एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

0

ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (IADWS) पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केल्याची घोषणा संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) शनिवारी केली.

 

शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30  वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेली ही चाचणी, भारताच्या संपूर्ण स्वदेशी, बहुस्तरीय हवाई संरक्षण कवचाच्या प्रयत्नात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जे विविध प्रकारच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वपूर्ण मालमत्तांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे.

IADWS ची रचना बहुस्तरीय संरक्षण उपाय म्हणून करण्यात आली आहे, ज्यात लढाऊ विमाने, मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), क्रूझ क्षेपणास्त्रे आणि अचूक मार्गदर्शित शस्त्रास्त्रांच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक क्षमतांची श्रेणी एकत्रित केली आहे. त्याच्या रचनेत पुढील घटक एकत्रित आहेत :

  • पूर्णतः स्वदेशी विकसित शिघ्र प्रतिसाद जमिन-ते-आकाश क्षेपणास्त्रे (क्यूआरएसएएम)
  • प्रगत अति-लघु पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली  क्षेपणास्त्रे
  • उच्च-शक्तीच्या लेझरवर आधारित लक्ष्यित ऊर्जा शस्त्र प्रणाली (डीईडब्लू)

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीच्या पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणी बदल डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योग क्षेत्राचे कौतुक केले.

“या उड्डाण चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सिद्ध झाली असून शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी क्षेत्रीय संरक्षण आणखी बळकट होईल,” असे सिंह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भगवान कृष्णाच्या पौराणिक शस्त्राने प्रेरित स्वदेशी हवाई संरक्षण जाळे तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन सुदर्शन चक्र’ च्या घोषणेनंतर लगेचच ही चाचणी यशस्वी झाली आहे.

ही चाचणी महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरतेसाठी भारताचा प्रयत्न आणि आयातीवर अवलंबून न राहता चीन आणि पाकिस्तानसारख्या विरोधकांकडून उद्भवणाऱ्या धोक्यांचा सामना करण्याचा भारताचा निर्धार अधोरेखित करते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleMission Sudarshan Chakra: India’s Defence Gamechanger
Next articleकालापानीवरून भारत-नेपाळमध्ये व्यापार तणाव, मुख्य प्रकल्पही अनिश्चिततेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here