अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्यासाठी आपण ‘आर्थिक शक्ती’ वापरू शकतो ही व्यक्त केलेली शक्यता कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी धुडकावून लावली आहे.
“कॅनडा अमेरिकेचा भाग होण्याची कोणतीही शक्यता नाही,” असे त्यांनी पद सोडण्याच्या आपल्या निर्णयाची घोषणा केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले.
ट्रुडो यांनी असेही म्हटले आहे की, “एकमेकांचा सर्वात मोठा व्यापारी आणि सुरक्षा भागीदार असण्याचा फायदा आपल्या दोन्ही देशांतील कामगार आणि समुदायांना होतो.”
53 वर्षीय ट्रुडो हे कॅनडाचे सर्वात जास्त काळ कार्यरत असणारे पंतप्रधान आहेत. गेली नऊ वर्षे या पदावर राहिल्यानंतर त्यांनी सत्ताधारी उदारमतवाद्यांच्या नेतृत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला, परंतु पक्षाने नवीन उमेदवाराची निवड करेपर्यंत ते या पदावर राहतील.
ट्रुडो यांनी गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना 24 मार्चपर्यंत कॅनेडियन संसद स्थगित करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला पदभार स्वीकारतील तेव्हा ट्रुडो पंतप्रधान म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे.
मार-ए-लागो येथे बोलताना ट्रम्प यांना विचारले गेले की ते कॅनडा ताब्यात घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा विचार करत आहेत का? त्यावर त्यांनी “नाही, आर्थिक शक्ती”, त्यांनी उत्तर दिले. “कारण कॅनडा आणि अमेरिका, यांच्यात खरोखरच काहीतरी असेल,” असेही ते म्हणाले.
अमेरिकेबरोबर कॅनडाच्या अतिरिक्त व्यापाराबद्दल बऱ्याच काळापासून तक्रार करणारे ट्रम्प यांनी यापूर्वी पत्रकारांना सांगितले होते की सीमा ही “कृत्रिमरित्या काढलेली रेषा” आहे. ट्रम्प यांनी कॅनडामधील आयातीवर 25 टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली आहे, जी सर्व वस्तू आणि सेवांच्या 75 टक्के निर्यात सीमेच्या दक्षिणेकडे पाठवते.
तत्पूर्वी मंगळवारी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जॉली म्हणाल्या की, ट्रम्प यांचे विधान म्हणजे “कॅनडा एक मजबूत देश कसा बनवला हे समजून घेण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दर्शवणारे आहे. धमक्यांना तोंड देण्यासाठी आम्ही कधीही मागे हटणार नाही.”
अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांच्या राजीनाम्यावर नाराज असलेल्या सत्ताधारी लिबरल पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल केलेल्या तक्रारींवर ट्रुडो विचार करत आहेत.
गेल्या महिन्यात फ्रीलँड यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जवळच्या मित्राने माध्यमांसमोर याचा उल्लेख केला होता. धोरणात्मक संघर्षामुळे फ्रीलँड यांनी राजीनामा दिला. त्यावेळी दिलेल्या पत्रात त्यांनी ट्रुडो यांचे नेतृत्व कसे अपयशी आहे याचा परामर्श घेतला होता, मात्र त्यामुळे 2015 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंतचे सर्वात वाईट संकट निर्माण झाले.
उदारमतवादी आमदार वेन लाँग यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की पंतप्रधानांना “आपण असेच चालू ठेवू शकतो असे वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. आपण फक्त पाण्यात नाही तर, आपण पाण्याखाली आहोत. (आपण फक्त संकटात नाही तर गहिऱ्या संकटात आहोत)
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)