
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की, यांच्यातील वादाची सर्वत्र चर्चा होत असतानाच, ट्रम्प यांनी सोमवारी असे सांगितले की, “ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनियन नेत्याशी झालेल्या विनाशकारी बैठकीनंतर वॉशिंग्टन झेलेन्स्की यांचे ‘युद्धाचा शेवट खूप दूर आहे’, हे वक्तव्य खूप वाईट असून अमेरिका फार काळ ते सहन करणार नाही.”
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘मॉस्कोबरोबरचे युद्ध संपणे फार दूर असल्याचे’, त्यांनी म्हटले होते, त्याबाबत ट्रुथ या सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत ट्रम्प म्हणाले की: “हे सर्वात वाईट विधान आहे जे झेलेन्स्की यांनी केले आहे आणि अमेरिका ते जास्त काळ सहन करणार नाही. जोपर्यंत त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आहे तोपर्यंत या माणसाला शांतता नको आहे.”
ट्रम्प यांनी, लंडनमध्ये या संकटावर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की यांची भेट घेतलेल्या युरोपियन नेत्यांनाही टार्गेट केले, ते म्हणाले की “अमेरिकेच्या मदतीशिवाय ते पुढे जाऊच शकत नाहीत.”
ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील युरोपियन देश, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याभोवती रॅली करत आहेत आणि गेल्या आठवड्यात झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील ओव्हल ऑफिसमधील वादानंतर शांतता योजना आणि युद्धविराम सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
झेलेन्स्की यांनी गेल्या शुक्रवारी, ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्ससोबत झालेल्या तणावपूर्ण वादानंतर हे वक्तव्य केले होते.
वान्स यांनी झेलेन्स्कीवर “अनादर” केल्याचा आरोप केला, तर ट्रम्प यांनी “झेलेन्स्की तिसऱ्या महायुद्धात जुगार खेळत आहेत” असे म्हटले.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, ट्रम्प यांच्या वक्तव्याला समान प्रमाणात प्रत्युत्तर देत म्हणाले की, “आम्ही आमच्या स्वत:च्या देशात आहोत आणि आम्ही दीर्घकाळापासून तग धरुन मजबूतपणे उभे आहोत.आम्ही तुमच्या समर्थनासाठी तुमचे आभारी आहोत.”
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादग्रस्त चर्चेनंतर, झेलेन्स्की मीटिंग सोडून निघून गेले. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रीया देत म्हटले की, “युक्रेनचे अध्यक्ष जेव्हा शांततापूर्ण चर्चेसाठी तयार असतील, तेव्हा चेव्हाईट हाऊसमध्ये परत येऊ शकतात.”
युक्रेनवर पुढील पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यासाठी, ट्रम्प सोमवारी त्यांच्या शीर्ष सल्लागारांची भेट घेत आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ यांनी पत्रकारांना सांगितले.
कोणत्याही युद्धविरामाची हमी देण्यासाठी शांतता रक्षकांची ऑफर देणारे परंतु यूएस “बॅकस्टॉप” देखील हवे असलेले युरोपियन नेते रविवारी लंडनमध्ये या वादाचे निराकरण करण्याच्या हताश प्रयत्नात भेटले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी, सोमवारी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी लंडनमधील नेत्यांच्या बैठकीबाबत फोनवर चर्चा केली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)