गुजरातमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर, ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) ‘ध्रुव’ ला महिन्याभरासाठी ग्राउंड करण्यात आले होते. त्यानंतर ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) चे अध्यक्ष डी.के. सुनील यांनी जाहीर केले की, कंपनी पुढील निर्णय घेण्यापूर्वी तपास समितीच्या निष्कर्षांची प्रतीक्षा करत आहे.
बेंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स बेसवर सुरु असलेल्या- ‘Aero India 2025‘ दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत, CMD ने सांगितले की, ”हा अपघात विशिष्ट यांत्रिक समस्येमुळे झाला की प्रणालीतील दोषांमुळे, याचे HAL सखोल मूल्यांकन करत आहे.”
”ही एक दुर्दैवी घटना होते. ध्रुव हेलिकॉप्टरने सुमारे 4 लाख तासांची उड्डाणे पूर्ण केली होती. तरी याप्रकरणी दोष तपास पथकाने (DTI) तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. एकदा निष्कर्षांचे पुनरावलोकन केल्यानंतर, आम्ही फ्लीटच्या मंजुरीबाबत पुढील निर्णय घेऊ,” असे सुनील यांनी यावेळी सांगितले.
ध्रुव हेलिकॉप्टरच्या ग्राउंडींगची सुरूवात, ५ जानेवारीला गुजरातमधील पोरबंदर एअरपोर्टवर झालेल्या, भारतीय तटरक्षक दलाच्या ALH ध्रुव MK III च्या अपघातानंतर झाली. या अपघातात दुर्दैवाने तीन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. HAL ने प्रतिसाद म्हणून, सर्व 330 ALH ध्रुव हेलिकॉप्टर्सना सेवेतून तात्पुरते ग्राऊंड केले आणि अपघाताचा सखोल तपास सुरू केला, ज्यात ग्राउंडिंगच्या तांत्रिक पुनरावलोकनाचाही समावेश आहे.
एअर मार्शल विपाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली, एक विशेष तापास समिती स्थापन करण्यात आली. पांडे भारतीय हवाई दलाच्या मेंटेनन्स कमांडचे माजी प्रमुख आहेत. तपास समितीच्या आदेशामध्ये तटरक्षक हेलिकॉप्टर्सच्या देखभाल पद्धतींचे पुनरावलोकन करणे आणि सुधारणेसाठी शिफारशी देणे, याचा समावेश होता.
“गेल्या 25 वर्षात, ALH हेलिकॉप्टरचा समावेश असलेले 28 अपघात झाले आहेत, ज्यातील 13 तांत्रिक समस्यांमुळे, 13 मानवी चुकांमुळे आणि दोन अज्ञात कारणांमुळे झाले आहेत,” असा खुलासा HAL चे अध्यक्ष सुनील यांनी केला. “5 जानेवारीच्या घटनेत, प्राथमिक तपासणीत हेलिकॉप्टरच्या स्वॅश प्लेटमध्ये फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. आम्ही फ्लीटच्या देखभाल मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलासोबत आम्ही जवळून काम करत आहोत आणि तपासणीच्या निष्कर्षांवर आधारित ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असेही त्यांना सांगितले.
भविष्यात अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी, ध्रुव हेलिकॉप्टर चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आणि देखभाल प्रोटोकॉल वाढवण्यावरील HALच्या वचनबद्धतेवर, सुनील यांनी जोर दिला.
ALH ध्रुव हे भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व शाखांनी ऑपरेट केलेले एक बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. विविध लष्करी आणि नागरी उपयोगांसाठी पश्चिमी बनवलेल्या हेलिकॉप्टरच्या तुलनेत हे एक खर्च-प्रभावी पर्याय म्हणून विकले गेले आहे.