सीरियन गृहयुद्धात अल-कायदाचा कमांडर म्हणून अबू मोहम्मद अल-गोलानीला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांचा गट राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याशी लढणारा सर्वात शक्तिशाली गट बनला तेव्हाही त्यानी प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत केले. आज, तो सीरियाच्या विजयी बंडखोरांपैकी सर्वात जास्त ओळखला जाणारा बंडखोर बनला आहे. 2016 मध्ये अल कायदाशी संबंध तोडल्यापासून त्याने हळूहळू प्रसिद्धी मिळवली आहे.
त्याने आपल्या गटाची पुनर्रचना केली बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य सीरियाचा वास्तविक शासक म्हणून त्याने आपली ओळख बनवली आहे. पूर्वी नुसरा फ्रंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलानीच्या हयात ताहरिर अल-शामच्या (एचटीएस) नेतृत्वाखालील बंडखोरांनी देशभरात धुमाकूळ घातला आणि राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर रविवारी त्यांनी असाद यांची सत्ता पालटवून दिल्याचे जाहीर केले आणि हा बदल दिसून आला.
गोलानीने दमास्कस ताब्यात घेत असताना दीर्घकाळापासून जिहादींना घाबरत असलेल्या सीरियन अल्पसंख्याकांना आश्वस्त करण्याच्या उद्देशाने संदेश प्रसारित केला आहे.
“भविष्य आपले आहे,” असे त्याने सीरियाच्या सरकारी दूरचित्रवाणीवर वाचलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच निवेदनात त्याने ज्यांनी शस्रांचा त्याग केला आहे अशांना इजा न करण्याचे आपल्या सैनिकांना आवाहन केले आहे.
युद्धपूर्व सीरियाच्या सर्वात मोठ्या शहर अलेप्पोमध्ये बंडखोरांनी दमास्कसच्याआधी प्रवेश केला, तेव्हा एका व्हिडिओमध्ये गोलानी लष्करी पोशाखात दूरध्वनीवरून आदेश देत असल्याचे दिसून आले. त्याने बंडखोरांना नागरिकांचे संरक्षण करण्याची आणि त्यांना घरात प्रवेश करण्यास मनाई करण्याची आठवण करून दिली. सीरियन क्रांतीचा झेंडा फडकवणाऱ्या लढवय्या सैनिकासह त्याने अलेप्पोच्या किल्ल्याला भेट दिली.
धर्मत्यागाचे प्रतीक म्हणून नुसराने एकेकाळी ध्वज टाळला होता परंतु अलीकडेच सीरियाच्या मुख्य प्रवाहातील विरोधाला होकार देत गोलानीने तो स्वीकारला होता. “गोलानी असदपेक्षा हुशार आहे. तो पुन्हा तयार झाला आहे, त्याने गटाची पुनर्रचना केली आहे, नवे मित्र बनवले आहेत, आणि अल्पसंख्याकांबद्दल असणाऱ्या त्याच्या आक्षेपार्हतेसह तो नव्याने सज्ज झाला आहे,” असे ओक्लाहोमा विद्यापीठातील सीरिया तज्ञ जोशुआ लँडिस म्हणाले.
गोलानी आणि नुसरा आघाडी हे बंडखोर गटांपैकी सर्वात शक्तिशाली म्हणून उदयास आले जे एक दशकापूर्वी असद यांच्याविरुद्ध सुरुवातीला झालेल्या बंडखोरीच्या काळात उदयाला आले होते. नुसरा फ्रंटची स्थापना करण्यापूर्वी, गोलानीने इराकमधील अल कायदासाठी लढा दिला होता, जिथे त्याने पाच वर्षे अमेरिकन तुरुंगात घालवली होती. उठाव सुरू झाल्यावर तो सीरियात परतला.
त्यावेळच्या इराकमधील इस्लामिक स्टेट गटाचा नेता – अबू उमर अल-बगदादी – याने त्याला अल कायदाची उपस्थिती वाढवण्यासाठी सीरियात पाठवले होते.
अमेरिकेने 2013 मध्ये गोलानीला दहशतवादी म्हणून घोषित केले. इराकमधील अल कायदाने त्याला असादचे शासन उलथून टाकण्याचे आणि सीरियामध्ये इस्लामिक शरिया कायदा स्थापित करण्याचे काम दिले होते असा दावा त्यावेळी अमेरिकेने केला होता. त्या दाव्यात म्हटले आहे की नुसराने केलेल्या आत्मघाती हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा हिंसक सांप्रदायिक दृष्टीकोन होता.
सीरियन विरोधी पक्षाचा मुख्य परदेशी पाठीराखा असलेल्या तुर्कीने, वायव्येकडील काही इतर गटांना पाठिंबा देताना, एचटीएसला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे.
गोलानी याने 2013 मध्ये त्याची पहिली मीडिया मुलाखत दिली, त्यावेळी त्याचा चेहरा गडद स्कार्फमध्ये गुंडाळला होता आणि कॅमेऱ्यासमोर फक्त त्याची पाठ दाखवली होती. अल जझीराशी बोलताना त्याने सीरियाला शरिया कायद्यानुसार शासन चालवण्याचे आवाहन केले.
सुमारे आठ वर्षांनंतर, तो कॅमेऱ्यासमोर शर्ट आणि जाकीट घालून, यूएस पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसच्या फ्रंटलाइन प्रोग्रामच्या मुलाखतीसाठी बसलेला दिसला. गोलानी म्हणाला की, त्याला देण्यात आलेलं दहशतवादी हे संबोधन अयोग्य असून आपण निरपराध लोकांच्या हत्येला कायम विरोध केला आहे असे त्याने सांगितले.
इराकमधून त्याच्यासोबत आलेल्या केवळ सहाजणांमधून नुसरा आघाडीचा विस्तार एका वर्षात 5 हजारापर्यंत कसा झाला हे त्याने तपशीलवार सांगितले. पण त्याच्या मते त्यांच्या गटाने पाश्चिमात्य देशांना कधीही धोका दिलेला नाही.
2013 मध्ये इस्लामिक स्टेटने नुसरा फ्रंटला एकतर्फी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोलानीने त्याचा जुना सहकारी बगदादीविरुद्ध रक्तरंजित युद्ध केले.
कायदाशी संबंधीत असूनही, इस्लामिक स्टेटच्या तुलनेत नुसराला नागरिक आणि इतर बंडखोर गटांशी व्यवहार करताना अधिक सहनशील आणि कमी विध्वंसक म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर इस्लामिक स्टेटला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी युतीसह अनेक शत्रूंनी सीरिया आणि इराकमध्ये ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून पराभूत केले.
इस्लामिक स्टेट्ची वाताहत होत असताना, गोलानी उत्तर-पश्चिम सीरियन प्रांत इडलिबमध्ये HTS ची पकड मजबूत कशी होईल यासाठी प्रयत्न करत होता, सॅल्व्हेशन सरकार नावाचे नागरी प्रशासन स्थापन करत होता. असदच्या सरकारने HTS कडेही इतर बंडखोरांप्रमाणेच दहशतवादी म्हणून पाहिले होते.
सुन्नी मुस्लिम बंडखोर आता नियंत्रणात आहेत, HTS प्रशासनाने शिया अलावाईट आणि इतर सीरियन अल्पसंख्याकांना आश्वस्त करण्यासाठी काही निवेदने जारी केली आहेत. एका निवेदनाद्वारे अलाव्यांना भावी सीरियाचा एक भाग होण्याचे आवाहन केले जो नंतरच्या काळात “पंथीयवाद ओळख पुसून टाकणार” आहे.
अलेप्पोच्या दक्षिणेकडील ख्रिश्चन रहिवाशांना दिलेल्या संदेशात गोलानी म्हणाला की, त्यांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण केले जाईल. त्यांनी त्यांना त्यांच्या घरातच राहण्याचे आणि सीरियन सरकारकडून खेळले जाणारे “मानसिक युद्ध” नाकारण्याचे आवाहन केले. “तो खरोखरच महत्त्वाचा आहे. सीरियातील मुख्य बंडखोर नेता, सर्वात शक्तिशाली इस्लामवादी,” असे लुंड म्हणाला. त्यांच्या मते एचटीएसने अनेक वर्षे इदलिबमधील स्वतःच्या प्रदेशावर राज्य करून “logistical and governance capacity” दाखवून दिली आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)