सेबरबँकचे पहिले डेप्युटी CEO अलेक्झांडर वेदाखिन यांच्या म्हणण्यानुसार, रशियावर पाश्चिमात्य देशांचे निर्बंध असूनही देशांतर्गत प्रतिभा आणि जनरेटिव्ह एआयचा लाभ घेत, 2030 पर्यंत जागतिक एआय क्रमवारीत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.सेबरबँक रशियामध्ये एआय विकासाचे नेतृत्व करत आहे, जे सध्या एआय अंमलबजावणी, नावीन्यपूर्णता आणि यूके-आधारित टॉर्टॉइज मीडियाच्या ग्लोबल एआय निर्देशांकावर गुंतवणूक करून 83 देशांपैकी 31 व्या क्रमांकावर आहे, केवळ अमेरिका आणि चीनच नाही तर ब्रिक्सचे सदस्य असलेल्या भारत आणि ब्राझील यांच्याही मागे सध्या रशियाचा क्रमांक आहे.”मला विश्वास आहे की रशिया त्याच्या स्वतःच्या विकासाद्वारे आणि जनरेटिव्ह एआय क्षेत्रातील सहाय्यक नियमनाद्वारे 2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रमवारीत त्याचे सध्याचे स्थान लक्षणीयरीत्या सुधारू शकेल,”असा विश्वास वेदाखिन यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला.
ते म्हणाले, “पाश्चात्यांकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांचा उद्देश रशियाची संगणकीय शक्ती मर्यादित करणे हा होता. मात्र आम्ही आमच्या प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या मदतीने त्या कमतरतेची भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
विशाल माहिती केंद्रे उभारण्यासाठी आम्ही अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करणार नाही, असे वेदाखिन म्हणाले.
त्याऐवजी, रशिया मेटाच्या लामासारख्या स्मार्ट एआय मॉडेलच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल.
ते म्हणाले की रशियन भाषेतील जनरेटिव्ह एआय मॉडेल्स तांत्रिक सार्वभौमत्वाची हमी देतात. “जागतिक स्तरावर स्वतःला स्वतंत्र मानणाऱ्या कोणत्याही देशाचे स्वतःच्या भाषेचे मोठे मॉडेल असले पाहिजे, असे मला वाटते,” असे वेदाखिन म्हणाले. रशिया हा अशा दहा देशांपैकी एक आहे, जे स्वतःचे राष्ट्रीय जनरेटिव्ह एआय मॉडेल विकसित करत आहेत.
अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे की, 21 व्या शतकातील सर्वात आशादायक तंत्रज्ञानातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी रशिया, ब्रिक्स भागीदार आणि इतर देशांसोबत एआयचा विकास करेल.
वेदाखिन म्हणाले की चीन आणि विशेषतः युरोप, अतिरिक्त नियमनामुळे एआयमधील त्यांचा फायदा गमावत आहे.
जर आपण आपल्या शास्त्रज्ञांना आणि मोठ्या कंपन्यांना प्रयोग करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले तर तंत्रज्ञानाचा विकास मंदावेल. बंदी घातल्यामुळे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय शर्यतीत हरण्याची शक्यता अधिक आहे,” असे वेदाखिन म्हणाले.
अलिकडच्या वर्षांत अनेक एआय विकासकांनी रशिया देश सोडला, विशेषतः 2022 मध्ये युक्रेनबरोबरच्या संघर्षासाठी जमवाजमव मोहिमेतून त्यांनी मोठ्या प्रमाणात पळ काढल्याचे वेदाखिन म्हणाले.
अर्थात रशियाच्या एआय क्षेत्रातील संधींच्या आमिषाने काही एआय विकासक आता मायदेशी परतत असल्याचेही वेदाखिन यांनी स्पष्ट केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)