मंगळवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांना, अमेरिकेने गाझा पट्टीवर नियंत्रण आणण्यासाठीच्या त्यांच्या योजनेंतर्गत कायस्वरुपी विस्थापित होणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांना स्विकारण्याची विनंती केली. मात्र, जॉर्डन यांनी ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला साफ नकार दिला.
व्हाईट हाऊसमध्ये अरब देशाच्या शासकांसोबत बोलताना, ट्रम्प यांनी सूचित केले की, ‘ते त्यांच्या योजनेवर ठाम राहतील, ज्यामध्ये अमेरिका गाझा पट्टीचा ताबा घेईल आणि तिथल्या पीडित रहिवाशांना इतरत्र हलवून, त्या युद्धग्रस्त प्रदेशाला “मिडल इस्टचा रिविएरा” म्हणून नवी ओळख देणार.’
‘इस्रायलच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या एन्क्लेव्हचा पुनर्विकास करण्याच्या त्यांच्या प्रस्तावानुसार, पॅलेस्टिनींना त्यांच्या घरी परतता येणार नाही’, असे सांगून ट्रम्प यांनी अरब जगाला खिजवले आहे.
“आम्ही आमच्या योजनेवर ठाम असून, त्याची पूर्तता करण्यावर आम्ही जोर देऊ. आमच्या या योजनेमुळे मध्यपूर्वेतील लोकांसाठी अनेक रोजगार निर्माण होतील,” असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘त्यांच्या या निर्णयामुळे गाझा प्रदेशात “शांती” प्रस्थापित होईल,’ असेही ते म्हणाले.
राजा अब्दुल्ला यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘त्यांनी गाझामधील पॅलेस्टिनी लोकांच्या विस्थापनाविरुद्ध तसेच त्यांच्या देशाच्या सीमेला लागून असलेल्या वेस्ट बँकांबाबत, जॉर्डनच्या “तटस्थ भूमिकेचा” पुनरुच्चार केला आहे.’
“ही एकसंध अरब स्थिती आहे,” असे त्यांनी X द्वारे एका पोस्टमध्ये म्हटले आहे. “पॅलेस्टिनींना विस्थापित न करता गाझाची पुनर्बांधणी करणे आणि गंभीर मानवतावादी परिस्थितीकडे लक्ष देणे, हे सर्वांसाठी प्राधान्य असले पाहिजे,” असेही त्यांनी यात लिहीले आहे.
जॉर्डनच्या समकक्षाच्या मतांना विरोध करत, ट्रम्प यांनी सांगितले की, ‘जॉर्डन आणि इजिप्त अखेरीस गाझाच्या विस्थापित रहिवाशांना आश्रय देण्यास सहमत होतील. दोन्ही देश अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहेत.’
“मला विश्वास आहे की, योग्य वाटाघाटींनंतर आम्ही जॉर्डनमध्ये किंवा इजिप्तमध्ये एक भूखंड मिळवू,” असे ट्रम्प म्हणाले. “मला वाटते की जेव्हा आम्ही आमच्या चर्चांचा समारोप करू, तेव्हा आमच्याकडे एक असे ठिकाण असेल, जिथे सर्व निर्वासित खूप आनंदी आणि सुरक्षित राहतील.”
अमेरिकेच्या मदतीवर प्रश्नचिन्ह
ट्रम्प आपल्या निवेदनात म्हणाले की, “आम्ही जॉर्डनला आणि इजिप्तला भरपूर पैसे देतो, पण त्यांनी मला अशी धमकी देण्याची गरज नाही. मला वाटते की, आम्ही त्या पातळीवर नाही,”
किंग अब्दुल्ला यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, ते जमीन जोडण्याच्या आणि पॅलेस्टिनींना विस्थापित करण्याच्या कोणत्याही हालचालींचे समर्थन करत नाही. गाझा योजना सुरू झाल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणारे ते पहिले अरब नेते आहेत.
दोन्ही नेते एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवत असताना, 1948 मध्ये इस्रायलच्या निर्मितीला वेढलेल्या युद्धादरम्यान अनेकांनी पळून गेलेल्या भूमीवर परत जाण्याच्या, पॅलेस्टिनींच्या हक्काची संवेदनशीलता लक्षात घेता, गाझाबद्दलच्या ट्रम्पच्या टिप्पण्यांनी राजा अब्दुल्ला यांना एक विचित्र पेचात टाकले आहे.
ट्रम्प यांनी, किंग अब्दुल्ला यांना गाझातील पॅलेस्टिनींना आसरा देण्याची विनंती केली आहे. यावर किंग अब्दुल्ला यांनी सांगितले की, ‘ते प्रथम त्यांच्या देशाच्या हिताचा विचार करतील आणि मगच पुढचा निर्णय घेतील.’ मात्र तूर्तास जॉर्डन गाझामधील 2,000 आजारी मुलांना उपचारासाठी मदत करेल, असे अब्दुल्ला यांनी जाहीर केले आणि त्यांच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले.
जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री- अयमन सफादी यांनी, सरकारी मालकीच्या अल-मामलाका या न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, ‘गाझा येथील लोकांना विस्थापित न करता, पुनर्बांधणी करण्याची इजिप्तच्या नेतृत्वाखालील अरब योजना आहे.’
चर्चेपूर्वी जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सार्वजनिक मतभेद टाळायचे आहेत. ट्रम्प यांनी- ते जॉर्डनच्या राजाला कठीण परिस्थितीत आणू शकतात, अशी जी टिप्पणी केली होती, ती त्यांना अजिबात रुचली नव्हती.
राजाचा मुलगा- क्राउन प्रिन्स हुसेन, सफादी, परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि इतर अधिकारी देखील, यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांसमोर बोलले. राजा नंतर रिपब्लिकन बहुसंख्य नेते- जॉन थुनसह यांनी US सिनेटर्सच्या द्विपक्षीय गटाची भेट घेतली.
सौदी अरेबिया, सीरिया, इस्त्राईल आणि व्याप्त वेस्ट बँक यांच्यामध्ये सँडविच झालेल्या जॉर्डनमध्ये, आधीच 11 दशलक्ष लोकसंख्येपैकी- 2 दशलक्षाहून अधिक पॅलेस्टिनी निर्वासित आहेत, त्यांची स्थिती आणि संख्या दीर्घकाळ देशाच्या नेतृत्वासाठी चिंतेचे कारण बनते आहे.
नाजूक युद्धविराम
ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे, इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यातील नाजूक युद्धविरामासह, संवेदनशील गतीशीलतेमध्ये नवीन गुंतागुंत निर्माण झाली आहे.
हमासने सोमवारी सांगितले की, ते पुढील सूचना मिळेपर्यंत गाझामधून इस्रायली ओलीसांना सोडणे थांबवेल. कारण, इस्रायल गाझावरील हल्ले थांबवण्याच्या कराराचे उल्लंघन करत आहे. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी, उरलेल्या सर्व ओलिसांना शनिवारपर्यंत सोडले नाही, तर ट्रम्प यांनी नंतर युद्धविराम रद्द करण्याचा प्रस्ताव दिला.
ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, जर हमासने अंतिम मुदत पूर्ण केली नाही तर “सर्व पैजा रद्द होतील” आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट असे करेल, असे त्यांना वाटत नाही.
7 ते 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या रॉयटर्स/इप्सॉस पोलमध्ये- चार पैकी तीन अमेरिकन (74%) म्हणाले की, त्यांनी- अमेरिकेने गाझा ताब्यात घेण्याच्या आणि तेथे राहणाऱ्या पॅलेस्टिनींना विस्थापित करण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, रिपब्लिकन या मुद्द्यावर 55% विरोधक आणि 43% समर्थक, अशाप्रकारे विभागले गेले आहेत.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)