या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी भारतीय नौदलाचा चित्ररथ सागरी राष्ट्र म्हणून भारताच्या स्थिती कशी आहे यावर जोर देत समुद्राच्या मध्यभागी असलेल्या परिस्थितीचे दर्शन घडवणारा आहे. यात 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे (UTs) प्रतिनिधित्व करणारे कर्मचारी आणि हिंदी महासागर क्षेत्रामधील (IOR) नौदलाची भूमिका प्रदर्शित करतील. भारतीय नौदलात नव्याने सहभागी झालेल्या फ्रंटलाइन लढाऊ-पाणबुडी आयएनएस वाघशीर, विनाशक आयएनएस सुरत आणि फ्रिगेट आयएनएस निलगिरी यांचेही दर्शन घडवणार आहे. किंबहुना 26 जानेवारी रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ही तीन जहाजे केंद्रस्थानी असतील. बुधवारी, भारतीय नौदलाने ‘आत्मनिर्भर नौसेनेद्वारे राष्ट्र-निर्माण’ या संकल्पनेवर आधारित टॅगलाइनसह आपल्या चित्ररथाचे मॉडेल जाहीर केले. हा चित्ररथ भारतीय नौदलाच्या क्षमतेचे आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.
भारतीय नौदलाचे कार्मिक सेवा नियंत्रक व्हाईस ॲडमिरल विनीत मॅककार्टी म्हणाले, “या चित्ररथात भारताच्या नौदलाचे सामर्थ्य आणि संरक्षणातील आत्मनिर्भरतेच्या भावनेचे प्रतीक असलेली तीन व्यासपीठ दाखवली जातील.”
पी15बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आयएनएससुरत हे संरक्षण उत्पादनात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचा पुरावा आहे. त्यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे. अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत जाळे-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज, हे जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत विध्वंसकांपैकी एक आहे.
आयएनएस नीलगिरी हे पी17ए स्टील्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून त्यात पुढील पिढीतील स्वदेशी युद्धनौका म्हणून प्रतिबिंबित करणाऱ्या भक्कमपणे टिकून राहण्याची क्षमता, सीकीपिंग आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे, तर आयएनएस. वाघशीर ही पी75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे.
सागरी सुरक्षेसाठी नौदलाचे समर्पण अधोरेखित करणाऱ्या या चित्ररथासोबत नौदलाची मिश्र तुकडी आणि औपचारिक बँड पायी चालत जाणार आहे. यावेळी सहभागी होणाऱ्या नौदलाच्या तुकडीत 144 तरुण कर्मचारी असतील. या दलाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर साहिल अहलुवालिया हे कंटिंजंट कमांडर म्हणून आणि लेफ्टनंट कमांडर इंद्रेश चौधरी, लेफ्टनंट कमांडर काजल भारवी आणि लेफ्टनंट दिविंदर कुमार हे प्लाटून कमांडर म्हणून करतील. या चित्ररथाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर ममता सिहाग आणि लेफ्टनंट विपुल सिंग गेहलोत करणार आहेत.
टीम भारतशक्ती