BEL, Safran भारतात तयार करणार ‘HAMMER स्मार्ट वेपन प्रणाली’

0
HAMMER

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), आणि फ्रेंच फर्म Safran Electronics & Defence यांनी एकत्र येऊन, HAMMER (हायली एजाइल मॉड्युलर मॉड्युलर रॅन्ग्युई-एअर-एक्स्टेन्शन प्री-एयरनॅप्शन)या स्मार्ट वेपन सिस्टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीचे उत्पादन, कस्टमायझेशन, विक्री आणि देखभाल या सगळ्यासाठी, भारतात एक संयुक्त उपक्रम स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर, तिनही कंपन्यांनी स्वाक्षरी केली आहे. बुधवारी बेंगळुरू येथील, एरो इंडिया 2025 या कार्य्रक्रमात या कराराची औपचारिकता पार पडली.

HAMMER ही एक लढाईसाठी सिद्ध- उच्च-परिशुद्ध शस्त्र प्रणाली आहे, जी तिच्या मॉड्यूलर डिझाइनसाठी ओळखली जाते आणि ज्यामुळे ती राफेल आणि LCA तेजस सारख्या लढाऊ विमानांसह अनेक प्लॅटफॉर्मसाठी अनुकूल ठरते.

या सहकार्यावर भाष्य करताना, BEL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक- मनोज जैन म्हणाले की, “BEL आणि Safran Electronics & Defence यांच्यातील हा प्रस्तावित संयुक्त उपक्रम, भारताच्या संरक्षण उत्पादनातील क्षमता मजबूत करण्यासाठी आणि प्रगत शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये आत्मनिर्भरता आणण्याच्या  दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. ‘हॅमर’चे हे स्थानिक उत्पादन, भविष्यातील नवनवीन प्रणाली विकसित करण्याच्या कल्पनांना चालना आणि प्रोत्साहन देईल. तसेच शस्त्र प्रणालींच्या आयातीतील अवलंबत्व कमी करून, भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत‘ या उपक्रमाला पाठिंबा देईल.

Safran Electronics & Defence चे CEO- फ्रँक सौडो यांनी काहीशा अशाच भावना व्यक्त केल्या. “हा संयुक्त उपक्रम, Safran Electronics & Defence साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. Safran चे कौशल्य BEL च्या स्मार्ट आणि मार्गदर्शित युद्धसामग्रीच्या क्षमतांशी जोडून, ​​आम्ही Safran च्या भारतातील औद्योगिक उपस्थितीला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच ​​भारताच्या संरक्षण प्रयत्नांनाही पाठिंबा देत आहोत,” असे सौडो यावेळी म्हणाले.

संयुक्त उपक्रम कराराचा एक भाग म्हणून, भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या- संयुक्त उपक्रम उत्कृष्ट केंद्राची देखील स्थापना करेल. हे केंद्र भारतीय सशस्त्र दलांसाठी संयुक्त उत्पादन, अभियांत्रिकी आणि देखभाल सेवा पुरवेल. ज्यात ऑपरेशनल मेंटेनन्स, दुरुस्ती तसेच ऑप्ट्रोनिक्स आणि नेव्हिगेशन उपकरणांची दुरुस्ती यांचा समावेश असेल. याशिवाय Safran एक ज्ञान हस्तांतरण कार्यक्रम राबवेल, ज्यात टप्प्याटप्प्याने उत्पादन केले जाईल, तर BEL अंतिम जोडणी, चाचणी आणि गुणवत्ता परिक्षाणाचे नेतृत्व करेल.

या संयुक्त उपक्रमामुळे, प्रगत शस्त्र प्रणालींमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेला चालना मिळेल आणि वाढत्या स्वदेशी संरक्षण परिसंस्थेत आवश्यक योगदान दिले जाईल, अशी आशा आहे.

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here