टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी अनेक जागतिक उच्च-प्रोफाइल व्यवसायांचे अधिग्रहण करत जागतिक मंचावर एक स्थिर आणि विस्तृत भारतीय समूह नेवून ठेवला.
अध्यक्ष म्हणून 20 वर्षांहून अधिक काळ समूह चालवणाऱ्या 86 वर्षीय या दिग्गज उद्योगपतींचे जगभरात चाहते होते.
टाटा समूहाने बुधवारी रात्री उशीरा एका निवेदनाद्वारे रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
“रतन नवल टाटा यांना आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने निरोप देत आहोत. त्यांच्या जाण्याने समूहाची अपरिमित हानी झाली आहे. ते खरोखरच एक असामान्य नेते होते, ज्यांच्या अतुलनीय योगदानाने केवळ टाटा समूहालाच नव्हे तर आपल्या देशाच्या संरचनेला देखील आकार दिला आहे,” अशा शब्दांमध्ये टाटा समूहाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या, “रतन टाटा यांच्या दुःखद निधनामुळे, भारताने एक आदर्श गमावला आहे ज्याने कॉर्पोरेट विकास तसेच राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टता, नैतिकता यांचे मिश्रण केले.”
“पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांनी सन्मानित रतन टाटा यांनी महान टाटा समूहाचा वारसा पुढे नेला आणि त्याला अधिक प्रभावी जागतिक ओळख दिली.”
“त्यांनी अनुभवी व्यावसायिक आणि तरुण विद्यार्थ्यांना प्रेरित केले. परोपकार आणि धर्मादाय कार्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे “, असे राष्ट्रपती आपल्या शोक संदेशात म्हणाल्या.
उपराष्ट्रपतींचा शोक संदेश
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “रतन टाटा यांच्या निधनामुळे आपल्याला खूप दुःख झाले आहे.”
उपराष्ट्रपतींनी टाटा यांचे वर्णन भारतीय उद्योगातील एक उच्च व्यक्तिमत्व असे केले.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी टाटा यांचे योगदान भारतातील आणि त्यापलीकडच्या उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली
रतन टाटा हे एक दूरदर्शी व्यावसायिक नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया मंचावर म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “त्यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत.”
टाटांचा परिवार आणि करिअर
1937 मध्ये जन्म झालेले रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. कॉर्नेल विद्यापीठातून स्थापत्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ते भारतात परतले. 1962 मध्ये, त्यांच्या पणजोबांनी सुमारे एक शतकापूर्वी स्थापन केलेल्या समूहासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
त्यांनी टेल्को, आता टाटा मोटर्स लिमिटेड आणि टाटा स्टील लिमिटेड यासह अनेक टाटाच्या कंपन्यांमध्ये काम केले.
याशिवाय कंपन्यांना झालेला तोटा मिटवून तसेच नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या समूहाचा शेअर मार्केट मधील वाटा वाढवून आपला ठसा उमटवला.
1991 मध्ये काका जे. आर. डी. टाटा यांनी राजीनामा दिल्यानंतर रतन टाटा यांनी संपूर्ण समूहाची धुरा सांभाळली.
टाटा परवानाधारक पायलट होते
टाटा यांच्याकडे विमान चालवण्यासाठी आवश्यक लायसन्स होते. अधूनमधून ते कंपनीचे विमान स्वतः चालवायचे. ते त्यांच्या शांत वागणुकीसाठी, तुलनेने विनम्र जीवनशैली आणि परोपकारी कार्यासाठी ओळखले जात होते. रतन टाटा यांनी कधीही लग्न केले नाही.
व्यावसायिक यशोगाथा
त्यांच्या पहिल्या निर्णयांपैकी एका निर्णयाद्वारे रतन टाटांनी टाटा समूहाच्या अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांच्या काही प्रमुखांचे कामकाज नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी टाटा समूहात निवृत्तीचे वय लागू केले, तरुण सहकाऱ्यांना वरिष्ठ पदांवर बढती दिली आणि कंपन्यांवरील नियंत्रण वाढवले.
व्यवसाय विस्तार
त्यांनी 1996 मध्ये टाटा टेलीसर्व्हिसेसच्या दूरसंचार कंपनीची स्थापना केली तर 2004 मध्ये अत्यंत नफ्यात चालणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती तंत्रज्ञान कंपनी सार्वजनिक केली.
या समूहाने 2000 साली ब्रिटिश चहा कंपनी टेटली 43 कोटी 20 लाख डॉलरला तर 2007 साली अँग्लो-डच पोलाद उत्पादक कंपनी कोरस 13 अब्ज डॉलरला विकत घेतल्या. त्या वेळी एका भारतीय कंपनीने परदेशी कंपनीचे केलेले अधिग्रहण सर्वात मोठे होते.
त्यानंतर टाटा मोटर्सने 2008 मध्ये फोर्ड मोटर कंपनीकडून जॅग्वार आणि लँड रोव्हर या ब्रिटीश लक्झरी ऑटो ब्रँडची 2.3 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली.
टाटा मोटर्सचे पेट प्रोजेक्ट्स
टाटा मोटर्समधील त्यांच्या पेट प्रोजेक्ट्समध्ये इंडिका या भारतात डिझाइन केलेले आणि तयार केलेले पहिले कार मॉडेल आणि नॅनो यांचा समावेश होता.
नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त कार तर होतीच, शिवाय भारतीय जनतेला परवडणारी कार उपलब्ध करून देण्याच्या टाटांच्या स्वप्नाचाही तो कळसाध्याय होता.
फक्त 1लाख रुपये (सुमारे 1,200 अमेरिकन डॉलर) किंमत असलेल्या नॅनोला सुरुवातीला सुरक्षाविषयक समस्या आणि मार्केटिंगमधील गोंधळामुळे मोठा फटका बसला.
त्यामुळे लॉन्च झाल्यानंतर अवघ्या एका दशकानंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला.
मात्र त्याने दोन्ही मॉडेल्ससाठी प्रारंभिक स्केचेस बनवण्याचे मोठे योगदान दिले.
इंडिकाने मोठे व्यावसायिक यश मिळाले.
याशिवाय समूहाची मालकी असलेली कंपनी म्हणजे टाटा सन्सच्या समभाग भांडवलापैकी सुमारे दोन तृतीयांश भाग धर्मादाय संस्थांकडे आहे.
टाटांचे नेतृत्वगुण
टाटामधील त्यांचे नेतृत्वाखाली विविध वाद निर्माण झाले. सर्वात उल्लेखनीय प्रकरण म्हणजे कंपनीने 2016 मध्ये अब्जाधीश शापूरजी पालनजी घराण्याचे वंशज सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर निर्माण झालेला वाद तीव्रपणे सार्वजनिक होत गेला.
खराब कामगिरी करणाऱ्या व्यवसायात आवश्यक ते बदल करण्यात मिस्त्री अपयशी ठरले आहेत, असे टाटा समूहाने त्यावेळी म्हटले होते.
तर मिस्त्री यांनी रतन टाटा, जे या समूहाचे मानद अध्यक्ष होते, त्यांच्यावर दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आणि समूहात पर्यायी सत्ता केंद्र निर्माण केल्याचा आरोप केला होता.
विविध स्टार्ट अप्समधील गुंतवणूक
टाटा समूहातून पायउतार झाल्यानंतर रतन टाटा भारतीय स्टार्टअप्समधील एक प्रमुख गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाऊ लागले.
डिजिटल देयक कंपनी पेटीएम, ओला इलेक्ट्रिक आणि अर्बन कंपनीसह अनेक कंपन्यांना त्यांनी पाठिंबा दिला.
भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
त्यांच्या मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी 2008 मध्ये व्यापार आणि उद्योगातील अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला.
प्राण्यांसाठी, विशेषतः कुत्र्यांसाठी त्यांनी खूप काम केले. टाटा समूहाच्या मुख्यालयात, पावसाळ्यात भटक्या कुत्र्यांना आश्रय देण्याची प्रसिद्ध परंपरा त्यांनी सुरू केली.
रतन टाटांकडे टिटो आणि मॅक्सिमस हे दोन पाळीव कुत्रे होते आणि त्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.
रतन टाटा यांना भारतशक्ती समूहाकडून विनम्र आदरांजली.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)