पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गतिरोध दूर करण्यासाठी चीन आणि भारताने त्यांच्यातील मतभेद कमी करणे तसेच वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्याबाबत एकमत साधण्याच्या दिशेने प्रगती केल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. शक्य तितक्या लवकर परस्परांना मंजूर होईल असा स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली आहे.
याच संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या आशियाई व्यवहार विभागाचे महासंचालक ली जिनसोंग आणि चीनमधील भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत यांच्यात नुकतीच एक बैठक झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले.
राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झिआओगांग यांनी सांगितले की, या बैठकीनंतर चीन आणि भारत दोघेही चर्चेद्वारे, “एकमेकांच्या योग्य असणाऱ्या चिंता समजून घेण्यासाठी संवाद आणखी मजबूत करण्यासाठी सहमती दर्शविण्याव्यतिरिक्त मतभेद कमी करून काही एकमत निर्माण करू शकले.”
“दोन्ही देशांना मान्य असलेल्या तारखेपर्यंत तोडगा काढण्यासाठी आम्ही सहमती दर्शवली,” असेही ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिकांचा पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील काही गस्त केंद्रांवरचा प्रवेश एकतर चिनी सैन्याने किंवा विशिष्ट फ्रिक्शन पॉईंटवरून माघार घेण्याच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या बफर झोनच्या अंमलबजावणीमुळे रोखला होता. ते लवकरच त्या त्या ठिकाणी परत येऊ शकतात.
बीजिंगमध्ये, राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झिआओगांग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या संबंधित नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चीन आणि भारताने राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला आहे. यात दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यातील चर्चा आणि सीमावाद संदर्भात सल्लामसलतीद्वारे होणारी चर्चा यांचा समावेश आहे.
पूर्व लडाखमधील चार वर्षांहून अधिक काळ चाललेला लष्करी स्टॅण्डऑफ संपुष्टात आणण्यासाठी उर्वरित फ्रॅक्चर पॉइंटपासून, विशेषतः डेमचोक आणि देपसांग येथून माघार घेण्याबाबत दोन्ही देशांमधील चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
झांग यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठकीचा तसेच वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात रशियामध्ये नुकत्याच झालेल्या ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचा उल्लेख केला.
झांग यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठकीचा तसेच वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात रशियामध्ये नुकत्याच झालेल्या ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीचा उल्लेख केला.
परस्पर सहमतीच्या आधारे दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेण्यासाठी कालमर्यादेसह तपशील तयार करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर लष्करी चर्चेची 22 वी फेरी लवकरच होण्याची अपेक्षा आहे. सध्या, एलएसीवर तैनात केलेले सैन्य डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. मात्र चर्चेच्या फेऱ्यांवर परिणाम होऊ शकेल आणि सैन्यमाघारीच्या योजनांमध्ये अडथळा आणू शकेल असे कोणतेही संघर्ष टाळण्याकडे दोघांचाही कल आहे. परस्पर सहकार्य वाढवण्याचा एक उपाय म्हणून, दोन्ही बाजूंचे स्थानिक सैन्याधिकारीही संघर्ष टाळण्यासाठी बैठक घेत आहेत.
टीम भारतशक्ती