भारत फोर्जची सहाय्यक कंपनी असलेल्या, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) ने, अमेरिकेतील AM जनरल सोबत- भारतात बनवलेल्या ‘प्रगत तोफा’ अमेरिकेला पुरविण्याच्या उद्देशाने, एका पत्रावर (LoI) स्वाक्षरी केली आहे. अबुधाबीतील ‘IDEX 2025’ मध्ये झालेल्या या कराराने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, जो अमेरिकेला भारतीय बनावटीच्या तोफांच्या पहिल्या निर्यातीचे प्रतिनिधित्व करतो.
“हा करार म्हणजे आमच्या तंत्रज्ञानात्मक क्षमतेची साक्ष आहे आणि तोफखान्याच्या सोल्यूशन्समध्ये जागतिक नेतृत्व बनण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,” असे भारत फोर्जचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी सांगितले. “हा करार, AM जनरल सारख्या आघाडीच्या संरक्षण कंपन्यांच्या भारतावरील विश्वासाचे प्रतिक आहे.”
AM जनरलचे कार्यकारी उपाध्यक्ष- जॉन चॅडबॉर्न यांनी, यावेळी भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. “KSSL च्या सिद्ध तोफखान्याचे कौशल्य आणि तांत्रिक नावीन्यतेसाठी आमची सामायिक वचनबद्धता, यूएस संरक्षण दलांना प्रगत तोफखाना सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी प्रचंड ताकद देते,” असे त्यांनी सांगितले.
अमेरिका-भारत संरक्षण संबंध मजबूत करणे
भारत फोर्जची सहाय्यक कंपनी असलेल्या KSSL ने, स्वदेशी संरक्षण निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. या कंपनीद्वारे विविध शस्त्र प्रणाली, ऑफ-रोड संरक्षित गतिशीलता उपाय आणि उच्च तंत्रज्ञानाच्या लष्करी उत्पादने विकसित केली जात आहेत. कंपनीने तिच्या स्वतःच्या डिझाइन आणि विकास केलेल्या तोफा प्रणाली, शस्त्रास्त्रे आणि गतिशीलता उपायांची जगभरात निर्यात केली आहे.
लष्करी वाहन निर्मितीच्या विश्वात एक प्रभावशाली नेता असलेली- AM जनरल सारखी कंपनी, पुढील पिढीच्या तोफखान्याच्या प्रणालींचा शोध घेत आहे. याआधीच्या तोफखान्याच्या व्यासपीठांवरील नवीन करार, दोन्ही कंपन्यांच्या सहकार्यावर आधारित आहे, ज्यामुळे संयुक्त संरक्षण उपक्रमांमधील सखोल सहभागाचा मार्ग खुला झाला आहे.
संचालक बाबा कल्याणी, या कराराचे व्यापक महत्त्व सांगताना म्हणाले की, “अमेरिकेला महत्त्वपूर्ण भारतीय संरक्षण प्रणालींचा पुरवठा करणे हे खरोखरच क्रांतिकारक आहे. आम्हाला अभिमान आहे की, हा टप्पा गाठणारी KSSL ही पहिली भारतीय कंपनी आहे. हा व्यवहार आधुनिक युद्धासाठी सिद्ध, अत्याधुनिक तोफखान्याचे सोल्यूशन्स पुरविण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.”
टीम भारतशक्ती