संरक्षण संपादन परिषदेची (DAC) 79 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

0
ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने (DAC) 23 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे झालेल्या बैठकीत, विविध दलांच्या सुमारे 79 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. स्वदेशी प्लॅटफॉर्म आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मिश्रणाद्वारे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ऑपरेशनल क्षमता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतीय सैन्य: वाढीव फायर पॉवर आणि गतिशीलता

भारतीय लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली (ट्रॅक्ड), एमके-II (नाग रणगाडा भेदी क्षेपणास्त्र प्रणाली), ग्राउंड बेस्ड मोबाईल एलिन्ट सिस्टम (GBMES) आणि मटेरियल हँडलिंग क्रेनसह उच्च गतिशीलता असलेली वाहने खरेदी करण्यास ‘आवश्यकता स्वीकृती’ (AoN) देण्यात आली.

नाग रणगाडा भेदी क्षेपणास्त्र प्रणाली (ट्रॅक्ड) च्या खरेदीमुळे भारतीय लष्कराची शत्रूची लढाऊ वाहने, बंकर्स आणि इतर क्षेत्रीय तटबंदी निष्प्रभ करण्याची क्षमता वाढेल, तर GBMES शत्रूच्या क्षेपकांची चोवीस तास गुप्त इलेक्ट्रॉनिक माहिती मिळवेल. उच्च गतीशील वाहनांच्या समावेशामुळे विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये सैन्याला मिळणाऱ्या रसद पाठबळात लक्षणीय सुधारणा होईल. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या ऑपरेशनल अनुभवांमधून  लक्षात आलेला हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

भारतीय नौदल: भूजल आणि सागरी पोहोच वाढवत आहे

भारतीय नौदलासाठी, लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स (LPD), 30 मिमि नेव्हल सरफेस गन (NSG), ॲडव्हान्स्ड लाईट वेट टॉर्पेडो (ALWT), इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅक सिस्टीम आणि 76 मिमि सुपर रॅपिड गन माउंटसाठी स्मार्ट ॲम्युनिशन खरेदी करण्यास ‘आवश्यकता स्वीकृती’ देण्यात आली.

सैन्य, चिलखती वाहने आणि विमाने वाहून नेण्यास सक्षम असलेली मोठी भूजल जहाजे, एलपीडी द्वारे प्राप्त झालेली एकात्मिक सागरी क्षमता भारतीय नौदलाला शांतता मोहिमा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण इत्यादी कामे करण्यास देखील मदत करेल. LPD कार्यक्रमाचा एकूण खर्च मोठा असण्याची अपेक्षा असली तरी, अचूक आर्थिक तपशील अद्याप निश्चित झालेला नाही. ही जहाजे स्वदेशी पद्धतीने बांधली जाणार आहेत, ज्यामुळे देशांतर्गत जहाजबांधणी क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

ALWT चा समावेश, जो डीआरडीओ च्या नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीने स्वदेशी विकसित केला आहे, तो पारंपारिक, अणु आणि छोट्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. 30 मिमि NSG च्या खरेदीमुळे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि सागरी चाचेगिरी-विरोधी कारवाई निभावण्याची क्षमता वाढेल.

भारतीय हवाई दल: स्वायत्त युद्धाचा स्वीकार

भारतीय हवाई दलासाठी कोलॅबोरेटिव्ह लाँग रेंज टार्गेट सॅच्युरेशन/डिस्ट्रक्शन प्रणाली (CLRTS/DS) आणि इतर प्रस्तावांना ‘आवश्यकता स्वीकृती’ देण्यात आली. CLRTS/DS मध्ये मोहिमेच्या क्षेत्रात स्वायत्त टेक-ऑफ, लँडिंग, दिशाशोधन, शोध घेणे आणि अभिभार पोहोचवण्याची क्षमता आहे. यामुळे मानवरहित आणि एआय-सक्षम प्रणालींवर आयएएफचे वाढते लक्ष प्रतिबिंबित करणारी.

स्वावलंबनाकडे वाटचाल

संपूर्ण मंजुरी यादीमध्ये स्वदेशी विकास आणि उत्पादनावर भर देण्यात आला आहे. डीआरडीओ आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादक प्रमुख भूमिका बजावत असल्याने, हे प्रकल्प सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी जवळून जुळतात.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की खरेदी योजना केवळ लढाऊ तयारीतच सुधारणा करेल असे नाही तर भारताच्या संरक्षण औद्योगिक पायावर तांत्रिक नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीला देखील चालना देईल.

ऑपरेशन सिंदूरनंतरचे आधुनिकीकरण

ऑपरेशन सिंदूर नंतरचे धोरणात्मक पुनर्वितरण प्रतिबिंबित करते, ज्याने गतिशीलता, जलद प्रतिसाद आणि बहु-डोमेन एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. भारतात डिझाइन केलेल्या आणि बांधण्यात आलेल्या आधुनिक प्रणालींसह सेवा सुसज्ज करून, संरक्षण मंत्रालयाने भविष्यातील जटिल ऑपरेशनल वातावरणासाठी सशस्त्र दलांना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

तिन्ही सेवांसाठी मंजुर करण्यात आलेली स्वदेशी उत्पादने आणि तंत्रज्ञान विकासाकडे सुरू असणारी निर्णायक वाटचाल अधोरेखित करतात. BEL आणि AVNL सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज आणि L&T, अशोक लेलँड आणि कल्याणी ग्रुप सारख्या खाजगी दिग्गजांनी यात अधिक सहभाग घेतल्याने भारताच्या संरक्षण औद्योगिक पायाला चालना मिळेल आणि उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर, संरक्षण मंत्रालयाचे लक्ष बहु-क्षेत्रीय तयारी आणि स्वावलंबनाकडे केंद्रित झाले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleCochin Shipyard Delivers First Indigenous Anti-Submarine Vessel ‘Mahe’ to Indian Navy
Next articleनौदलाने पाकिस्तानला त्याच्या किनाऱ्याजवळच रोखले – राजनाथ सिंह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here