अनेक बदलांचे साक्षीदार नवे हवाई दल प्रमुख होणार आहेत. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी भारतीय हवाई दलाची सूत्रे हाती घेतली आहेत. नवीन प्रमुखांनी मावळते हवाई दल प्रमुख मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडून काल पदभार स्वीकारला. भारतीय हवाई दल परिचालन आणि संरचनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवरील मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. एअर चीफ मार्शल सिंग यांनी आतापर्यंत हवाई दलात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आयएएफला बहुआयामी आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच भविष्यात सक्षम, सुसज्ज दलाच्या निर्मितीसाठी त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
सेंट्रल एअर कमांडचे माजी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केलेल्या सिंग यांनी हवाई दलाच्या मुख्यालयात पीएसओः ऑपरेशन्स तसेच ईस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणूनही काम केले आहे. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तीव्र संघर्षाच्या काळात ते ईस्टर्न एअर कमांडमध्ये कार्यरत होते. याच काळात ईस्टर्न एअर कमांडमध्ये राफेल विमानांचाही समावेश करण्यात आला. एअर मार्शल सिंग यांनी भारतीय हवाई दलाच्या 2 एअर डिफेन्स सेंटर आणि 15 विंग्जचे नेतृत्वही केले आहे.
सध्या हवाई दलासमोरील सर्वात मोठ्या आणि प्रलंबित आव्हानांपैकी एक आव्हान आहे ते लढाऊ स्क्वाड्रनची घटणारी संख्या आणि ताकद. भारतीय हवाई दलाने तेजस मार्क-1ए लढाऊ विमानाची मोठी मागणी नोंदवली असली तरी अतिरिक्त 180 विमानांची मागणी 2030 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. आयएएफला 114 एमआरएफएच्या खरेदीचा वेग वाढवावा लागेल, ज्यामुळे 6 स्क्वॉड्रन सुसज्ज होतील. भारतीय हवाई दलातून मिग-21 बिसन्सची दोन स्क्वाड्रन आणि जॅग्वार डीप पेनिट्रेशन स्ट्राइक विमानाची तीन स्क्वाड्रन निवृत्त केली जातील अशी अपेक्षा आहे.
एक यशस्वी उड्डाणवीर अशी ओळख असणाऱ्या एअर मार्शल सिंग यांच्याकडे 5हजारहून अधिक उड्डाण तासांचा अनुभव असून ते एक अर्हताप्राप्त उड्डाण प्रशिक्षक आहेत. मॉस्को येथील मिग-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व करण्यासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (एचएएल) 2026 मध्ये तेजस एमके 2 चा पहिला नमुना सादर केला जाईल. विमान आणि प्रणाली चाचणी आस्थापनेकडून (एएसटीई) या विमानाची चाचणी घेईल. सिंग यांनी एएसटीईमध्ये मुख्य चाचणी पायलट म्हणून काम केलेले आहे. याशिवाय ते तेजस या लढाऊ विमानाच्या चाचणीचे प्रकल्प संचालक होते.
संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेशी निगडीत महत्त्वाच्या पैलूंशी संबंधित त्यांच्या अनुभवांमुळे या दशकाच्या अखेरीस भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल होणाऱ्या या आश्वासक नवीन विमानाच्या चाचण्या कशा व्यवस्थित पार पडतील याकडे ते जातीने लक्ष देऊ शकतील. आयएएफ आणि डीआरडीओ हे संयुक्तपणे आयएएफसाठी पुढील पिढीतील लढाऊ विमान, प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) देखील तयार करत आहेत.
संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेशी निगडीत महत्त्वाच्या पैलूंशी संबंधित त्यांच्या अनुभवांमुळे या दशकाच्या अखेरीस भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल होणाऱ्या या आश्वासक नवीन विमानाच्या चाचण्या कशा व्यवस्थित पार पडतील याकडे ते जातीने लक्ष देऊ शकतील. आयएएफ आणि डीआरडीओ हे संयुक्तपणे आयएएफसाठी पुढील पिढीतील लढाऊ विमान, प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) देखील तयार करत आहेत.
आयएएफसाठी मध्यम वाहतूक विमानाची (एमटीए) खरेदी करणे ही आणखी एक मोठी गरज आहे. ही 40-80 वाहतूक विमाने हवाई दलाच्या वाहतूक ताफ्याचा कणा बनतील. हवाई दलाने यासाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन केली होती, मात्र त्यासाठी अजूनही रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) जारी करण्यात आलेले नाही. हवाई दलात 56 एव्हरो-748 ची जागा एअरबस सी-295 घेत आहे. आयएएफमधील 105 एएन-32पैकी काही विमानांची जागा एअरबस प्लॅटफॉर्म घेण्याची शक्यता आहे कारण ते या दोन्ही विमानांपेक्षा अधिक पेलोड क्षमता प्रदान करते. एएन-32 सध्या हवाई दलाद्वारे अपग्रेड करण्यात येत आहेत.
हवाई दलाची कामगिरी उत्तम ठेवण्याव्यतिरिक्त, नवीन हवाई दल प्रमुखांनी अशा वेळी दलाची धुरा स्वीकारली आहे जेव्हा केवळ हवाई दलातच नव्हे तर संपूर्ण सशस्त्र दलांमध्ये त्यांच्या परिचालन संरचनेच्या बाबतीत मोठे बदल घडून येत आहेत. या बदलांपैकी सर्वात मोठा बदल म्हणजे सशस्त्र दलांचे थिएटरायझेशन. आयएएफच्या बाजूने थिएटरायझेशनचे बहुतांश पायाभूत काम नवीन हवाई दलाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले जाईल.
वेपन्स सिस्टीम्सची शाखा सुरू झाल्यानंतर पदभार स्वीकारणारे एअर चीफ मार्शल सिंग हे पहिले आयएएफ प्रमुख असतील. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली भारतीय हवाई दलाची ही पहिली नवीन शाखा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हवाई दल अकादमीमध्ये वेपन्स सिस्टीम्स स्कूल सुरू करण्यात आली. शाखा तिच्या प्राथमिक अवस्थेत आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, यूएव्ही ऑपरेशन्स आणि बहु-कर्मचारी लढाऊ विमानांसाठी शस्त्र प्रणाली अधिकारी यासारख्या वेगळ्या भूमिका मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नातून ही शाखा उभारण्यात आली होती आणि संभाव्यतः या हवाई दलाला मानवरहित विंगमन हाताळण्याची गरज भासू शकते.
ही नवीन शाखा कदाचित आयएएफमधील बदलांची सर्वात मोठी सुरूवात आहे. हवाई दल लवकरच घातक, प्रिडेटर ड्रोन आणि कॉम्बॅट एअर टीमिंग सिस्टम (सीएटीएस) मानवरहित विमाने खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे. या महत्त्वाच्या कार्यकाळात या प्रणालींचे हवाई दलात एकत्रीकरण कसे केले जाईल हे ठरविण्यासाठी अनेक गोष्टींची पहिल्यांदाच सुरूवात केली जाईल.
याशिवाय अग्निवीरांना आपल्या सेवेत अधिक चांगल्या प्रकारे समाविष्ट करण्याची भारतीय हवाई दल योजना आखत असून तिच्या इतर सेवांसह या योजनेचा आढावा घेण्यात येईल. सध्या कार्यरत असणाऱ्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर या सगळ्याचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले आहे. नवीन प्रमुख हे हवाई दलातील अग्निवीरांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील, कारण यातलेच काही अग्निवीर नंतर सशस्त्र दलात सामील होतील.
ध्रुव यादव