कॉम्बेट एअर टीमिंग सिस्टम- ‘CATS Warrior’, या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारा विकसित अत्याधुनिक मानवरहित विंगमॅन ड्रोनने, बेंगळुरूमधील एरो इंडिया 2025 मध्ये लक्षवेधी सादरीकरण केले. पूर्ण-आकारातील प्रोटोटाइप म्हणून अनावरण केलेले CATS वॉरिअर, हे पुढील पिढीचे मानवरहित कॉम्बॅट एरियल व्हेइकल (UCAV) आहे, जे भारतीय वैमानिकांना समर्थन प्रदान करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. त्यांचे बहुप्रतिक्षित असे पहिले उड्डाण या वर्षाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे.
CATS वॉरिअर कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना, HAL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी.के. सुनील यांनी, 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका मिडिया संवादादरम्यान सांगितले की, ”हा प्रकल्प HAL च्या तांत्रिक कौशल्याचा आणि भारतीय वायुसेनेच्या (IAF) लढाऊ क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठीची वचनबद्धता दर्शवितो.” “हे पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करणारे एक उत्पादन आहे, जे आमच्या अत्याधुनिक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाला बळकटी देते,” असेही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या पूर्ण-आकाराच्या प्रात्यक्षिकाच्या यशस्वी इंजिन ग्राउंड रननंतर, CCATS वॉरियरला, अष्टपैलुत्वासाठी डिझाईन केलेले आणि कमी-निरीक्षण करण्यायोग्य UCAV म्हणून स्थान देण्यात आले आहे, जे बहुउद्देशीय कार्यांसाठी डिझाइन केले आहे. गुप्तपणे गस्त घालणे, शत्रूंची माहिती संपादन करणे आणि निश्चित लक्ष्यांवर अचूक हल्ले करणे यासाठी हे डिव्हाईस सक्षम आहे. मदरशिप एअरक्राफ्टद्वारे हे उपकरण ऑपरेट केले जाते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे स्वयंचलित प्रणालीवर मिशन्स पूर्ण करु शकते आणि आपल्या बेसवर परत येऊ शकते. ‘LCA तेजस’ सारख्या मानवाधारित लढाऊ विमानांसोबत समर्पक असलेल्या या ड्रोनला, “लॉयल विंगमॅन” म्हणून कार्य करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, जे ऑपरेशनल कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ करत आहे.
HAL च्या एअरक्राफ्ट रिसर्च आणि डिझाइन सेंटरमध्ये विकसित केलेले- CATS वॉरिअर, हे CATS कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण घटक हे. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक शस्त्रसाठा आहे, ज्यात दोन नवीन पिढीचे शॉर्ट- किंवा बियॉंड-व्हिज्युअल-रेंज एअर-टू-एअर मिसाइल्स, बाहेरुन लावले गेले आहेत आणि दोन DRDO स्मार्ट अँटी-एअरफिल्ड वेपन्स (SAAW) आतल्या बाजूने लावले आहेत. हे ड्रोन शत्रूच्या हवाई क्षेत्रात ७०० किमी पर्यंत प्रवेश करू शकतात, ज्यामुळे हवाई युद्धामध्ये ते नक्कीच एक ‘गेम-चेंजर’ ठरू शकतात. त्याच्या स्टेल्थ क्षमतांमुळे, शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींना त्याचा शोध घेणे अधिक कठीण होऊन होते. या वैशिष्ट्यांमुळे यू.एस., रशिया आणि प्रमुख युरोपीय देशांच्या प्रणालींसोबत, जगातील सर्वात प्रगत UCAVs मध्ये या ड्रोनचा समावेश होतो.
CATS वॉरिअरचे विकास महत्त्वपूर्ण क्षणी होत आहे, कारण सध्या भारतीय हवाई दलाला सक्रिय लढाऊ स्क्वाड्रनमध्ये तुटवडा भासत आहे. CATS कार्यक्रम भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताकदीचे स्थिरीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, जोपर्यंत पुढील पिढीचे लढाऊ विमान, जसे की अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) आणि तेजस Mk-II, पुढील दशकात ऑपरेशनल होतात.
CATS कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उच्च-उंचीवरील गुप्तचर आणि स्वयंचलित गहरी घुसखोरी अचूक हल्ले स्टॅंडऑफ अंतरावर करण्यास सक्षम असलेल्या प्रगत हवाई प्लॅटफॉर्म्सचे विकास, ज्यामुळे पायलटचा धोका कमी होईल. यासाठी, HAL च्या CATS उपक्रमात विविध प्लॅटफॉर्म्स आहेत, जे प्रत्येक आधुनिक हवाई युद्ध ऑपरेशन्समध्ये विशिष्ट भूमिका बजावण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
CATS वॉरिअरची ओळख, भारताच्या हवाई युद्ध धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. स्वयंचलित प्रणालींचे समावेश करून, ते केवळ ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवतेच नाही तर पायलटच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देते. कार्यक्रम पुढे जात असताना, CATS वॉरिअर- भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि ते पुढील पिढीच्या युद्धात आघाडीवर राहील याची खात्री करेल.