BLA वर अमेरिकेचा दहशतवादाचा ठसा, हेतूंबाबत प्रश्नचिन्ह कायम

0
BLA

11 ऑगस्ट रोजी बलुचिस्तान आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना अमेरिकेने पाकिस्तानस्थित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिचेच भावंडं असणाऱ्या मजीद ब्रिगेड यांना ‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध’ असल्याचे सांगत परदेशी दहशतवादी संघटना (FTO) म्हणून घोषित केले.

मात्र, बलुच नेते मीर यार बलोच यांच्या मते BLA हा दहशतवादी गट नाही तर राज्य दडपशाहीचा बळी आहे.

यूके आणि चीनसह अनेक देशांनी आधीच BLA ला  दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे, परंतु कोणीही तिला FTO किंवा समतुल्य म्हणून घोषित केलेले नाही.

इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे संस्थापक सदस्य आणि कार्यकारी संचालक आणि साउथ एशिया इंटेलिजेंस रिव्ह्यू आणि साउथ एशिया टेररिझम पोर्टलचे (एसएटीपी) संपादक डॉ. अजय साहनी यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की BLA पाकिस्तानबाहेर कोणताही धोका निर्माण करत नाही. त्यांनी  बलुच लोकांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि विकासात्मक अधिकार नाकारल्यामुळे उद्भवणारे अंतर्गत बंड म्हणून यांचे वर्णन केले.

अमेरिकेचा यामागचा उद्देश अस्पष्ट आहे. FTO  घोषित करण्याच्या तीन निकषांपैकी एक म्हणजे एखाद्या गटाच्या कारवाया अमेरिकन नागरिकांच्या किंवा स्वतः अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात. साहनी यांनी निदर्शनास आणून दिले की हे BLA ला लागू होत नाही, कारण ती  फक्त पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे आणि इतर गटांशी तिचे कोणतेही संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानवरील पूर्वीच्या टीकात्मक भूमिकेशी अचानक निर्माण झालेला विरोधाभास देखील नोंदवला, या हालचालींना त्यांनी “अचानक परिवर्तन” म्हटले.

“मोठ्या प्रमाणात तेल साठे” विकसित करण्यासाठी अमेरिका-पाकिस्तान कराराची घोषणा झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या संघटनेबाबतची घोषणा करण्यात आली. साहनी यांनी या वेळेचे वर्णन “महत्त्वपूर्ण” असे केले, कारण यातून असे सूचीत होते की, या निर्णयामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध अधिक जवळ येऊन वाढू शकतात.

खनिजांनी समृद्ध बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून  तेल आणि वायूची प्रचंड क्षमता असल्याचे पाकिस्तानी तज्ज्ञांनी म्हटले आहे, परंतु फुटीरतावादी चळवळीशी या गोष्टी संबंधित असल्याने त्यामागील  सुरक्षा चिंतेमुळे या क्षमता वापरात आल्या नाही. हा प्रांत चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसाठी (सीपीईसी) देखील महत्त्वाचा आहे, परंतु तेथील प्रकल्पांना वारंवार अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, ज्यात 2021 मध्ये ग्वादर आत्मघाती बॉम्बस्फोट आणि या वर्षाच्या सुरुवातीला ऑपरेशन बाम यांचा समावेश आहे. या प्रदेशातून फायदा मिळवण्याचा अमेरिका-पाकिस्तानने कोणताही प्रयत्न केल्यास त्याला अशाच प्रकारचा प्रतिकार होऊ शकतो.

अमेरिकेच्या सरकारी उत्तरदायित्व कार्यालयानुसार, FTO  दर्जा देण्यासाठी वॉशिंग्टनला अमेरिकन नागरिक, सुविधा किंवा परदेशातील हितसंबंधांविरुद्ध धोके उद्भवल्यास लष्करी बळाच्या वापरासाठी अधिकृतता यासारख्या उपायांचा वापर करण्याची परवानगी देते. याचा अर्थ असा आहे की BLA द्वारे पाकिस्तानमधील अमेरिकी मालमत्तांवरील हल्ले अमेरिकन लष्करी कारवाईसाठी कायदेशीर आधार प्रदान करू शकतात, ज्याला इस्लामाबाद विरोध करण्याची शक्यता नाही.

ट्रम्प यांचे व्यापक हेतू अनिश्चित असले तरी, हा दर्जा बलुचांना या प्रदेशातील अमेरिकेच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा न आणण्याचा संकेत देखील आहे का? यावर प्रश्न उपस्थित करते.

टीम स्ट्रॅटन्यूज

(हा लेख टिस्या शर्मा हिने लिहिला असून, ती स्ट्रॅटन्यूज ग्लोबलमध्ये प्रशिक्षणार्थी आहे)

+ posts
Previous articleपुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची, पंतप्रधान मोदींना दिली माहिती
Next articleभारताच्या दुर्मिळ खनिज गरजा पूर्ण करण्याचे चीनचे आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here