Akash आणि MTA मिसाईलच्या चर्चेसह, भारत-ब्राझील संरक्षण संबंधांना चालना

0

येत्या ऑक्टोबरमध्ये, ब्राझीलचे संरक्षणमंत्री भारत भेटीवर येणार असून, दोन्ही देश अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील उच्चस्तरीय चर्चांना गती देण्याच्या तयारीत आहेत. या भेटीमध्ये, मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) प्रकल्प आणि भारताची स्वदेशी Akash क्षेपणास्त्र प्रणाली, हे दोन्ही विषय क्रेंद्रस्थानी असतील.

ही भेट, जिओपॉलिटिकल समीकरणांतील बदल आणि जागतिक संरक्षकवादाच्या वाढत्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्यामध्ये ट्रम्प प्रशासनाच्या काळातील अमेरिका-विरोधी व्यापार धोरणांचाही समावेश आहे. भारतासाठी ही अत्यंत महत्वाचा क्षण आहे, कारण आपल्या संरक्षण आयातीमध्ये विविधता आणणे आणि साऊथ टू साऊथ भागीदारी अधिक दृढ करणे हे प्रमुख राष्ट्रीय उद्दिष्ट बनले आहे.

‘C-390 मिलेनियम’ चर्चेच्या केंद्रस्थानी

या द्विपक्षीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, ब्राझीलच्या Embraer कंपनीने विकसित केलेले C-390 Millennium – एक मल्टी-मिशन लष्करी ट्रान्सपोर्ट विमान, जे लवकरच भारतीय हवाई दलाच्या MTA प्रोग्राममध्ये सामील होऊ शकते. Embraer ने आधीच, IAF च्या RFI (Request for Information) ला प्रतिसाद दिला आहे, ज्यात 80 विमानांची विक्री सुचवण्यात आली आहे. प्रत्येक विमानाची किंमत सुमारे $150 दशलक्ष इतकी आहे. हा करार अंतिम झाल्यास, Embraer साठी हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय संरक्षण करार ठरू शकतो.

भारतामध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी Embraer ने, अलीकडे नवी दिल्लीतल्या एअरोकिटीमध्ये एक पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. ही नवीन ऑफिस अभियांत्रिकी, खरेदी, आणि urban air mobility वर लक्ष केंद्रित करणार असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत असेल.

“भारत ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे,” असे Embraer चे अध्यक्ष आणि CEO फ्रान्सिस्को गोमेस नेटो यांनी भारतशक्तीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. “ही विस्तार योजना भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञान विकासाबाबतच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे,” असेही ते म्हणाले.

या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे, Embraer आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स यांच्यात मागील वर्षी झालेली MoU, ज्यामध्ये C-390 चे भारतात सह-विकसन आणि उत्पादन करण्याचा मानस आहे.

‘आकाश’ क्षेपणास्त्र अजूनही ब्राझीलसाठी महत्वाचे

दुसऱ्या बाजूला, भारताचे DRDO द्वारे विकसित केलेले ‘Akash क्षेपणास्त्र’ हे देखील चर्चेतील मुख्य मुद्दा आहे. हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ब्राझीलच्या Medium/High Altitude Air Defence Artillery System साठी शॉर्टलिस्ट झाले असून, फक्त चीनचे Sky Dragon 50 हे दुसरे शिल्लक स्पर्धक आहे.

जरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यातील अलीकडील चर्चांमध्ये आकाशचा थेट उल्लेख झाला नाही, तरी ब्राझीलचे अधिकारी म्हणतात की ही प्रणाली “तांत्रिकदृष्ट्या सक्षम” असून अजूनही चर्चेत आहे.

तथापि, हा प्रकल्प काहीसा विलंबित झाला आहे – ब्राझीलकडून अर्थसंकल्पीय व तांत्रिक मर्यादा, तर भारताकडून इज्रायली व फ्रेंच संरक्षण कंपन्यांच्या लॉबिंगमुळे प्रक्रिया संथ झाली असल्याचे संकेत मिळाले आहेत.

तरीही ब्राझीलने स्पष्ट केले आहे की आकाश आणि C-390 यांचे व्यवहार स्वतंत्र आहेत, आणि आकाशशी संबंधित विलंबाचा प्रभाव भारताने Embraer च्या प्रस्तावावर टाकू नये.

लुला यांच्या 2026 भेटीच्या पार्श्वभूमीवर, धोरणात्मक चालना

संरक्षणमंत्र्यांच्या भारत भेटीमुळे 2026 मध्ये अपेक्षित राष्ट्रपती लुला यांच्या अधिकृत दौऱ्याला धोरणात्मक दिशा मिळेल. याचबरोबर उपाध्यक्ष जेराल्डो आल्कमिन देखील या ऑक्टोबरमध्ये भारतात येणार असून, Trade Monitoring Mechanism च्या अंतर्गत ऊर्जा, संरक्षण, महत्त्वाच्या खनिज साधनसंपत्ती, डिजिटल समावेश आणि इतर क्षेत्रांतील सहकार्यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.

दोन्ही देशांतील संरक्षण भागीदारीचा आणखी एक पैलू म्हणजे, ब्राझीलच्या Taurus Armas S.A. आणि CBC या शस्त्र उत्पादक कंपन्यांनी भारतातील SSS Defence आणि जिंदाल डिफेन्स यांच्यासोबत केलेले सहउत्पादन करार.

औद्योगिक व एव्हिएशन सहकार्य दृढ

संरक्षण क्षेत्राच्या पलीकडेही, भारत आणि ब्राझील एकत्र नौदल प्लॅटफॉर्म्स, लघु शस्त्रे, आणि सहभागी पाणबुडी कार्यक्रमांवर काम करत आहेत – Scorpion Club उपक्रमाअंतर्गत Scorpène वर्गातील पाणबुड्यांचे प्रशिक्षण सामायिक केले जात आहे.

Embraer ची विमान वाहतूक शाखा देखील भारताच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी धोरणाशी संलग्न होत आहे. E-Jet मालिका विमानांचा वापर Star Air मार्फत सुरू असून, हे विमान टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील हवाई सेवा सक्षम करत आहे – जिथे मोठी विमाने फायदेशीर ठरत नाहीत.

ऑक्टोबरमध्ये होणारी ब्राझीलच्या संरक्षण मंत्र्यांची भेट, भारत आणि ब्राझील या लोकशाही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, जिथे साऊथ टू साऊथ सहकार्याचे भविष्य दोन्ही देश एकत्र घडवणार आहेत.

– हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleIndia-Brazil Defence Ties Set to Deepen as MTA and Akash Missile Top Agenda
Next articleMake In India At An Inflexion Point, Ready For 2.0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here