भारत SU-57 फायटरच्या प्रस्तावाचे मूल्यांकन करत आहे- रशियन अधिकारी

0
SU-57
रशियाचे 5th Gen- सुखोई Su-57 स्टेल्थ फायटर जेट

रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला आहे की, भारत नवी दिल्ली येथे, 5th Gen च्या सुखोई Su-57 स्टेल्थ फायटर जेट्स तयार करण्याच्या रशियाच्या प्रस्तावावर मूल्यांकन करत आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, रशियन फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशनचे संचालक- दिमित्री शुगाएव यांनी सांगितले की, “भारत याबाबत विचार करत आहे.” अबूधाबी, UAE येथे सुरू असलेल्या ‘IDEX 2025’ या आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भारत आणि अमेरिका आपली संरक्षण भागीदारी वाढवत असताना, प्रगतीच्या दिशेने हे एक नवीन पाऊल टाकले गेले आहे, ज्यामध्ये नुकतीच 10 वर्षांच्या रणनीतिक कराराची घोषणा करण्यात आली. वॉशिंग्टनने भारताला ‘F-35 स्टेल्थ फायटर जेट्स’ विकण्याचा संभाव्य प्रस्ताव देखील दिला आहे, ज्यामुळे फायटर जेट सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते.

Su-57, हे रशियाचे प्रमुख मल्टी-रोल स्टेल्थ फायटर, अत्याधुनिक अव्हियॉनिक्स, सुपर क्रूज क्षमता आणि कटर टेक्नॉलॉजीसह परिपूर्ण आहे. या विमानाने बेंगळुरूच्या Aero India 2025 मध्ये, अमेरिकन F-35 लाइटनिंग II सोबत त्याच्या उच्च-गती हवाई कौशल्यांचे सादरीकरण केले होते.

रशिया भारताच्या प्रमुख संरक्षण पुरवठादारांपैकी एक आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाच्या राज्य शस्त्र निर्यात करणाररी कंपनी Rosoboron export च्या प्रवक्त्याने नुकतेच सांगितले की, “भारताने मॉस्कोची ही ऑफर स्विकारल्यास, Su-57 चे उत्पादन भारतात याच वर्षी सुरू होऊ शकते. या करारात संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) समाविष्ट असून, हे करार रशियावर असलेल्या पश्चिमी निर्बंधांमुळे होणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्यास मदत करेल.”

दरम्यान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी सोमवारी सांगितले की, ‘भारत अमेरिकेकडून F-35 फायटर जेट्स विकत घेण्याचा “मुक्त मनाने” विचार करेल.’ मात्र त्यांनी स्पष्ट केले की, ‘अद्याप या व्यवहाराबाबत कोणतीही औपचारिक ऑफर स्विकारली नसून, अमेरिका याविषयी एक रोडमॅप तयार करत आहे.’

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, “दोन राष्ट्रांमधील संरक्षण विक्री ‘अधिक बिलीयन डॉलर्सने’ वाढवली जाईल आणि त्यांच्या प्रशासनाचा भारताला F-35 विमान पुरवठा करण्याचा मार्ग तयार आहे.”

“या वर्षापासून, आम्ही भारतासोबत लष्करी विक्री वाढवण्याचा विचार करत आहोत. आम्ही भारताला F-35 स्टेल्थ फायटर देण्याचा मार्ग तयार करत आहोत,” असेही ट्रम्प यांनी सांगितले.

लॉकहीड मार्टिन F-35, हे जगातील सर्वाधिक वापरले गेलेले 5th Gen चे फायटर विमान आहे, जे त्याची प्रगत स्टेल्थ, एव्हियोनिक्स आणि लढाऊ क्षमतांसाठी ओळखले जाते.

(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here