2020 मध्ये पॅरिसमध्ये एका मध्यमवयीन शालेय शिक्षकाचा शिरच्छेद केल्याप्रकरणी फ्रेंच न्यायालयाने आठ जणांना दोषी ठरवले आहे. शाळेच्या शिक्षकाने ऑक्टोबर 2020 मध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढल्याचा आरोप केला गेला होता. पॅरिसच्या कॉनफ्लान्स-सेंटे हॉनरिन उपनगरात सॅम्युअल पॅटी यांचा शिरच्छेद केल्याप्रकरणी सात पुरुष आणि एका महिलेला दोषी ठरवण्यात आले आहे.
47 वर्षीय सॅम्युअल पॅटीने ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना व्यंगचित्रे दाखवल्याच्या घटनेनंतर काहीच दिवसांनी, चेचन वंशाच्या 18 वर्षीय रशियन तरुणाने पॅरिसजवळील त्यांच्या शाळेबाहेर चाकूने वार करत त्यांचा शिरच्छेद केला. या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी मारेकऱ्याला ठार मारले असले तरी, त्याला पाठिंबा देणाऱ्या किंवा या प्रकरणी त्याला येनकेन प्रकारे मदत करणाऱ्या आठ जणांवर खटला चालवला गेला.
शुक्रवारी दोषी ठरलेल्यांमध्ये एका विद्यार्थ्याच्या वडिलांचाही समावेश होता, ज्यांनी समाज माध्यमावर खोट्या अकाऊंटवरून पॅटी यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध केली.यामुळे माध्यमिक शाळेतील या शिक्षकाला लक्ष्य करणाऱ्या पोस्टची सोशल मीडियावर लाट उसळली होती.
ब्रॉडकास्टर फ्रान्सइन्फोच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने ब्रहिम चनिनाला गुन्हेगारी दहशतवादी संघटनेसाठी 13 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
शाळेबद्दल तक्रार करणे, आपल्या मुलीला शिस्त लावणे यासाठी पॅटी यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप करणारे आणि त्याद्वारे त्यांच्या शाळेची ओळख पटवणारे खोटे व्हिडिओ चनिनाने प्रकाशित केले होते असा त्याच्यावर दोषारोप होता.
बीबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पॅटीच्या हत्येची आखणी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे करण्यात आली होती, ज्यात असा खोटा दावा करण्यात आला होता की शिक्षकाने इस्लामचे संस्थापक महम्मद पैगंबर यांची अश्लील छायाचित्रे आपल्या विद्यार्थ्यांना वर्गात दाखवली होती.
पैगंबर महंमद यांची छायाचित्रे दाखवण्यापूर्वी पॅटी यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर जाण्यास सांगितले होते, अशा अफवा इंटरनेटवर पसरल्या.
या खोट्या दाव्यांमुळे भडकलेल्या 18 वर्षीय रशियन मुस्लिम कडव्या विचारांच्या अब्दुल्लाह अंझोरोव्हने उपनगरातील माध्यमिक शाळेत पॅटी यांचा शिरच्छेद केला.
मुक्त भाषणावरील लेक्चरनंतर अकरा दिवसांनी, अँझोरोव्हने पॅटी यांच्यावर हल्ला केला आणि शिरच्छेद केलेले शिक्षकांचे डोके समाजमाध्यमांवर दाखवले.
एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने पॅटीबद्दल खोटे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यांमुळे या अफवांना सुरुवात झाली.
‘द गार्डियन’ ने दिलेल्या वृत्तानुसार, अभ्यास न केल्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांना ही गोष्ट कळू नये म्हणून, पॅटीबद्दल एक बनावट कथा रचली, ज्यामध्ये तिने आपल्याला वर्गातून बाहेर जायला सांगितले असा आरोप केला, जेणेकरून शिक्षक ‘पैगंबरांचे नग्न छायाचित्र’ वर्गात दाखवू शकतील असे सांगितले.
चनीनाने सोशल मिडियावर पॅटी यांच्या विरोधात मोहीम राबवली आणि 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कट्टरपंथी इस्लाम कार्यकर्ते अब्देलहाकिम सेफ्रियोई यांचीही मदत घेतली.
अब्दुल्लाख अंझोरोवचे दोन मित्र नइम बौदौद आणि अझीम एप्सिरखानोव, जे हत्या करण्यासाठी लागणाऱ्या शस्त्राची खरेदी करत असताना त्याच्यासोबत होते, त्यांना 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)