भारत फोर्जला मानवरहित प्रणालींसाठी 300 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त

0
भारत फोर्ज
प्रातिनिधीक फोटो

भारत फोर्जच्या एरोस्पेस विभागाने, भारतीय लष्करासाठी स्वदेशी मानवरहित प्रणालींच्या विविध श्रेणींसाठी ‘इमर्जन्सी प्रोक्योरमेंट – VI’ (EP-VI) अंतर्गत, सुमारे 300 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. भारतीय नौदलासाठी देखील या प्रणालींचा वापर प्रस्तावित आहे, अशी माहिती 16 जानेवारी रोजी कंपनीने दिली.

या करारांतर्गत गुप्तचर यंत्रणा, पाळत आणि टेहळणी (ISR) प्लॅटफॉर्म्स आणि लॉइटरिंग म्युनिशन्ससह विविध स्वदेशी मानवरहित प्रणालींचा समावेश आहे.

“ओमेगा वन, ओमेगा नाईन, बायोनेट आणि क्लीव्हर हे करारात सामाविष्ट असलेले प्लॅटफॉर्म्स, भारतातील विविध भूप्रदेश आणि मिशन प्रोफाइल्समधील तातडीच्या ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत,” असे निवेदनात नमूद केले आहे.

यावर्षी 15 जानेवारी रोजी, जयपूर येथे झालेल्या लष्करी दिनाच्या परेडमध्ये, बीएमपी-2 या इन्फंट्री व्हेईकलवर बसवलेली ‘ओमेगा वन’ प्रणाली प्रदर्शित करण्यात आली, हे या प्लॅटफॉर्मचे पहिले सार्वजनिक पदार्पण ठरले.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, EP-VI अंतर्गत मिळालेले कंत्राट हे ‘आत्मनिर्भर भारत‘ उपक्रमांतर्गत स्वदेशी प्रणालींच्या जलद समावेशासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिनिधीत्व करते; ज्यामध्ये जलद उत्पादन, विश्वासार्हता आणि विस्तारक्षमतेवर भर देण्यात आला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कंपनी आव्हानात्मक ऑपरेशनल वातावरणात मिशनची सहनशक्ती, अचूकता, टिकाऊपणा आणि अनुकूलता वाढवण्यासाठी प्रगत स्वायत्तता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा-आधारित निर्णय घेण्याची क्षमता वेगाने विकसित करत आहे.

“EP-VI कंत्राट मिळवणे आणि आर्मी डे ला ओमेगा वनचे प्रदर्शन करणे, ही दुहेरी उपलब्धी भारत फोर्ज लिमिटेडची (BFL) ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करते,” असे भारत फोर्ज लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले. “आपल्या सशस्त्र दलांना खास भारतीय, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) प्रतिरोधक आणि स्वदेशी मानवरहित यंत्रणा पलब्ध करून देताना आम्हाला अभिमान वाटतो आहे,” असेही ते म्हणाले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, भारत फोर्ज डिझाइन, उत्पादन आणि पुढील पिढीच्या स्वायत्त तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करत असून, भारताच्या वाढत्या मानवरहित आणि स्वायत्त प्रणाली क्षेत्रात एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDPB Gives Initial Nod for 114 Rafale Jets, DAC Approval Next
Next articleप्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘भैरव कमांडो बटालियन’चे होणार दमदार पदार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here