”सीरिया ‘ऐतिहासिक राष्ट्रीय संवाद परिषद’ आयोजित करण्यासाठी आपला पुरेसा वेळ घेईल, जेणेकरून तयारीत सिरियाच्या समाजातील सर्व घटकांचा व्यवस्थित समावेश होऊ शकेल”, असे सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांनी मंगळवारी सांगितले.
परिषदेचे उद्दिष्ट
ही संवाद परिषद, सीरियातल्या सर्व घटकांमधील लोकांना एकत्र आणून, इस्लामवादी बंडखोरांनी पूर्व अध्यक्ष बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर, आता देशासाठी एक नवीन मार्ग निर्धारित करण्याच्या उद्देशातून घेण्यात येणार आहे.
सीरियातील बंडखोरांनी देशाची राजधानी दमास्कस आणि राष्ट्राध्यक्ष असद यांच्या विस्तीर्ण राजवाड्यांवर ताबा मिळवल्यानंतर, सलग 54 वर्षे सीरियावर राज्य करणारे असद यांचे कुटुंब, 8 डिसेंबर रोजी रशियाला पळून गेले. त्यावेळी 59 वर्षीय असद आणि त्याच्या कुटुंबियांना रशियाने आश्रय दिला होता.
परिषदेच्या आयोजनासाठी वेळ आवश्यक
“आम्ही राष्ट्रीय संवाद परिषद आयोजित करण्यासाठी आमचा वेळ घेऊ, ज्यामुळे आम्हाला सिरियाच्या सर्व घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व करू शकेल, अशी एक विस्तारित समिती तयार करण्याची संधी मिळेल,” असे शिबानी यांनी सांगितले.
डिप्लोमॅट्स याविषयी काय सांगतात?
राजकीय डिप्लोमॅट्स आणि सीरियाला भेट दिलेल्या राजदूतांनी, अलीकडील दिवसांत सिरियाच्या नवीन शासकांना सांगितले की, ‘राष्ट्रीस संवाद परिषदे आयोजित करण्यात घाई करू नका, उलट ती अधिक सुनियोजीत आणि यशस्वी करण्यावर भर द्या. परिषदेसाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता करुन, ते अधिक सुलभ करण्याकडे लक्ष द्या.’
सीरियाच्या नवीन सरकाराने परिषदेसाठीची तारीख अद्याप ठरवलेली नाही, असे पूर्व स्रोतांनी रॉयटर्सला सांगितले.
दरम्यान, विरोधी गटांच्या अनेक सदस्यांनी त्यांना संवाद परिषदेची आमंत्रणे मिळाली नसल्याचे, सांगितले आहे.
सिरियाला पुर्नबांधणीसाठी वेळ हवा
तुर्कीचे राष्ट्रपती तायप एर्दोआन यांनी मंगळवारी सांगितले की, ‘अल- असद यांना पदच्युत केल्यानंतर झालेल्या प्रचंड उलथापालथीनंतर, सिरियाला स्वतःला या सगळ्यातून सावरून पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठी आणि त्याच्या पुनर्निर्माणासाठी वेळेची आवश्यकता आहे.’ त्यांनी सांगितले की, ’13 वर्ष सुरु असलेल्या नागरी युद्धामुळे सीरियामध्ये झालेली पायाभूत सुविधांची हानी ही अपेक्षेपेक्षा खूपच वाईट आहे.’
तुर्कीकडून मदतीची ऑफर
8 डिसेंबर रोजी, अल-असदचे पतन झाल्यापासून, तुर्कीने वारंवार सांगितले आहे की, ते आपल्या शेजारी राष्ट्राला पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहेत. त्यांनी सीरियातील आवश्यक त्या ठिकाणी, वीज उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यासाठी, त्यांचे परराष्ट्र मंत्री, गुप्तचर प्रमुख आणि ऊर्जा मंत्रालयाचे एक शिष्टमंडळ देखील पाठवले आहे.
क्रॉस-बॉर्डर घुसखोरी
तुर्की, सीरियाशी 911-किमी लांबीच्या (565-मैल) सीमा सामायिक करतो. तसेच ते सीरियातील बंडखोर कुर्दिश गटांना दहशतवादी मानतात, ज्यांच्याविरुद्ध त्यांनी अनेकदा सीमापार घुसखोरीही केली आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)