फ्रान्स भेटीत जागतिक सुरक्षा आव्हानांकडे भारतीय लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले

0

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पॅरिसमधील इकोले डी ग्युर्रे येथे 68 देशांच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले. भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनाची आणि विकसित होत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीची रूपरेषा त्यांनी यावेळी मांडली.
त्यांच्या मुख्य भाषणात आधुनिक सुरक्षा आव्हाने, प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची भूमिका आणि सामूहिक स्थिरतेसाठी जागतिक सहकार्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

98 आंतरराष्ट्रीय अधिकारी उपस्थित असलेल्या या सत्रामुळे प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेप्रती भारताची बांधिलकी अधिक दृढ झाली. एक्सवरील एका पोस्टमध्ये भारतीय लष्कराने म्हटलेः

“लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 68 देशांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत इकोले डी ग्युर्रे येथे भारताचे धोरणात्मक विहंगावलोकन आणि प्रादेशिक भू-राजकीय परिस्थिती या विषयावर मुख्य भाषण केले. बदलत्या धोक्याचे वातावरण आणि वाढलेल्या आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्याची गंभीर गरज अधोरेखित करत त्यांनी भारताच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक अंतर्दृष्टी प्रदान केली.”

27 फेब्रुवारी रोजी, जनरल द्विवेदी यांनी मार्सेलजवळील कार्पियेन येथे फ्रान्सच्या स्कार्पियन डिव्हिजनच्या लाइव्ह-फायर ड्रीलला उपस्थिती लावली. या प्रात्यक्षिकात फ्रान्सच्या जग्वार, ग्रिफॉन आणि सर्वल या अत्याधुनिक लढाऊ वाहनांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यात युद्धभूमीवरील त्यांच्या प्रगत क्षमतांवर प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर, त्यांनी मार्सेलमधील एअरबस सुविधेला भेट दिली, जिथे त्यांना एरोस्पेसच्या संदर्भातील नवकल्पना आणि नेक्स्ट  जनरेशन संरक्षण प्रणालींविषयी माहिती देण्यात आली- यावेळी भारताच्या संरक्षण क्षमतांना, विशेषतः रोटरी-विंग विमानचालन क्षेत्रात, बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक विमानचालन तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यावर केंद्रित चर्चा झाली.

“लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मार्सेल येथील एअरबस सुविधेला भेट दिली, जिथे त्यांना अत्याधुनिक विमानचालन तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली आणि एअरबसने अग्रेसर केलेल्या एरोस्पेस अभियांत्रिकीची माहिती देण्यात आली. ही भेट ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी आणि विशेषतः रोटरी विंग ॲव्हिएशनमध्ये संरक्षण सज्जता बळकट करण्यासाठी जागतिक एरोस्पेस नवकल्पनांचा लाभ घेण्यासाठी भारतीय लष्कराची वचनबद्धता अधोरेखित करते,” असे एडीजीपीने एक्सवर पोस्ट केले.

या भेटीदरम्यान, जनरल द्विवेदी यांनी फोर्ट गांटेउम येथे फ्रेंच लष्कराच्या तिसऱ्या विभागाशी संवाद साधला आणि या वर्षाच्या अखेरीस फ्रान्समध्ये होणाऱ्या शक्ती या संयुक्त लष्करी प्रशिक्षण उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले ज्यात दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणि आंतरसंचालनीयता वाढविण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी या दौऱ्यामुळे लष्करी सहकार्याचे नवे मार्ग शोधले गेले यावर संरक्षण मंत्रालयाने भर दिला. जनरल द्विवेदी यांच्या चार दिवसांच्या दौऱ्याने जागतिक संरक्षण संबंधांचा विस्तार करण्याच्या आणि फ्रान्ससोबत जवळचे लष्करी संबंध वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleTri-Service Special Forces Exercise ‘Desert Hunt 2025’ Conducted In Jodhpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here