पाकिस्तानच्या खुजदारमध्ये IED स्फोट; चार ठार तर काही जखमी

0
IED

पाकिस्तानच्या खुजदार जिल्ह्यामध्ये, बुधवारी एका मोटरसायकलला जोडलेल्या सुधारित स्फोटक साधनांचा (IED) भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये चार लोक ठार झाले आणि अन्य पाचजण जखमी झाले.

नाल पोलिस स्टेशनचे हाऊस ऑफिसर (SHO) बहावल खान पिंडरानी, यांनी डॉन न्यूजला दिलेल्या माहितीत मृत्यू पावलेल्या लोकांच्या आकडेवारीची पुष्टी केली आणि सांगितले की, “जखमींपैकी एकाची स्थिती सध्या गंभीर आहे.”

SHO ने दिलेल्या माहितीनुसार, “ब्लास्ट झालेली स्फोटके एका मोटरसायकलला जोडून ठेवली होती. त्यानंतर ही मोटरसायकल एका कारच्या जवळ पार्क केली गेली आणि रिमोटच्या साहाय्याने हा स्फोट घडवला गेला.”

बॉम्ब डिफ्युज करणारे पथक ब्लास्टनंतर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या तपासातून ही प्राथमिक माहिती समोर आली.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खुजदारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जावेद जेहरी, यांनी डॉन न्यूजला सांगितले की, “स्फोट मार्केट एरियातील एका कॉलेजजवळ झाल्यामुळे, परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला.”

बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

“आतंकवादाचा संपूर्णपणे नायनाट केला गेलाच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया CM बुगती यांनी डॉन न्यूजशी बोलताना दिली.

“शांततेला विरोध करणारे नापाक घटक, त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये अपयशी ठरतील आणि या घटनेत बळी ठरलेल्या लोकांना लवकारत लवकर न्याय मिळवून दिला जाईल,” असेही ते म्हणाले.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंदस यांनी देखील स्फोटाचा निषेध करत, “मानवी जीवनाच्या हानीबद्दल दुःख व्यक्त केले.”

“दहशतवादी घटक लोकांचे मनोधैर्य खचवू शकत नाहीत, अशी भ्याड कृत्ये म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट आहे,” असे रिंद यावेळी म्हणाले.

बन्नू हल्ला

खैबर पख्तुनख्वामधील ‘बन्नू’ छावणीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्यानंतर काही दिवसांनी हा स्फोट घडवून आणला.

वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली दोन वाहने छावणीच्या परिघात घुसवली होती.

त्यानंतर सुरक्षा दलांनी किमान 16 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि हल्ल्यात पाच जवानही शहीद झाले.

पाकिस्तानमध्ये २०२२ पासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे, कारण त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये बंदी घाललेल्या तहरीक-ए-तालिबान गटाने पाकिस्तानन सरकारसोबतची युद्धविराम संधी समाप्त केली होती.

पाकिस्तान ICC Champions Trophy स्पर्धेचे आयोजन करत असाताना, देशातील हल्ले अलीकडेच वाढले आहेत.

1996 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर, पाकिस्तान पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे, ज्यात भारत आणि श्रीलंका सह यजमानपद भूषवले होते.

2009 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना घेऊन जाणाऱ्या बसवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर, परदेशी संघ पाकिस्तानला भेट देत नव्हते.

भारताने यावेळीही 50-over tournament खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.

न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळणाऱ्या भारताने आपले सर्व सामने दुबईत खेळण्याचा निर्णय घेतला.

(IBNS च्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleकाही कार निर्मात्या कंपन्यांना, ट्रम्प देणार नवीन टॅरिफमधून तात्पुरती सूट
Next article‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ साठी जपानचे मोदींकडून कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here