चीनच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर आपल्या परीने मात करण्यासाठी पिझ्झा हट या फास्ट फूडमधील दिग्गज कंपनीने आपल्या आऊटलेट्समधून ग्राहकांच्या आवडीच्या पदार्थांच्या स्वस्त पण छोट्या आवृत्त्या उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे खाण्यावर कमी पैसे खर्च करणाऱ्यांसाठी ही आऊटलेट्स आकर्षणाची ठिकाणे ठरण्याची शक्यता आहे. हीच रणनीती त्यांची पालक कंपनी यम चायना इतर ब्रँडसाठीदेखील वापरत आहे.
शेनझेनच्या अतिशय व्यस्त अशा बाओ एन जिल्ह्यात अलीकडेच उघडण्यात आलेल्या पिझ्झा हट वॉव स्टोअरच्या बाहेर दुपारच्या जेवणाच्या वेळी ग्राहकांची एक छोटी रांग लागते. 29 युआनमध्ये (4 अमेरिकन डॉलर) लहान पॅपरोनी पिझ्झा, सुमारे 15 युआनमध्ये पास्ता आणि 35 युआनमध्ये एक स्टीक यासारखे पदार्थ या आऊटलेटमध्ये उपलब्ध असतात. या सर्वांची किंमत पारंपरिक पिझ्झा हट रेस्टॉरंटच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे.
चीनचा केटरिंग उद्योग सध्या खूप स्पर्धात्मक आहे, परंतु आम्ही नाविन्यपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे पिझ्झा हट वॉवच्या प्रवक्त्याने सांगितले.
“पिझ्झा हटची सुरूवात झाली तेव्हा संपूर्ण कुटुंब पिझ्झाची आनंद घेऊ शकेल अशी त्यामागची कल्पना होती. आता मात्र अशा प्रकारचे आऊटलेट हे एकल व्यक्तीची भूक भागवण्यासाठी ओळखले जात आहे, (जसे की तपसाच्या आकाराची – स्पॅनिश भाषेत स्नॅक्स सर्व्ह केली जाणारी – लहान प्लेट)
पहिले पिझ्झा हट वॉव आऊटलेट मे महिन्यात ग्वांगझोऊ येथे उघडले गेले आणि आता त्यांची देशभरात 100हून अधिक आऊटलेट्स आहेत. वर्षअखेरीस 200चे लक्ष्य गाठण्याचा विचार आहे, असे यम चायनाने सांगितले.
यम चायना कंपनी सध्या केएफसीच्या 10 हजार 931 आणि 3 हजार 504 पिझ्झा हट आऊटलेट्सचा कारभार सांभाळत आहे. केएफसीसाठी लहान आऊटलेट्सचा प्रयोग सध्या ती करत आहे आणि चीनमधील कमी किंमतीच्या कॉफीच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी अधिकाधिक केकॉफे (KCOFFEE) किऑस्क सुरू करत आहे.
नुकत्याच मिळालेल्या या भरघोस यशानंतर विश्लेषकांशी झालेल्या संभाषणादरम्यान, यम चायनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय वॉट म्हणाले की पिझ्झा हट वॉव आणि केकॉफेने “भविष्यात या व्यवसायाला किती मोठा वाव आहे हे दाखवून दिलेआहे.”
अन्न आणि पेयाचे स्वतंत्र अभ्यासक झू डॅनपेंग यांच्या मते, यम चायना-संचालित केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स सारखे मोठे साखळी उद्योग, ज्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या चायना व्यवसायाचा मोठा हिस्सा परत विकत घेतला होता, ते सध्याच्या कमी किमतीच्या वातावरणात अधिकाधिक नफा कमवण्याच्या सर्वोत्तम स्थितीत आहेत.
ते म्हणाले, “पिझ्झा हटने सध्या किंमती इतक्या कमी केल्या आहेत ज्यांचा त्यांनी याआधी कधीही विचार केला नव्हता, पण मला वाटते की हे करणे अधिक योग्य आहे”.
“जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकणारा व्यवसाय अत्यंत किफायतशीर ठरेल. फक्त त्याची पुरवठा साखळी अतिशय दमदार असली पाहिजे. जर तुम्ही मोठी कंपनी नसाल तर तुमच्याकडे ही साधने नसतील,” असे निरीक्षण त्यांनी मांडले.
“जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकणारा व्यवसाय अत्यंत किफायतशीर ठरेल. फक्त त्याची पुरवठा साखळी अतिशय दमदार असली पाहिजे. जर तुम्ही मोठी कंपनी नसाल तर तुमच्याकडे ही साधने नसतील,” असे निरीक्षण त्यांनी मांडले.
2022च्या उत्तरार्धात कठोर कोविड निर्बंधांच्या समाप्तीमुळे संपूर्ण चीनमधील उपाहारगृह मालकांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांना ही आशा होती की यामुळे व्यवसाय पुन्हा उसळी घेईल. मात्र 18 महिन्यांनंतरही नोकरीची अनिश्चितता, घसरलेली अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या मंदावलेल्या क्रयशक्तीचा या क्षेत्राला जोरदार फटका बसला आहे.
बीजिंग स्टॅटिस्टिक्स ब्युरोच्या मते, रेस्टॉरंट्ससह शहराच्या कॅटरिंग व्यवसाय क्षेत्रातील नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2024च्या पहिल्या सहामाहीत 88 टक्क्यांनी कमी झाला आहे. शांघायमध्ये, आतिथ्य उद्योगासाठीचा महसूल, ज्यात रेस्टॉरंट्चादेखील समावेश आहे, तो वर्षागणिक 2.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय एकूणच हा व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक खर्चही तोट्याकडे झुकणारा आहे.
गेल्या आठवड्यात, दिग्गज तैवानी डंपलिंग साखळी आऊटलेट्स दिन ताई फंग यांनी जाहीर केले की ते मेनलॅण्ड चायनामधील डझनहून अधिक आउटलेट बंद करणार आहेत. कॅटरिंग इंडस्ट्री न्यूज आउटलेट कँगुआंजूच्या मते, जर ही आऊटलेट्स बंद झाली तर 2025च्या पहिल्या सहामाहीत देशभरातील एक दशलक्षाहून अधिक खाद्य आणि पेय दुकाने बंद होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)