्यांच्या प्रभावाची कबुली देतो,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
टीम भारतशक्ती