व्हाईट हाऊसला अलीकडे दिलेल्या भेटीदरम्यान झालेल्या बाचाबाचीनंतर सहमत नसूनही अमेरिका – युक्रेन खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास आपण तयार असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्याशी जोरदार झालेल्या वादावादीनंतर झेलेन्स्की यांनी बीबीसीला सांगितले की ते अजूनही अमेरिकेशी “रचनात्मक संवाद” करण्यास इच्छुक आहेत.
“मला फक्त युक्रेनसंदर्भातील त्यांची भूमिका ऐकायची आहे,” असे अध्यक्षांनी ब्रिटीश वृत्तवाहिनीला सांगितले.
ते म्हणाले, “या युद्धात आक्रमक कोण आहे हे आमच्या भागीदारांनी लक्षात ठेवावे अशी आमची इच्छा आहे.”
झेलेन्स्की यांचा व्हिडिओ संदेश
एका वेगळ्या एक्सवरील पोस्टमध्ये, झेलेन्स्की म्हणाले की अमेरिकेकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल ते कृतज्ञ आहेत.
“अर्थात, आम्हाला अमेरिकेचे महत्त्व समजले आहे, आणि आम्हाला अमेरिकेकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” असे झेलेन्स्की यांनी एक्सवर पोस्ट केले.
“असा एकही दिवस गेला नाही जेव्हा आम्हाला कृतज्ञता वाटली नसेल. आमच्या स्वातंत्र्याच्या जपणुकीसाठी ही कृतज्ञता आहे – युक्रेनमधील आमची लवचिकता आमचे भागीदार आमच्यासाठी – आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय करत आहेत यावर आधारित आहे,” असेही ते म्हणाले.
“आपल्याला शांततेची गरज आहे, अंतहीन युद्धाची नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की सुरक्षेची हमी ही याची गुरुकिल्ली आहे,” असे अध्यक्ष म्हणाले.
ब्रिटनची आर्थिक मदत
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी युक्रेनला 5 हजारांहून अधिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त 1.6 अब्ज ब्रिटीश पौंड (2 अब्ज अमेरिकन डॉलर्स) देण्याची घोषणा केली, असे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी जोरदार वादावादी झाल्यानंतर काही दिवसांनी केयर स्टारर यांनी युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी 2.2 अब्ज ब्रिटिश पौंड (2.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स) कर्जाची घोषणा केली.
शुक्रवारचा वाद
व्हायरल होत असलेल्या प्रेस व्हिडिओ फुटेजनुसार, झेलेन्स्की यांचा ट्रम्प आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्याशी शाब्दिक वाद झाला.
व्हॅन्स यांनी झेलेन्स्कीवर “अनादर” केल्याचा आरोप केला, तर ट्रम्प म्हणाले की ते “तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहेत.”
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समान प्रमाणात प्रतिसाद देत म्हटले, “आम्ही आमच्याच देशात आहोत आणि आम्ही या सर्व काळात मजबूत आहोत. त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानले आहेत (तुमच्या पाठिंब्याबद्दल).”
या जबरदस्त वादावादीनंतर झेलेन्स्की यांनी बैठक सोडली, तर युक्रेनचे अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये तेव्हाच परत येऊ शकतात “जेव्हा ते शांततेसाठी तयार असतील,” असे फर्मान ट्रम्प यांनी काढले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)