कमी खर्च आणि चांगल्या गुणवत्तेमुळे वैद्यकीय उपचारांसाठी बांगलादेशी नागरिकांसाठी भारत हे पसंतीचे ठिकाण राहिले आहे. मात्र बिघडलेले संबंध असताना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा हवाला देत, वैद्यकीय व्हिसा सामान्यपणे जारी करण्याच्या बांगलादेशच्या याचिकांना भारत आता विरोध करत आहे, असे सहा सूत्रांनी सांगितले अर्थात यामुळे चीनला अशाच प्रकारच्या प्रस्तावांचा विस्तार करण्यासाठी आणि लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
2023 मध्ये बांगलादेशी लोकांसाठी भारताने दिलेल्या व्हिसांपैकी मोठा भाग परवडणाऱ्या खाजगी आरोग्यसेवा आणि बंगाली भाषिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे गेला, ज्यामुळे शेजारी देशांमधील संबंध दृढ होण्यास आणि चीनचा प्रादेशिक प्रभाव प्रादेशिक प्रभाव मर्यादित होण्यास मदत झाली.
“जेव्हा पोकळी निर्माण होईल, तेव्हा इतर लोक येतील आणि ती जागा भरतील,” असे बांगलादेशच्या चार स्त्रोतांपैकी एकाने जे त्यापैकी बहुदा राजनैतिक अधिकारी होते त्यांनी रॉयटर्सला सांगितले. “काही लोक थायलंड आणि चीनला जाण्याचा पर्याय निवडत आहेत.”
मात्र ऑगस्टपासून, भारताने प्रत्येक कामकाजाच्या दिवशी हजारपेक्षा कमी वैद्यकीय व्हिसा जारी केले आहेत, ज्यामुळे त्यांची संख्या 5 ते 7 हजारांनी कमी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताच्या दीर्घकालीन सहकारी शेख हसीना यांची जागा घेतल्यानंतर संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे.
ऑगस्टमध्ये प्राणघातक निदर्शनांपासून पळ काढत पदच्युत शेख हसीना यांनी नवी दिल्लीत आश्रय घेतला. त्यांना खटल्याच्या सुनावणीसाठी माघारी पाठवण्याच्या बांगलादेशच्या विनंतीला भारताने प्रतिसाद दिला नाही.
2023 मध्ये, भारताने बांगलादेशी नागरिकांना 20 लाखांहून अधिक व्हिसा जारी केले, त्यापैकी बहुतेक वैद्यकीय कारणांसाठी होते असे दोन्ही देशांच्या सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. मात्र संबंध बिघडल्यामुळे चीनसाठी एका आकर्षक संधीचे दार खुले झाले आहे.
या महिन्यातच, बांगलादेशींच्या एका गटाने “उपचारांसाठी वैद्यकीय पर्यटन बाजारपेठेच्या क्षमतांचा शोध घेत” युन्नानच्या नैऋत्य प्रांताला भेट दिली, असे चिनी राजदूत याओ वेन यांनी सांगितले.
अंतरिम सरकारने पदभार स्वीकारल्यापासून चीनच्या किमान 14 कंपन्यांनी बांगलादेशात 23 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, जी त्या काळातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे, असे वेन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.
बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान युनूस हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी या महिन्यात चीनला भेट देणार आहेत.
2020 मध्ये सीमेवरील चकमकीनंतर भारत ज्या चीनशी हळूहळू संबंध प्रस्थापित करत आहे, तो ढाका येथे मैत्री हॉस्पिटल उघडण्याचा विचार करत आहे, असे बांगलादेश सरकारने म्हटले आहे आणि तेथे उपचार घेऊ इच्छिणाऱ्या बांगलादेशी लोकांसाठी प्रक्रिया सुलभ केली आहे.
चीन बांगलादेशसोबत सातत्याने सखोल आणि परस्पर फायदेशीर सहकार्य शोधण्यासाठी एकत्र काम करण्यास तयार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, “चीन आणि बांगलादेश यांच्यातील सहकार्य कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करणारे नाही किंवा तिसऱ्या पक्षाच्या घटकांमुळे प्रभावित होणारे नाही.”
भारत आणि बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयांनी यावर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.
भारताच्या विलंबित व्हिसा प्रक्रिया केवळ बांगलादेश सरकारलाच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनाही परकेपणाची जाणीव करू देणारी होती, असे चार सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भारताला प्रदीर्घ काळ ढाक्याकडून प्राधान्य मिळणार नाही हे नक्की कारण हसीना यांचा पक्ष त्वरित पुनरागमन करण्याची शक्यता नाही.
भारताने व्हिसाच्या समस्येसाठी ढाका येथील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा वारंवार उल्लेख करत आपल्याला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता आहे, असे राजनैतिक अधिकारी आणि भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
हसीना यांना आश्रय दिल्याबद्दल जनमत विरोधात गेल्यानंतर, ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या राजधानीत निदर्शकांनी भारतीय सांस्कृतिक केंद्रावर हल्ला केल्यानंतर भारताने अनेक राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना बांगलादेशातील आपल्या दूतावासातून मायदेशी आणले.
भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना वैद्यकीय स्थिती अत्यंत गंभीर असलेल्या बांगलादेशी नागरिकांना भारतात उपचार मिळावेत असे वाटते, मात्र ‘बांगलादेशात स्थिरता’ असेल तेव्हाच या देशातील दूतावासामधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल.
त्यापैकी एकाने ‘बांगलादेशातील कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न’ करू पाहणारे काही नागरिक या वैद्यकीय व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे दिसून आले,” असे सांगितले.
दोन बंदरांवरील रेल्वे मार्ग आणि भारतीय आर्थिक क्षेत्रांपासून ते अणुऊर्जा प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा आणि संरक्षण खरेदीपर्यंतच्या प्रकल्पांसाठी बांगलादेशला 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भारतीय पतपुरवठा केल्याच्या पार्श्वभूमीवर व्हिसाचे हे अडथळे निर्माण झाले आहेत.
या महिन्यात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की बांगलादेशमधील त्याचे काही प्रकल्प प्रभावित झाले आहेत आणि दोन्ही बाजूंनी “प्रकल्पांच्या संदर्भात काय करता येईल यावर तर्कसंगत चर्चा” करण्यात आली आहे. मात्र, तरीही बांगलादेश आणि चीनमधील संबंधांना चालना मिळत आहे.
एका सूत्राने सांगितले की भारताने बांगलादेशातील कोणत्याही राजकारण्याशी औपचारिकपणे संवाद साधला नाही, तर दुसरीकडे बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या माजी मंत्र्याच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ नुकतेच बीजिंगच्या निमंत्रणावरून चीनला गेले होते.
या आठवड्यात, युनुसने वेनला सांगितले की बांगलादेश चीनसाठी आपली बाजारपेठ आणखी खुली करण्यास तयार आहे. त्यानुसार सौर ऊर्जा क्षेत्रातील अव्वल कंपनी लॉन्गी ग्रीन एनर्जी 601012. एसएसने बांगलादेशमध्ये कार्यालय स्थापन करण्यास आणि उत्पादनात गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली.
वेन यांनी बीएनपीच्या एका वरिष्ठ नेत्याचीही भेट घेतली असून ‘परस्पर चिंतेचे मुद्द्यांवर’ चर्चा झाल्याचे म्हणतात, परंतु त्यांनी याबाबत कोणतीही अधिक तपशील दिलेला नाही.
याउलट, युनुस आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील पहिली बैठक पुढील महिन्यात थायलंडमधील परिषदेच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे, असे दोन भारतीय सूत्रांनी सांगितले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)