स्वामीनाथन वेस्टर्न फ्लीटचे प्रमुख तर वात्सायन नौदलाचे उप-प्रमुख झाले

0

भारतीय नौदलातील महत्त्वपूर्ण नेतृत्व बदलात, व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी 47 वे नौदलाचे उपप्रमुख (VCNS) म्हणून पदभार स्वीकारला, तर आधीचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी 31 जुलै रोजी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला. चार दशकांच्या कारकिर्दीनंतर निवृत्त झालेल्या व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंग यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली.

 

व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन, गनरी आणि क्षेपणास्त्र प्रणालींचे तज्ज्ञ असून, तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. कमांड आणि धोरणात्मक अनुभव घेऊन उप-प्रमुख म्हणून ते काम पाहतात. 1 जानेवारी 1988 रोजी नौदलात रुजू झालेल्या आणि NDA च्या 71 व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी असलेल्या त्यांनी INS विभूती, INS. नशाक, INS कुथार आणि INS सह्याद्री यासह अनेक प्रमुख युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे आणि गलवान घटनेनंतर  वाढलेल्या सागरी हालचालींच्या महत्त्वपूर्ण काळात पूर्वेकडील ताफ्याचे नेतृत्व केले आहे.

एक चतुर नियोजक म्हणून त्यांनी संचालक नौदल योजना आणि सहाय्यक नौदल प्रमुख (धोरण आणि योजना) यासह प्रमुख स्थानी आपले नेतृत्व गुण दाखवले आहेत. इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उप प्रमुख (ऑपरेशन्स आणि नंतरचे धोरण, योजना आणि सैन्य विकास) म्हणून त्यांच्या अलीकडील कार्यकाळात त्यांनी सर्व सेवांमध्ये संयुक्तता, एकात्मता आणि स्वदेशीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अपवादात्मक नेतृत्व आणि सेवेसाठी त्यांना 2021 मध्ये अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

स्वामीनाथन पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ


संदेशवहन आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील तज्ज्ञ  फ्लॅग ऑफिसर  व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजु झाले. त्यांनी खडकवासला इथली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, युनायटेड किंगडममधील श्रीव्हेनहॅम इथले जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, करंजा इथले नौदल युद्ध महाविद्यालयआणि अमेरिकेतील न्यूपोर्ट  ऱ्होड आयलंड मधील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

फ्लॅग ऑफिसर  व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांनी आपल्या नौदलच्या आजवरच्या कारकिर्दीत विद्युत आणि विनाश या क्षेपणास्त्र नौका, क्षेपणास्त्रसज्ज कुलिश ही गस्त युद्धनौका, म्हैसूर ही गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका आणि विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाच्या नेतृत्वासह, अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

यासोबतच फ्लॅग ऑफिसर  व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांनी कोची इथल्या दक्षिण नौदल कमांडच्या मुख्यालयात चीफ स्टाफ ऑफिसर (प्रशिक्षण) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भारतीय नौदलाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नौदलाच्या सुरक्षा संघटनेच्या उभारणीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय सागरी प्रशिक्षणाचे फ्लॅग ऑफिसर या नात्याने त्यांनी नौदलाच्या वर्क-अप संघटनेचे प्रमुखपदही भूषवले होते.

operational safety विषयाचे वकील असलेल्या त्यांनी भारतीय नौदल सुरक्षा पथकाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर JNU मधून BSc, दूरसंचारमध्ये MSc., संरक्षण अभ्यासात MA, धोरणात्मक अभ्यासात MPhilआणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात PhD यांचा समावेश आहे.

दोन्ही नियुक्त्या नौदलाच्या नेतृत्वातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवणाऱ्या आहेत कारण त्यामुळे इंडो-पॅसिफिकमध्ये आधुनिकीकरण, संयुक्तता बळकट करणे आणि आपल्या धोरणात्मक पदचिन्हाचा विस्तार होत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleऑस्ट्रेलियाचा टॅरिफ कमी ठेवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय
Next articleकीववर रशियाचा भीषण हल्ला; 2 लहान मुलांसह 16 जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here