MoD आणि BEL: एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार खरेदीसाठी करार

0
BEL
संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडारच्या पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत 2 हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

MoD ने (संरक्षण मंत्रालय) भारतीय लष्करासाठी एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार खरेदी करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार खरेदी (भारतीय-स्वदेशात आरेखित, विकसित आणि उत्पादित केलेले) श्रेणी अंतर्गत करण्यात आला असून संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार हा करार संरक्षण उत्पादनातील स्वावलंबनाबाबत सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.

शुक्रवारी 25 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि BEL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षरी करत करारपत्राची देवाणघेवाण केली.

किमान 70% स्वदेशी सामग्री असलेले, हे फायर कंट्रोल रडार लढाऊ विमाने, आक्रमणासाठी उपयोगात येणारी हेलिकॉप्टर्स आणि शत्रूचे ड्रोन यासह सर्व प्रकारच्या हवाई धोक्यांचा शोध घेण्यास सक्षम असतील. हा करार भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण रेजिमेंटच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि भारतीय सैन्याच्या कार्य सज्जतेत वाढ करेल, तसेच देशाच्या आर्थिक विकासातही मोलाचे योगदान देईल.

हा करार भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम (MSMEs) उद्योजकांना प्रोत्साहन देणारा असून स्वदेशी संरक्षण उत्पादन कंपन्यांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून सुटे भाग आणि कच्चा माल तयार करणाऱ्या स्वदेशी उद्योगांना संधी मिळणार आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDRDO ने घेतली ड्रोनद्वारे प्रक्षेपित अचूक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Next articleFrom Conflict to Connectivity: How Border Infrastructure Tells the Tale of Two Kashmirs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here