“तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धाची तयारी ठेवा”: CDS चौहान

0

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी मंगळवारी, लष्करी सज्जतेचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, “शक्तीशिवाय शांतता ही एक काल्पनिक संकल्पना आहे.” ‘If you want peace, prepare for war’, या लॅटिन उक्तीचा पुनरुच्चार करत, त्यांनी स्पष्ट केले की, “भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण फक्त शांततावादी राहणे परवडणारे नाही.”

CDS चौहान, हे ‘रण संवाद 2025’च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. त्रिसेवा लष्करी परिषदेचा हा पहिला, दोन दिवसीय कार्यक्रम आहे, जो आर्मी वॉर कॉलेज, महू येथे आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या परिसंवादाच्या समारोप सत्रात मुख्य भाषण करतील.

22 एप्रिलला, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी याला ‘आधुनिक संघर्ष’ असे संबोधत सांगितले की, “यामधून अनेक धडे मिळाले असून, त्यांची अंमलबजावणी सुरू आहे.”

भविष्यातील संघर्षांसाठी संयुक्त तयारी

भूप्रदेश, समुद्र, आकाश, सायबर आणि अवकाश या सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदलणाऱ्या संघर्ष स्वरूपाकडे लक्ष वेधत, CDS म्हणाले की, “भारताच्या सशस्त्र दलांनी एकत्रित, जलद आणि निर्णायक प्रतिसाद द्यायला तयार असले पाहिजे.”

“भविष्यातील रणांगण हे कोणत्याही विशिष्ट सेवेच्या सीमारेषा ओळखत नाही. ते संयुक्त विचार, संयुक्त नियोजन आणि संयुक्त कृती मागते,” असे ते म्हणाले.

या परिसंवादाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “यामध्ये सेवा बजावत असलेले अधिकारीच रणनीतीविषयक संवादाच्या केंद्रस्थानी असतील. हे शक्तीचे प्रदर्शन नाही; हा उद्देश स्पष्ट करणे, प्रयत्नांची एकता साधणे आणि तिन्ही सेवांमध्ये सामायिक परिचालन समज निर्माण करणे आहे.”

ते पुढे म्हणाले की, “युद्ध (war), वॉरफेअर आणि वॉरफायटिंग हे सैन्य दलांचे ‘bread and butter’ (नित्य कामे) आहेत.” त्यांनी इशारा दिला की, “भूराजकारण आणि मुत्सद्देगिरी महत्त्वाची असली तरी, ती सैन्य दलांचे मूळ कार्य – युद्धाची तयारी करणे आणि प्रत्यक्ष युद्ध करणे, यापासून लक्ष विचलित करू शकते.”

तंत्रज्ञान, एकत्रीकरण आणि ‘मिशन सुदर्शन चक्र’

CDS चौहान यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेल्या ‘मिशन सुदर्शन चक्र’ चे कौतुक केले. हे भारताचे स्वदेशी हवाई संरक्षण कार्यक्रम असून, ते भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रावर प्रेरित आहे.

त्यांनी सांगितले की, “DRDO एक संयुक्त प्रणाली विकसित करत आहे, ज्यामध्ये QRSAM, VSHORADS आणि 5-kilowatt लेझर सारखी directed-energy weapons यांचा समावेश असेल.”

त्यांनी यावर भर दिला की, “भूप्रदेश, आकाश, समुद्र, पाण्याखालील आणि अवकाशातील सेन्सर्स एकत्र करून एक संपूर्ण परिचालन चित्र निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रीकरणाची आवश्यकता आहे.”

“डेटा-आधारित तंत्रज्ञान, जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम संगणन, अ‍ॅडव्हान्स अ‍ॅनालिटिक्स आणि large language models, हे सर्व रिअल-टाइम निर्णयक्षमतेच्या केंद्रस्थानी असतील,” असे त्यांनी सांगितले. “DRDO ही क्षमता कमी आणि परवडणाऱ्या खर्चात विकसित करू शकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रणनितीक संवादाचे नवे स्वरुप

परंपरागत परिसंवादांप्रमाणे केवळ निवृत्त अधिकारी बोलण्याऐवजी, ‘रण संवाद 2025‘ मध्ये सद्यस्थितीत सेवा देणारे अधिकारीच युद्धतंत्रावरील चर्चा करतील. प्रत्येक सत्रात परिचालन धडे, संयुक्त सिद्धांत (joint doctrines), आणि भविष्यातील युद्धासाठी तंत्रज्ञानाचा रोडमॅप मांडला जाईल.

या परिसंवादामध्ये माहिती युद्ध (Information Warfare), ग्रे-झोन संघर्ष, एकत्रित ऑपरेशन्स आणि पुढील पिढीच्या तंत्रज्ञानांवर चर्चा होणार आहे.

तिन्ही संरक्षण सेवांचे वरिष्ठ कमांडर, संरक्षण उद्योगातील अग्रगण्य नेते, जागतिक सुरक्षा तज्ज्ञ, तसेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, दक्षिण कोरिया आणि आफ्रिका व मध्य-पूर्वेतील अनेक देशांतील संरक्षण दूत, अशा 17 देशांमधील प्रतिनिधी या परिसंवादात सहभागी झाले आहेत.

“रण संवाद हा सैन्य दलांतील विचारप्रवाह नव्याने परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. युद्ध, वॉरफेअर आणि वॉरफायटिंग हे लष्करी विचारसरणीच्या केंद्रस्थानी पुन्हा आणण्याचा यामागचा उद्देश आहे,” असे जनरल चौहान यांनी सांगितले.

– रवि शंकर, महू

+ posts
Previous articleभारत आणि फिजी, संरक्षण आणि सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणार
Next article50 टक्के टॅरिफची उद्यापासून अंमलबजावणी, अमेरिकेची भारताला नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here