शुल्क कपातीचा आदेश मिळवण्यासाठी, जपानचे समन्वयक अमेरिकेला रवाना

0

मंगळवारी, जपानचे प्रमुख शुल्क वाटाघाटी अधिकारी- रयोसेई अकाझावा यांनी सांगितले की, “ते वॉशिंग्टनकडे रवाना होत आहेत, जिथे ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेला- जपानी वाहन आयातीवरील शुल्क कपातीचा आदेश (executive order) लवकरात लवकर स्वाक्षरित व्हावा, याबाबत पाठपुरावा करणार आहेत.

मागील महिन्यात झालेल्या व्यापार करारात, अमेरिकेने सध्या अस्तित्वात असलेले जपानी वाहन आयातीवरील 27.5% शुल्क कमी करून 15% करण्यास तयारी दर्शवली होती, मात्र ही कपात कधीपासून लागू होई, याबाबत कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नव्हते.

जपानच्या इतर वस्तूंवरील शुल्कही गुरुवारपासून 25% वरून 15% करण्यात येणार आहे.

अकाझावा यांनी संसदेत सांगितले की, “आम्ही अमेरिकेवर दबाव टाकणार आहोत की, त्यांनी लवकरात लवकर वाहन आणि वाहनासंबंधी घटकांवरील शुल्क कपातीसाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करावी.”

सुस्पष्ट आदेश नाहीत

“स्टॅकिंग” (stacking) समस्येचा उल्लेख करताना, जिथे एका वस्तूवर अनेक शुल्क लादले जाऊ शकतात, अकाझावा यांनी सांगितले की, “ज्या वस्तूंवर आधीच 15% पेक्षा जास्त शुल्क आहे, त्यांच्यावर अतिरिक्त 15% शुल्क लागू होऊ नये, याची खात्री जपानला हवी आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या, 31 जुलैच्या कार्यकारी आदेशासोबत जोडलेल्या तक्त्यात युरोपियन युनियनसाठी “नो स्टॅकिंग” (no stacking) अशी अट स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती, मात्र जपानसाठी अश्या कोणत्याही अटीची स्पष्टता दिली गेलेली नव्हती.

अकाझावा यांनी संसदेत सांगितले की, “युरोपियन युनियनप्रमाणेच जपानलाही “नो स्टॅकिंग” या अटीत सामाविष्ट करण्यात येईल, अशी हमी अमेरिकेकडून मिळाली आहे.”

550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

अकाझावा यांनी स्पष्ट केले की, ‘शुल्क करारात नमूद केलेल्या जपानच्या 550 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक पॅकेजबाबत अमेरिकेशी कोणताही गैरसमज नाही.’

“आम्ही वारंवार अमेरिकेला स्पष्ट केले आहे की जपान ५५० अब्ज डॉलर्सपर्यंत इक्विटी (भांडवली), कर्ज आणि हमी या स्वरूपात गुंतवणूक करणार आहे, विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या पुरवठा साखळी (supply chains) निर्माण करण्यासाठी आणि हीच आमची सामूहिक सहमती आहे,” असे अकाझावा म्हणाले.

‘या गुंतवणुकीपैकी फक्त 1-2% हिस्सा इक्विटी गुंतवणुकीचा असेल,’ असेही त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहाँगकाँगने Black Rain चा इशारा देत, सार्वजनिक सेवा केल्या बंद
Next articleब्रिटन- फ्रान्स स्थलांतरितांसाठी परतीच्या कराराला मान्यता देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here