‘अराद’ सह भारताचा AI शस्त्र शर्यतीत सहभाग, लक्ष्यभेदापूर्वी विचार करणार

0

भारतातील लहान शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकत, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सुसज्ज असॉल्ट रायफल, अरादचे अनावरण केले आहे, ज्यामुळे संरक्षण तंत्रज्ञानातील स्वदेशी नवोपक्रमाच्या दृष्टीने एक मैलाचा स्थापित झाला आहे.

कानपूरमधील अदानीच्या अत्याधुनिक लघु शस्त्र उत्पादन सुविधेत विकसित केलेली अराद इस्रायली डिझाइनच्या मूलभूत तत्त्वांवर तयार केली गेली असली तरी भारतीय सैन्याच्या परिचालन गरजांसाठी परिष्कृत केली गेली आहे. त्याची AIचालित fire control system त्याला भारतात तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात प्रगत असॉल्ट रायफल्सपैकी एक मानली जाते.

गोळीबार करण्यापूर्वी विचार करणारी AI प्रणाली

अरादचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची AI-संचालित गोळी झाडण्याची यंत्रणा, जी प्रत्येक गोळी जास्तीत जास्त अचूकता आणि कार्यक्षमतेने झाडली जाईल याची खात्री करते.

जलदरित्या गोळीबार करणाऱ्या पारंपरिक रायफल्सच्या तुलनेत, अरादचे AI सूक्ष्म-विलंबाने गोळीबार करते, याचा अर्थ पहिल्या गोळीने आपला निशाणा साधल्यानंतरच दुसरी गोळी सोडली जाते. त्यामुळे दारूगोळ्याचा अपव्यय कमी होतो आणि विशेषतः जलद गोळीबारात रिकॉइलमुळे लक्ष्यात अडथळा आणण्यास प्रतिबंध करते.

“आज बहुतेक रायफल्स गोळीबाराच्या गतीसाठी अचूकतेचा त्याग करतात,” असे अदानी डिफेन्सच्या अधिकाऱ्याने कानपूर सुविधेच्या विशेष भेटीदरम्यान भारतशक्तीच्या प्रतिनिधीला स्पष्ट केले. “अराद हा पॅटर्न बदलतो; हे एक असे शस्त्र आहे जे गोळीबार करण्यापूर्वी शब्दशः विचार करते.”

भारतीय निमलष्करी दलात समावेश

अरादला आधीच एका आघाडीच्या निमलष्करी दलात समाविष्ट करण्यात आले आहे, जो भारताच्या संरक्षण तयारीमध्ये खाजगी क्षेत्रातील नवोपक्रमाच्या वाढत्या भूमिकेला अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

5.56×45 मिमी नाटो राउंडसाठी सुसज्ज, ही रायफल प्रति मिनिट 700-1100 राउंड फायरिंग रेट देते. वजनाला हलकी असणारी तिची बांधणी – फक्त 2.85 किलो वजनाची- पायदळाचे सैनिक आणि विशेष दलाच्या जवानांसाठी आदर्श हत्यार म्हणून उपयोगात येईल.

स्मार्ट, प्राणघातक आणि सैनिकांसाठी उपयुक्त

अरादची रचना भारतीय सैन्याच्या “एक गोळी, एक मृत्यू” या लढाऊ तत्वाला मूर्त रूप देण्यासाठी केली आहे. त्याची हलकी रचना, एर्गोनॉमिक बिल्ड आणि AI-सहाय्यित लक्ष्यीकरण यामुळे ते नुकतेच भरती झालेले तरुण आणि अनुभवी सैनिकांसाठी तितकेच योग्य शस्त्र बनते, ज्यामुळे उच्च-जोडीच्या लढाऊ परिस्थितीत रणनीतिक कार्यक्षमता वाढते.

नवीन लहान शस्त्रास्त्रे

अराद ही कानपूरमधील अदानी डिफेन्सद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या विस्तृत कुटुंबाचा एक भाग आहे, ज्यामध्ये खालील शस्त्रास्त्रे समाविष्ट आहे:

  • तीव्र आणि अभय कार्बाइन
  • जीत आणि प्रहार असॉल्ट रायफल्स
  • अचूक आणि लक्ष्य स्नायपर रायफल्स

ही शस्त्रे इस्रायली डिझाइनवर आधारित असली तरी अदानी डिफेन्स ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत त्यांचे पद्धतशीरपणे स्वदेशीकरण करत आहे, असा कंपनीचा दावा आहे.

भविष्यातील मोठे संरक्षण करार

भारतीय सशस्त्र दलांसाठी 4.25 लाख कार्बाइन तयार करण्यासाठी DRDOच्या सहकार्याने काम करणाऱ्या 2 हजार कोटी रुपयांच्या कार्बाइन उत्पादन करारात अदानी डिफेन्स हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. हा कार्यक्रम आधुनिक लढाईसाठी योग्य असलेल्या हलक्या, कार्यक्षम शस्त्र प्रणालीसाठी भारतीय सशस्त्र दलांची दीर्घकालीन गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या करारानुसार, अदानीची कानपूर येथील सुविधा एकूण गरजेच्या 40 टक्के उत्पादन करेल, ज्यामुळे भारताच्या खाजगी संरक्षण उत्पादन क्षेत्रात त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.

AI आणि छोट्या भारतीय शस्त्रास्त्रांचे भवितव्य

अरादच्या प्रक्षेपणासह, अदानी डिफेन्सने पारंपरिक शस्त्रांच्या रचनेच्या पलीकडे जाऊन AI, अचूक अभियांत्रिकी आणि स्वदेशी उत्पादन यांचे विलीनीकरण केले आहे.

भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन वाढवत असताना, अशा AI एकात्मिक स्मार्ट शस्त्रे, सामरिक श्रेष्ठतेसह तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करून, सशस्त्र दलांच्या पुढच्या पिढीला आकार देऊ शकतात.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleBreaking The Silos: India’s Journey Towards Theatre Commands
Next articleAdani Plant Aims to Meet All Small Arms Ammo need by 2030

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here