भारताने Prithvi-II आणि Agni-I बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली

0

भारताने गुरुवारी, ओडिशा किनारपट्टी लगतच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) येथून, Prithvi-II आणि Agni-I या दोन शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

“या चाचण्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या देखरेखीखाली पार पडल्या असून, यावेळी सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक बाबींची यशस्वी पडताळणी करण्यात आली,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. दोन्ही क्षेपणास्त्र चाचण्या मिशनच्या उद्दिष्टांनुसार आणि कार्यप्रदर्शन मानकांनुसार यशस्वी ठरल्या.

Agni-I क्षेपणास्त्राची चाचणी अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली, त्यानंतर काही वेळातच चांदीपूरमधील लाँचिंग पॅड क्र. 3 वरून Prithvi-II या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.

Prithvi-II क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:

  • Prithvi-II हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, जे DRDO (संरक्षण संशोधन व विकास संस्था) ने भारताच्या ‘इंटिग्रेटेड गाईडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत विकसित केले आहे.
  • ते सुमारे 250–350 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते
  • 500 ते 1,000 किलोग्रॅम वजनाची, पारंपरिक आणि अण्वस्त्र दोन्ही वाहून नेण्यास सक्षम
  • सिंगल-स्टेज लिक्विड प्रोपल्शन सिस्टमद्वारे समर्थित
  • प्रगत इनर्शियल नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा समावेश

सुरुवातीला केवळ वायुदलासाठी विकसित केले गेलेले हे क्षेपणास्त्र, नंतर भारतीय लष्करातही समाविष्ट करण्यात आले.

उच्च अचूकतेसह लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले Prithvi-II, हे भारताच्या रणनैतिक क्षेपणास्त्र शस्त्रसज्जतेतील विश्वासार्ह अस्त्र मानले जाते.

Agni-I क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये: 

  • Agni-I हे रस्ते आणि रेल्वेमार्गाने सहज वाहून नेता येईल, असे मिडीयन-शॉर्ट रेंडच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे
  • ते सुमारे 700–900 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते
  • अग्नी मालिका आणि पृथ्वी मालिका यांच्यातील पल्ल्याच्या अंतराला पूरक म्हणून विकसित करण्यात आले आहे.
  • 1,000 किलोग्रॅम वजनाची अण्वस्त्र क्षमता
  • सुधारित आणि अत्याधुनिक गाइडन्स सिस्टीमचा समावेश

सन 2002 मध्ये पहिल्यांदा चाचणी घेण्यात आलेले हे क्षेपणास्त्र, 2007 मध्ये स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सेवेत दाखल झाले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleTejas Mk1A फायटरची पहिली ‘विंग असेंब्ली’ HAL कडे सुपूर्द करण्यात आली
Next articleमर्कोसुर व्यापार कराराची कॅनडाकडून मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here