चीनच्या लोकसंख्येत 2024 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी घसरण झाली. चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ही जन्माला येणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. जन्मदरात किंचित सुधारणा झाली असली तरी येत्या काही वर्षांत लोकसंख्या घटण्याचा दर आणखी वाढेल असा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.लोकसंख्या दर
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने म्हटले आहे की चीनमधील एकूण लोकसंख्या 2023 मधील 1.409 अब्जांच्या तुलनेत 2024 मध्ये 1.39 लाखांनी कमी होऊन 1.408 अब्ज झाली.
कामगार आणि ग्राहकांची संख्या कमी होत असताना जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था संघर्ष करेल या चिंतेला शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने दुजोरा दिला. ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी लागणारा पैसा आणि सेवानिवृत्ती लाभांच्या वाढत्या खर्चामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या राज्य सरकारांसमोर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्टॅटिस्टिक्स कार्यालयाने सांगितले की, 2023 मध्ये 9.2 कोटीच्या तुलनेत चीनमध्ये एकूण जन्माची संख्या 9.54 कोटी होती. जन्मदर 2024 मध्ये दर हजार लोकांमागे 6.77 पर्यंत वाढला, तर 2023 मध्ये दर हजार लोकांमागे 6.39 होता. मृत्यूची संख्या 2023 मधील 11.1 दशलक्ष होती, जी 2024 मध्ये 10 लाखांहून कमी होती.
वाढते शहरीकरण आणि एकच मूल धोरण
1980 ते 2015 या काळात चीनने अंमलात आणलेल्या ‘एकच मूल’ धोरणामुळे तसेच झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाचा परिणाम म्हणून चीनमधील जन्मदर अनेक दशकांपासून कमी होत आहेत.
शेजारील जपान आणि दक्षिण कोरियाप्रमाणेच, मोठ्या संख्येने चिनी नागरिक ग्रामीण भागांमधून शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, जिथे मुलांना जन्मला घालणे अतिशय महाग आहे.
बालसंगोपन आणि शिक्षणाचा उच्च खर्च तसेच नोकरीची अनिश्चितता आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे अनेक चिनी तरुणांना लग्न करणे किंवा कुटुंब सुरू करणे यापासून परावृत्त केले आहे.
लैंगिक भेदभाव आणि महिलांनी घराची काळजी घेण्याच्या पारंपरिक अपेक्षा या समस्येत आणखी भर घालत त्या तीव्र करत असल्याचे लोकसंख्याशास्त्रज्ञ सांगतात.
चीनच्या लोकसंख्येतील घसरणीची पाळेमुळे संरचनात्मक कारणांमध्ये रुजलेली आहेत – मूलभूत संरचनात्मक बदलांशिवाय- सामाजिक सुरक्षिततेचे जाळे वाढवण्यापासून ते लैंगिक भेदभाव दूर करण्यापर्यंत-लोकसंख्येतील घसरणीचा कल उलटवता येणार नाही,” असे मिशिगन विद्यापीठातील समाजशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक युन झोऊ म्हणाले.
लोकसंख्याशास्त्रज्ञांनी सांगितले की, कोविड-19 साथीमुळे रखडलेली लग्ने 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पार पडली त्यामुळे विवाह संख्येत वाढ झाली. नंतर 2024 मध्ये जन्मदरात वाढ बघायला मिळाली. मात्र 2025 मध्ये ही संख्या पुन्हा कमी होण्याची अपेक्षा आहे.
विवाह हे चीनमधील जन्मदराचे एक प्रमुख सूचक आहे, जिथे अनेक अविवाहित महिलांना मुलांच्या संगोपनाचे लाभ मिळू शकत नाहीत.
उचलण्यात आलेली पावले
चीनमधील जन्मदराला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 2024 मध्ये अनेक उपाययोजना अंमलात आणल्या होत्या.
डिसेंबरमध्ये त्यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठांना विवाह, प्रेम, प्रजननक्षमता आणि कुटुंब या विषयांवरील सकारात्मक दृष्टिकोनांवर भर देण्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रमात विवाह आणि “प्रेम शिक्षण” समाविष्ट करण्याचे आवाहन केले.
नोव्हेंबरमध्ये, राज्य परिषदेने किंवा मंत्रिमंडळाने चिनी लोकसंख्येच्या संकटाचे निराकरण करण्यासाठी आणि “योग्य वयात” प्रसूती आणि विवाहांबद्दल आदर पसरवण्यासाठी संसाधनांना निर्देशित करण्यासाठी स्थानिक सरकारांना एकत्र केले.
संयुक्त राष्ट्रांनी 15 ते 49 वर्षे अशी परिभाषित केलेल्या प्रजननक्षम वयातील चिनी महिलांची संख्या या शतकाच्या अखेरीस दोन तृतीयांशहून अधिक घसरून 10 कोटींपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवृत्तीचे वय असलेले 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक 2035 पर्यंत 40 कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे, जे सध्या सुमारे 280 दशलक्ष आहे.
2035 पर्यंत निवृत्तीवेतन व्यवस्थेचा निधी संपेल, असे सरकारी चिनी अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.
आकडेवारीनुसार, चीनची सुमारे 22 टक्के लोकसंख्या, किंवा 310.31 दशलक्ष लोक, 2024 मध्ये 60 किंवा त्याहून अधिक वयाचे होते, तर 2023 मध्ये त्यांची संख्या 296.97 दशलक्ष होती.
शहरीकरणाच्या वाढत्या गतीमुळे इथे राहणाऱ्यांची संख्या 10.83 दशलक्षांहून 943.3 दशलक्ष इतकी वाढली आहे. दरम्यान, ग्रामीण लोकसंख्या घटून 464.78 दशलक्ष झाली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)