Indo-pacific प्रदेशातील एअरफील्ड्सवर चीनकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे भविष्यात संघर्ष झाल्यास, अमेरिकेच्या लष्करी तळांना आणि विमानांना अडथळा निर्माण होईल, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. याबाबत अहवालाच्या लेखकांनी शिफारस करताना म्हटले आहे की, United Stated ने स्वस्त दरातील वैमानिक विरहित विमाने आणि धावपट्टी दुरुस्ती क्षमतांमध्ये गुंतवणूक करावी.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, Indo-pacific प्रदेशातील मध्यवर्ती समस्या ही आहे, येथील बेटांच्या पहिल्या साखळीत इंडोनेशियापासून अंदाजे उत्तर-पूर्वेकडे जपानपर्यंत चालत असलेल्या द्वीपसमूहांचा संग्रह, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्राचा समावेश आहे. जी हजारो चिनी क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आहेत.
जर ही क्षेपणास्त्रे युएस तळांवरील धावपट्टी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची क्षमता अक्षम करण्यासाठी वापरली गेली, तर ते जपानमधील अमेरिकेचे एअर बेस किमान 11 ते 12 दिवसांसाठी बंद पाडू शकतात. तर गुआम आणि इतर पॅसिफिक बेटांवरील यूएस बेस किमान 1 ते 7 दिवसांसाठी बंद पाडले जाऊ शकतात.
‘अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, China – युनायटेड स्टेट्सला हवाई इंधन भरण्यासाठी धावपट्टीचा वापर करण्यास नकार देऊन यूएसच्या लढाऊ ऑपरेशनमध्ये जास्त काळापर्यंत व्यत्यय आणू शकतात’, असेही अहवालात नमूद केले आहे.
संरक्षण आणि सुरक्षा थिंक टँक- स्टिमसन सेंटरने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये,
चायनाच्या एअर स्ट्राइक प्लॅनिंगमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात स्वस्त दरातील, मानवरहित विमाने आणि इलेक्ट्रॉनिक युद्धामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या धावपट्ट्यांच्या
आणि एअर बेसच्या दुरुस्तीवर भर देण्याची तसेच लहान धावपट्ट्यांची संख्या वाढवून, त्यांच्या वापरास सक्षम क्रू विरहीत विमाने विकसीत करण्यावर भर देण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान यूएस इंडो-पॅसिफिक कमांड, जे या प्रदेशातील अमेरिकन सैन्याची देखरेख करतात, त्यांनी यावर अद्याप कोणतीही ठोस टिपण्णी केलेली नाही.
तज्ज्ञ अभ्यासकांच्या मते, गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या लष्करी नियोजकांनी वितरित केलेल्या ऑपरेशन्सद्वारे- संपूर्ण इंडो-पॅसिफीक प्रदेशात आपल्या शक्तींचा प्रसार करण्याच्या संकल्पनेभोवती बरीच बांधणी केली आहे. ‘पॅसिफिक डेटरन्स इनिशिएटिव्ह’ (Pacific Deterrence Initiative) चा एक भाग म्हणून, ऑस्ट्रेलिया आणि टिनियन बेटांसारख्या ठिकाणी असेलेले एअरफील्ड अपग्रेड करण्यासाठी अमेरिकेने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.
सोबतच अमेरिकेच्या हवाई दलाने ‘रॅपिड एअरफील्ड डॅमेज रिकव्हरी (RADR)’ नावाचा एक विशेष प्रोग्राम देखील विकसित केला आहे. अहवालात नमूद केल्यानुसार, एखाद्या हवाई हल्ल्यानंतर धावपट्टी त्वरित पुन्हा कार्यरत करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी आणि त्यांना अशा “हजारो” हल्ल्यांसाठी सक्रिय ठेवण्याइतपत विकसीत करण्याबाबतच्या प्रशिक्षणासाठी हा प्रोग्राम विकसीत करण्यात आला आहे.
यूएस गुआम मधील एअरफील्ड आणि इतर तळ कार्यरत ठेवण्यासाठी, त्यांचे क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी, इंटरसेप्टर्सच्या मल्टीबिलियन-डॉलरच्या “स्तरित” नेटवर्कची योजना देखील करत आहे.
‘इंडो-पॅसिफिक संघर्ष सिम्युलेशनचे’ सखोल ज्ञान असलेल्या American Air Force च्या लॉजिस्टिक्स ऑफिसरने सांगितले की, या अहवालाने सदर समस्येचे खूप चांगले मूल्यांकन केले आहे. ऑफिसरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, RADR आणि क्षेपणास्त्र संरक्षण अहवालाच्या अंदाजापेक्षा अधिक प्रभावी असेल आणि अहवालात गृहीत धरल्यानुसार चीनी स्ट्राइक प्लॅनर बहुधा अँटी-रनवे सबम्युनिशन्सऐवजी युद्धसामग्रीचे मिश्रण वापरतील. दरम्यान युएस लष्कर याबाबात सतर्क असून त्यांनी आवश्यक ती पावले उचलायला सुरुवात केली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षात, अनेक धोरणकर्ते आणि विश्लेषक यांच्याकडून माझ्या कानावर असे आले आहे की, युनायटेड स्टेट्सला जपान आणि ग्वाममधील तळांवर प्रवेश मिळेपर्यंत चीनच्या जहाजांना जलसमाधी देणं आणि तैवानचे रक्षण करणे क्रमप्राप्त आहे.”
दरम्यान, यासंबधी सादर झालेल्या अहवालात, सांख्यिकीय मॉडेलिंग स्क्रिप्ट तयार करून चिनी हल्ल्यांच्या प्रभावाची गणना केली गेली आहे ज्यामध्ये धावपट्टीचा आकार, चिनी क्षेपणास्त्रांची अचूकता आणि त्यांच्यापासून यूएस बेसचं संरक्षण यांसारख्या अनेक मुद्द्यांचा विचार केला गेला आहे.
टीम भारतशक्ती | रॉयटर्स
अनुवाद- वेद बर्वे