लेबनॉनबरोबरच्या संघर्षात आणखी वाढ झाली तर सीमेच्या दोन्ही बाजूंकडील नागरिकांना घरी परतणे कठीण होईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी इस्रायल सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
जागतिक आवाहनानंतरही इस्त्रायलने गुरुवारी हिजबुल्लाहसोबत युद्धविराम करण्याचे नाकारले. यासंदर्भात इस्रायलने अमेरिका या आपल्या सर्वात मोठ्या सहकारी देशाचे मतही धुडकावून लावले आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात लेबनॉनमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिक मारले जाण्याची आणि प्रादेशिक युद्धाची शक्यता वाढली आहे.
इस्रायलचा नकार असूनही, अमेरिका आणि फ्रान्सने बुधवारी प्रस्तावित केलेल्या तात्काळ 21 दिवसांच्या युद्धविरामाच्या शक्यता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीबरोबर समांतर अशा वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले.
ब्लिंकन आणि इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर यांच्यातील चर्चेचा संदर्भ देत परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “सचिवांनी इस्रायल-लेबनॉन सीमेवर 21 दिवसांच्या युद्धबंदी करार करण्याच्या महत्त्वावर चर्चा केली.”
संघर्ष आणखी वाढल्याने फक्त आणि फक्त (नागरिकांच्या परतण्याचे) उद्दिष्ट अधिक कठीण होईल, असेही ते म्हणाले.
मानवतावादी साहाय्यात सुधारणा
परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की ब्लिंकन यांनी गाझामध्ये युद्धबंदीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांबाबत तसेच जवळजवळ संपूर्ण 23 लाख लोकसंख्या विस्थापित झालेल्या आणि उपासमारीचे संकट असलेल्या एन्क्लेव्हमध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने काय सुधारणा करता येतील यासंदर्भात इस्रायलने सुरू केलेल्या प्रयत्नांवरदेखील चर्चा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 31 मे रोजी गाझासाठी तीन टप्प्यांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला, परंतु हा प्रस्ताव अनेक कारणांमुळे प्रत्यक्षात आलेला नाही. गाझाच्या इजिप्तकडील सीमेवरील फिलाडेल्फी कॉरिडॉरमध्ये आपली उपस्थिती कायम ठेवण्याची इस्रायलची मागणी तसेच इस्रायली ओलिस आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या देवाणघेवाणीबद्दलचा तपशील ही हा प्रस्ताव रखडण्यामागची मुख्य कारणे आहेत.
अलीकडच्या काळात इस्रायली हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचा बळी गेलेल्या लेबनॉनसोबतच्या संघर्षात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेला वाढत्या जागतिक आणि देशांतर्गत टीकेचा सामना करावा लागला आहे.
अमेरिकेकडून कोणताही दबाव नाही?
युद्धबंदीचे आवाहन इस्रायलने स्वीकारावे यासाठी आपण केलेल्या मदतीची जाणीव करून देत अमेरिकेने दबाव आणलेला नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत.
पॅलेस्टाईनच्या हमास अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला करून 1हजार 200 लोकांना ठार केले तर आणि सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवल्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षातील ताज्या युद्धाला 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरुवात झाली. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर इस्रायलने गाझावर केलेल्या लष्करी हल्ल्यात 41हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स