प्रयागराजमधील, महाकुंभ मेळ्याचे आयोजन सुनिश्चित आणि सुरक्षित राखण्यासाठी, भारतीय लष्कराने आणि हवाई दलाने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असलेल्या या मेळाव्यात, 24 तास फ्लाइट ऑपरेशन्स राबवण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा विकासापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या, भारतीय सशस्त्र दलांनी उत्तमरित्या निभावल्या, ज्यामुळे तिथे आलेल्या लाखो भाविकांची कुंभयात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडली.
मध्यवर्ती हवाई कमांडने, IAF च्या लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल समर्थनाचे नेतृत्व केले, ज्यामुळे नागरी विमानसेवांची अखंडता सुनिश्चित झाली. भारतीय सैन्याने महाकुंभ 2025 साठी सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि पायाभूत सुविधा विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश उपक्षेत्र आणि रेड ईगल डिव्हिजनने, मोठ्या प्रमाणावर गर्दीच्या हालचालींचे व्यवस्थापन केले आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान केले. भारतीय सैन्याने पुरवलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत, चार नवीन फ्लायओव्हर, 14 रस्ते ओव्हर/अंडर ब्रिज आणि 100 हून अधिक रस्त्यांचा विस्तार करण्यात आला. याशिवाय सैन्याने विमानतळ कनेक्टिव्हिटी, रेल्वे स्थानक सुधारणा आणि मंदिर जीर्णोद्धार प्रकल्पांतही सहाय्य केले. IAF (इंडियन एअरफोर्स) आणि भारतीय सैन्य दल, या दिवसांमध्ये 24 तास भाविकांच्या मदतीसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी (HADR) तत्पर होते.
विशेषत: संगम क्षेत्रात गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या, नेव्हल आणि कॉम्बॅट गोताखोरांनी एकूण 22 लोकांना बुडण्यापासून वाचवले. “आपल्या सैनिकांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे लाखो भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात खूप मोठी मदत झाली. कुंभ मेळ्यातील त्यांची कामगिरी भारतीय सैन्याच्या मानवतावादी प्रयत्नांची वचनबद्धता दर्शवते,” असे एक वरिष्ठ लष्करी अधिकारी म्हणाले.
बामरौली एअरफोर्स स्टेशन, जो भारतातील सर्वात जुन्या एअर बेसपैकी एक आहे, ते 20 डिसेंबर 2024 ते 27 फेब्रुवारी 2025 या काळात नागरी आणि चार्टर्ड फ्लाइट ऑपरेशन्सचे मुख्य केंद्र बनले. अतिरिक्त हवाई वाहतुकीला हाताळण्यासाठी, या एअर बेसने आपले इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) CAT-II मानकावर राखले, ज्यामुळे हवामान धुरकट असतानाही सर्व ऑपरेशन्स विना अडथळा सुरू राहिली. “ATC च्या नियंत्रकांनी, फक्त IAF अधिकाऱ्यांद्वारे 2.386 निर्धारित आणि 1,112 अनिर्धारित उड्डाणे हाताळली. या कालावधीत प्रवाशांची संख्या सुमारे साडेतीन लाखांहून अधिक होती, असे एक वरिष्ठ IAF अधिकाऱ्यांनी सांगितले.
हवाई वाहतुकीच्या वाढीला ओळखून, बामरौलीच्या संपूर्ण हवाईक्षेत्राला नागरी फ्लाइट्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे सैनिकी प्रशिक्षणाच्या कार्ये तात्पुरते इतर ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे दररोजच्या फ्लाइट्समध्ये वाढ झाली—१० जानेवारीला फक्त १५ फ्लाइट्स होत्या आणि १५ फेब्रुवारीला १८६ फ्लाइट्सचा नवा रेकॉर्ड झाला. याशिवाय, संगरम क्षेत्रावर दररोज ५० हेलिकॉप्टर फ्लाइट्स ऑपरेट करण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांना देखरेख आणि आनंददायक फेरफटका दिला.
IAF ने सुरू केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कौशांबी ते विमानतळ जोडणारा चार-लेन रस्ता, बेगम बाजार येथे रेल्वे ओव्हरब्रिज आणि प्रयागराज विमानतळ टर्मिनलचा विस्तार करण्यात आला. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेश सुलभ झाला.
यात्रेकरुंना अक्षयावत कॉरिडॉरचा अनुभव करवणे
भारतीय सैन्याने, खास यात्रेकरुंसाठी अक्षयावत कॉरिडॉरच्या सुशोभीकरणाचे आणि विस्ताराचे काम हाती घेतले. हा कॉरिडोअर OD किल्ल्यातील एक पवित्र स्थळ आहे. इथल्या कार्यक्रमादरम्यान सुमारे 70 लाख यात्रेकरूंना भेट देण्याची परवानगी दिली. यात्रेकरूंची ये-जा सुलभ करण्यासाठी, सरस्वती घाटावरील समर्पित बोट सेवेद्वारे- त्रिवेणी संगमापर्यंत 56 बोटी, दोन जेट्टी, एक फ्लोटिंग प्लॅटफॉर्म आणि एक बचाव बोट तैनात करण्यात आल्या होत्या.
आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय सहाय्य
आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी, भारतीय सैन्याने उत्तर प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (UP SDMA) आणि इतर एजन्सींशी समन्वय साधून, व्यापक मॉक ड्रिल्स आयोजित केल्या. ज्यामध्ये एक बचाव समन्वय टीम, जी आधुनिक प्राथमिक उपचार आणि जखमी व्यक्तींना बिकट स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज होती. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर या टीम्सना मेळ्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले.
अनेक विशेष वैद्यकीय सुविधा देखील यादरम्यान पुरवण्यात आल्या, ज्यात मेळा क्षेत्रात एक मेडिकल एड पोस्ट, OD किल्ल्यात एक सेक्टर हॉस्पिटल, डिहायड्रेट झालेल्या यात्रेकरुंसाठी 18 बेड्सने सुसज्ज डे-केअर सेंटर आणि प्रयागराजमध्ये अतिरिक्त 50 बेड्सच्या सुविधा आदींचा समावेश होता. याशिवाय, संगम क्षेत्राजवळ एक फ्लोटिंग रुग्णवाहिका आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यासाठी तैनात करण्यात आली होती.
निवास आणि हॉस्पिटॅलिटी सेवा
भारतीय लष्कराने मेळ्यात आलेल्या यात्रेकरुंच्या राहण्याची व्यवस्था केली होती, ज्यात 223 अतिथी कक्ष, 454 डॉर्मिटरी बेड आणि 30 तंबू समाविष्ट होते. त्याचप्रमाणे, 10 विद्यमान क्वार्टर्सचे नूतनीकरण करून, त्यात सुधारित निवास सुविधांचा समावेश करण्यात आला होता.
भारतीय सैन्य आणि वायुसेनेच्या व्यापक योगदानामुळे, महाकुंभ मेळा 2025 मध्ये, लाखो भाविकांना सुनियोजीत आणि सुरक्षित व्यवस्थापनाचा अनुभव आणि लाभ घेता आला. सुरक्षा, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक व्यवस्थेतील, दोन्ही दलांचे प्रयत्न त्यांच्या सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रनिर्माणातील वचनबद्धतेचे प्रतीक ठरले, ज्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वी झाला.
टीम भारतशक्ती