एस. जयशंकर यांच्यावरील हल्ल्याचा, UK परराष्ट्र कार्यालयाकडून तीव्र निषेध

0
एस. जयशंकर
लंडनमधील चॅथम हाऊस, थिंक टँकमध्ये एका कार्यक्रमात, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. फोटो सौजन्य: Official X

यूके परराष्ट्र कार्यालयाने, लंडनमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेमधील उल्लंघनाचा ‘तीव्र निषेध’ केला असून, “त्यांना कोणत्याही प्रकारे धमकी देण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न अस्वीकार्य आहे,” असा इशारा मीडिया अहवालांद्वारे दिला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री- एस. जयशंकर, गुरुवारी (IST) लंडनमध्ये चॅथम हाऊस, थिंक टँकमधील एका कार्यक्रमानंतर कारमधून निघत असताना, खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांना बलपूर्वक अडवले आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

एस. जयशंकर सध्या यूके आणि आयर्लंड या दोन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, मेट्रोपोलिटन पोलिसांनी अचानक बिघडलेल्या या परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवत कार्यवाही केली असल्याचे, मीडिया अहवालांनी सांगितले.

भारताची प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकरणी भारताने आपली प्रतिक्रिया नोंदवत म्हटले, की “अशा प्रकरणांमध्ये यजमान असलेले युके सरकार, त्यांच्या राजनैतिक जबाबदाऱ्या पूर्णपणे पाळेल आणि योग्य ती कृती करेल अशी अपेक्षा आहे.” खलिस्तान्यांना उद्देशून केलेल्या टिप्पणीमध्ये “लोकशाही स्वातंत्र्यांचा गैरवापर” अशा शब्दांत त्यांचा निषेध केला आहे.

“परराष्ट्रमंत्र्यांच्या यूके दौऱ्यादरम्यान सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे फुटेज आम्ही पाहिले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

“आम्ही फुटीरतावादी आणि अतिरेक्यांच्या या छोट्या गटाच्या चिथवणीखोर कारवायांचा निषेध करतो,” असेही ते म्हणाले.

“अशा घटकांनी लोकशाही स्वातंत्र्यांचा गैरवापर केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. अशा प्रकरणांमध्ये यजमान असलेले युके सरकार त्यांच्या राजनैतिक जबाबदाऱ्या पूर्णपणे पाळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असेही जयस्वाल पुढे म्हणाले.

ऑनलाइन फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती जयशंकर यांच्या वाहनाकडे धाव घेत भारतीय राष्ट्रध्वज फाडताना दिसत आहे तर लंडनचे पोलीस अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथे उभे असल्याचे दिसते आहेत.

पोलिसांच्या उपस्थितीत अशाप्रकारचे कृत्य घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एस. जयशंकर 4 ते 9 मार्च दरम्यान, त्यांच्या ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ही घटना घडली. ते ज्या ठिकाणी चर्चेत सहभागी झाले होते, त्या ठिकाणाबाहेर अनेक खलिस्तान समर्थकांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने करत होते.

या दौऱ्यादरम्यान ते ब्रिटिश परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांना भेटणार होते.

(टीम स्ट्रॅटन्यूज)


Spread the love
Previous article26/11 आरोपी तहव्वुर राणाची प्रत्यार्पण टाळण्यासाठी नवीन याचिका
Next articleट्रम्प यांनी मेक्सिकोवरील भरमसाट कर, 2 एप्रिलपर्यंत स्थगित केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here