
आठवड्याच्या शेवटी लष्करी प्रशिक्षण छावणीवरील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून जखमींची संख्याही मोठी असल्याच्या वृत्ताला युक्रेनने सोमवारी दुजोरा दिला. यामागील संभाव्य निष्काळजीपणाची अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी चौकशी सुरू केली आहे.
युक्रेनच्या ड्निप्रोपेट्रोव्स्क प्रदेशातील चेरकास्के गावाजवळील नोवोमोस्कोव्स्क लष्करी प्रशिक्षण छावणीवर शनिवारी इस्कंदर-एम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला म्हणून वर्णन केलेला एक व्हिडिओ रशियन संरक्षण मंत्रालयाने शेअर केला. या ठिकाणी युक्रेनची 157 वी Mechanized Brigade तैनात होती.
मोठ्या प्रमाणात जीवितहानी
या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे रशियाने म्हटले आहे. सुमारे 30 परदेशी प्रशिक्षकांसह 150 युक्रेनियन सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा मॉस्कोने केला. मात्र यासाठी त्यांनी कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत आणि रॉयटर्सही स्वतंत्रपणे या घटनेची पडताळणी करू शकले नाहीत.
अधिकृत मृतांची संख्या अद्याप उघड झालेली नाही, परंतु युक्रेन्स्का प्रवदा यांनी सूत्रांचा हवाला देत, “अनेक डझन” सैनिक ठार आणि शेकडो जखमी झाल्याची माहिती दिली.
निस्पिल्नेने असेही नमूद केले की दनिप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशात “मोठ्या संख्येने” जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
युक्रेनचे लष्करप्रमुख ओलेक्सांद्र सिरस्की यांनी टेलिग्रामद्वारे सांगितले की रशियाने क्लस्टर शस्त्रास्त्रांसह हल्ला केला आहे मात्र त्यांनीही मृतांचा आकडा उघड केला नाही.
तपासाला सुरुवात
युक्रेनची कायदा अंमलबजावणी संस्था, स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्सने, काय चुकीचे घडले असावे याचा तपशील न देता, हल्ल्यातील संभाव्य निष्काळजीपणाची गुन्हेगारी चौकशी सुरू केल्याचे सांगितले.
युक्रेनचे भूदल कमांडर मिखाइलो द्रापाती यांनी टेलिग्रामवर सांगितले की, “आम्ही अवेळी घेण्यात आलेले निर्णय आणि आधीच्या घटनांमधून कोणतेही धडे न शिकलेले पाहत आहोत,” आणि यासाठी जबाबदार व्यक्तींना शोधून काढले जाईल. “स्पष्टीकरण किंवा औपचारिक अहवालांमागे कोणीही लपणार नाही.”
सिरस्की म्हणाले की, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आणि लष्करी तुकडीच्या कमांडरला कर्तव्यांमधून निलंबित करण्यात आले असून, बाहेरच्या बैठकांवरील बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
रशियाने केलेल्या आक्रमणाला तीन वर्षांचा काळ उलटला आहे या काळात मॉस्कोच्या सैन्याने युक्रेनियन लष्करी शैक्षणिक संस्था आणि विविध औपचारिक गॅदरिंगवर अनेकवेळा हल्ले करत मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)