Digital Jihad: पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेने FATF ला कशी मात दिली?

0

फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने, 2022 च्या ‘ग्रे लिस्ट’मधून औपचारिकपणे वगळल्यानंतरही, पाकिस्तानची “डीप स्टेट” यंत्रणा, दहशतवादी नेटवर्कला गुप्तपणे प्रोत्साहन देत आहे आणि त्यांना वित्तपुरवठा करत आहे. यावेळी, ते यासाठी देशाच्या वाढत्या डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करत आहेत. भारतीय गुप्तचर संस्थेच्या एकत्रित अहवालाने उघड केले आहे की, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या लॉजिस्टिक सपोर्टने, जैश-ए-मोहम्मद (JeM) डिजिटल हवाला नेटवर्ककडे वळले असून, EasyPaisa आणि SadaPay सारख्या मोबाइल वॉलेट्सद्वारे त्यांनी PKR 3.91 बिलियन पेक्षा जास्त निधी उभा केला आहे.

निर्बंधांकडून स्मार्टफोनकडे

2019 मध्ये, FATF द्वारे ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचण्यासाठी, पाकिस्तानने दहशतवादी वित्तपुरवठ्यांवर काळजीपूर्वक लक्ष केंद्रित केले. जैश-ए-मोहम्मदचे (JeM) प्रमुख नेते मसूद अझहर, त्याचे भाऊ रौफ असगर आणि तलहा अल सैफ यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्यांची बँक खाती गोठवण्यात आली. रोख रक्कम आणि प्राण्यांच्या कातडीच्या देणग्यांवर बंदी घालण्यात आली. JeM चे मुख्यालय- मर्कझ सुब्हानअल्लाह, अधिकृतपणे राज्याच्या नियंत्रणाखाली आणले गेले. त्यामुळे पाकिस्तान तीन वर्षांनंतर ग्रे लिस्टमधून बाहेर पडला.

परंतु पडद्यामागे, एक समांतर डिजिटल व्यवस्था शांतपणे तयार केली जात होती.

JeM आणि ISI ने, पारंपारिक बँकिंग नेटवर्कच्या बाहेर असलेल्या मोबाइल वॉलेटचा वापर सुरू केला. हे ॲप्स पीअर-टू-पीअर हस्तांतरण आणि वॉलेट-ते-रोख रूपांतरणास परवानगी देतात, ज्यामुळे SWIFT सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय पाळत ठेवणाऱ्या साधनांद्वारे त्यांचा मागोवा घेणे कठीण होते. परिणामी, पाकिस्तान FATF ला स्वच्छ बँक रेकॉर्ड दाखवू शकला, तर JeM चे खरे निधीचे मार्ग सर्वांच्या नजरेसमोर असूनही लपलेले राहिले.

ऑपरेशन सिंदूरने JeM ला झटका दिला, पण नष्ट केले नाही

भारताने पाकिस्तान-व्याप्त प्रदेशातील पाच प्रमुख JeM ठिकाणांना लक्ष्य करून ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले. या कारवाईत JeM चे ऑपरेशनल मुख्यालय- मर्कझ सुब्हानअल्लाह आणि मुझफ्फराबाद आणि कोटली येथील तळ नष्ट झाले. मसूद अझहरच्या जवळच्या नातेवाईकांसह 14 दहशतवादी मारले गेले. तरीही, काही दिवसांतच, JeM ने पाकिस्तानमध्ये 313 नवीन मर्कझ (धार्मिक केंद्रे) बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभारणी मोहीम सुरू केली.

JeM च्या आवाहनानुसार, प्रत्येक केंद्रासाठी PKR 12.5 मिलियन खर्च अपेक्षित आहे. एकत्रितपणे, या मोहिमेचे उद्दिष्ट PKR 3.91 बिलियन, किंवा अंदाजे Rs 117 कोटी रुपये उभारण्याचे आहे. ही केंद्रे, धार्मिक संस्थांच्या नावाखाली, प्रशिक्षण शिबिरे, भरती केंद्रे आणि सुरक्षित ठिकाणे म्हणून दुप्पट कार्य करतात.

SadaPay वॉलेट हे ॲप, तलहा अल सैफ, मसूद अझहरच्या भावाशी जोडलेले आहे, जे JeM च्या हरिपूर कमांडर आफताब अहमद यांच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरशी जोडलेले आहे. अझहरचा मुलगा अब्दुल्लाशी संबंधित दुसरे ॲप- EasyPaisa चे खाते, खैबर पख्तूनख्वामध्ये वेगळ्या नंबरसह नोंदणीकृत आहे.

तिसरे वॉलेट, JeM चे सय्यद सफदर शाह यांचे आहे, जे EasyPaisa द्वारे योगदान गोळा करतो. गुप्तचर माहितीनुसार, सध्या या निधी उभारणी मोहिमेमध्ये 250 पेक्षा जास्त डिजिटल वॉलेट्स सक्रिय आहेत.

तलहा अल सैफ यांचे एक ऑडिओ आवाहन, 15 ऑगस्ट रोजी रेकॉर्ड केले गेले आणि JeM च्या MSTD Official टेलिग्राम चॅनेलद्वारे प्रसारित केले गेले, ज्यात प्रत्येक समर्थकाला PKR 21,000 दान करण्याचे आवाहन केले गेले आहे. हा ऑडिओ संदेश, 7 मे च्या हल्ल्यानंतर अझहरचा नवीन तळ मानल्या जाणाऱ्या मर्कझ उस्मान-ओ-अली येथील एका मेळाव्यात वितरित करण्यात आला होता.

आकड्यांचा खेळ: अतिरंजित खर्च, लपवलेली शस्त्रे

JeM, प्रत्येक मर्कझला PKR 12.5 मिलियन खर्च येईल असा दावा करत असताना, गुप्तचर अंदाजानुसार मर्कझ बिलाल सारखी लहान केंद्रे PKR 5 मिलियन पेक्षा कमी खर्चात बांधता येतात. जर केवळ 3-4 मोठ्या केंद्रांना PKR 100 मिलियन पर्यंत खर्च येत असेल आणि बाकीची लहान सेटअप असतील, तर प्रत्यक्ष बांधकाम खर्च PKR 1.23 बिलियनच्या जवळ आहे. त्यामुळे PKR 2.6 बिलियन पेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहते, जी शस्त्रे खरेदी, आलिशान वस्तू आणि दहशतवाद्यांच्या वेतनासाठी वळवली जाण्याची शक्यता आहे.

अल रहमत ट्रस्ट: अजूनही कार्यरत

बंदी घालण्यात आली असूनही, JeM ची धर्मादाय शाखा- अल रहमत ट्रस्ट अजूनही सक्रिय आहे. बहावलपूरमधील नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमधील गुलाम मुर्तझा यांच्या नावाखालील खाते अजूनही देणग्या स्वीकारत आहे. संचालक मोहम्मद इस्माईल, लाहोरचा फारूक आणि चित्रालचा फजल-उर-रेहमान आहेत, जे सर्व अझहर कुटुंबाशी जोडलेले आहेत.

डिजिटल हवाला: दहशतवादासाठी एक नवीन आर्थिक सीमा

JeM सध्या 2,000 पेक्षा जास्त डिजिटल वॉलेट्स चालवत असल्याचे मानले जाते, त्यापैकी बरेच दर 3-4 महिन्यांनी बदलले जातात. मोठ्या निधीला ट्रेस करणे टाळण्यासाठी ते कोर वॉलेटमधून लहान खात्यांमध्ये विभागले जातात. गाझा मदतीशी संबंधित वॉलेट्स देखील मसूद अझहरचा मुलगा हमाद अझहरद्वारे टोपणनावाने चालवले जात आहेत.

धोरणात्मक आराखडा: 313 मर्कझ का?

JeM ची 313 केंद्रे बांधण्याची योजना केवळ प्रतीकात्मक नाही; ती रणनीतिक आहे. ही कृती लष्कर-ए-तोयबाच्या विकेंद्रित मॉडेलची नक्कल करते, ज्यामुळे JeM ला आपल्या पायाभूत सुविधा देशभर पसरवता येतात आणि सर्जिकल स्ट्राइक अप्रभावी ठरतात.

भविष्यात, 3-4 मोठी मर्कझ अझहर कुटुंबासाठी सुरक्षित ठिकाणे म्हणून काम करतील, ज्यामुळे पाकिस्तान आपल्या भूमीवर मसूद अझहरच्या उपस्थितीचा इन्कार करत असतानाही ते लपलेले राहतील.

FATF तपास पुन्हा सुरू करण्याची वेळ?

दहशतवादी वित्तपुरवठ्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा शस्त्रास्त्रांसारखा वापर होत असताना, आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या FATF पालनाच्या दाव्यांचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे. JeM च्या डिजिटल हवाला नेटवर्कने केवळ आपला निधी उभारणीचा मार्ग पुनरुज्जीवित केला नाहीये, तर आपल्या कारवाया अधिक गुप्त आणि स्केलेबल केल्या आहेत.

याला वेळीच आळा न घातल्यास, PKR 3.91 बिलियनची मोहीम दहशतवादाच्या नवीन पिढीला इंधन देऊ शकते, ज्यामध्ये 313 प्रशिक्षण शिबिरे, एक मजबूत शस्त्रसाठा आणि निर्बंधांपासून मुक्त असलेले ऑनलाइन निधी उभारणीचे मॉडेल असेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Successfully Test-Fires ‘Agni 5’ Intermediate Range Ballistic Missile
Next articleरण संवाद 2025: भारतीय लष्कराच्या सर्वांगीण परिवर्तनाला चालना देणारा मंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here