Google ने एक नवीन चिप लाँच केली असून, या चीपच्या साहाय्याने त्यांनी एक मोठे क्वांटम कॉम्प्युटिंग आव्हान सोडवले असल्याचे सांगतिले आहे.
मायक्रोसॉफ्ट (MSFT.O) आणि इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (IBM.N) अल्फाबेट सारख्या इतर टेक दिग्गजांप्रमाणे Google क्वांटम कॉम्प्युटिंगचा गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होती. कारण Quantum Computing Chip ही आजच्या सर्वात वेगवान प्रणालींपेक्षा कितीतरी अधिक वेगवान संगणकीय गती देण्याचे काम करते. सोमवारी लाँच झालेल्या या नवीन ‘Willow’ नावाच्या चिपमध्ये आले एकूण 105 “क्विट्स” आहेत, जे क्वांटम संगणकांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत.
गुगलने लाँच केलेल्या या आत्याधुनिक Willow chip बाबत असा दावा केला जात आहे, की चिपसेटद्वारे काम्प्युटरशी निगडीत कठीणातील कठीण समस्या अगदी ५ मिनीटांत सोडवली जाऊ शकते. जी सोडवण्यासाठी एखाध्या आघाडीच्या सुपर कॉम्प्युटरला 10 ते 25 वर्षे लागू शकतात. याविषयी बोलताना, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सोशल मीडियातील आपल्या पोस्टमध्ये लिहीतात की, ‘गुगलने विलो चिपच्या रूपात क्वांटम कॉम्प्युटिंगची एक नवीन अत्याधुनिक कला सादर केली आहे, जी गणनेतील अर्थात कॅल्क्युलेशनमधील त्रुटी दूर करण्यात माहिर आहे.’
१९९० च्या दशकापासून संगणक क्षेत्रातील शास्त्रज्ञ क्वांटम एरर-करेक्शनवर काम करत आहेत. हा एरर दूर करण्यासाठी विलो चीप खूप मोठे सहकार्य करण्यार असल्याचं बोललं जात आहे.
सोमवारी नेचर नामक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये गुगलने सांगितले की, क्विटची संख्या वाढत असताना, त्यातील त्रुटी दर कमी करण्यासाठी Willow chip च्या मदतीने क्यूबिट्सला एकत्र जोडण्याचा मार्ग सापडला आहे.
गुगल असाही दावा करते की, ही अत्याधुनिक चिप रिअल टाइममध्ये संगणकीय प्रोग्राममधील चुका दुरुस्त करू शकते. क्वांटम मशीनला अधिक व्यावहारिक आणि जलद बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘Google Quantum AI’ युनिटचे नेतृत्व करणारे ‘हार्टमट नेव्हन’ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “ या Willow chip च्या निर्मितीमुळे आम्ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या पुढे आलो आहोत.
Google चे काही प्रतिस्पर्धी Google पेक्षा मोठ्या संख्येने qubits सह चिप्स तयार करत आहेत. तथापि, Google सर्वात विश्वासार्ह qubits बनविण्यावर लक्ष केंद्रित करते, असा दावा Google Quantum AI चे मुख्य आर्किटेक्ट- अँथनी मेग्रांट यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे.
Google ने त्याच्या मागील चिप्स कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा येथे सामायिक केलेल्या प्रणालीत तयार केल्या होत्या. मात्र ‘विलो चिप्स’ तयार करण्यासाठी कंपनीने स्वतःची फॅब्रिकेशन प्रणाली तयार केली.
अँथनी मेग्रांट त्यांच्या एका निवेदनात म्हणाले, की ‘ या नवीन सुविधेमुळे Google भविष्यातील चिप्स किती वेगाने बनवू शकते, याचा बेंचमार्क सेट झाला आहे. आमच्याकडे एखादी चांगली आणि कल्पना असल्यास, ती चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’’
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गगूलची ही नवीन क्वांटम कंप्युटिंग चिप ही नवीन औषधांचा शोध, न्यूक्लियर फ्यूजन रिॲक्टर एनर्जी आणि कार बॅटरी डिझाइन यासारख्या क्षेत्रात वापरली जाऊ शकते. ही क्वांटम कॉम्प्युटिंग चिप, क्वांटम मेकॅनिक्सच्या तत्त्वांवर कार्य करते. जे पारंपारिक संगणकांपेक्षा बरेच वेगळे आहेत. यामध्ये, सब-एटॉमिक पार्टिकल्सचा वापर मोजणीसाठी म्हणजेच कॅल्क्युलेशनसाठी केला जातो. ज्यामुळे कॅल्क्युलेशनचा वेग सुपर कॉम्प्युटरपेक्षा वेगवान होतो.
दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुगलने लाँच केलेली ही नवीन अद्ययावत ‘विलो चिप’ प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी अजून काही वर्षांचा तरी अवधी लागेल. तसेच, त्याच्या वापरासाठी कंपन्यांना अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील. मात्र ज्यावेळी ही चीप प्रत्यक्षात कार्यरत होईल तेव्हा संगणक क्षेत्रात क्रांती घडवेल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे