चीनची वचनपूर्ती; अमेरिकेकडून 1 कोटी 20 लाख टन सोयाबीनची खरेदी

0
सोयाबीनची खरेदी

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात झालेल्या व्यापार युद्धविरामानंतर खरेदीला पुन्हा एकदा वेग आल्याने, चीनने अमेरिकेकडून सुमारे 12 दशलक्ष (1 कोटी 20 लाख) मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत ही खरेदी पूर्ण करण्याच्या अमेरिकेने जाहीर केलेल्या आश्वासनाची चीनने पूर्तता केली आहे, अशी माहिती तीन व्यापाऱ्यांनी मंगळवारी रॉयटर्सला दिली.

व्यापार युद्धामुळे खरेदीदारांनी उत्तर अमेरिकन पुरवठ्याकडे पाठ फिरवल्याने, गेल्या सप्टेंबरपासून सलग चार महिने चीनने अमेरिकेकडून कोणतीही आयात नोंदवली नव्हती. यामुळे अमेरिकेचा बाजारपेठेतील हिस्सा 2024 मधील 21 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

मात्र, गेल्या आठवड्यात सरकारी साठ्याचे व्यवस्थापक सायनोग्रेन आणि सरकारी व्यापारी सीओएफसीओ यांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीमुळे, 1 कोटी 20 लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अमेरिकन सोयाबीनचे हे दोनच प्रमुख खरेदीदार आहेत, कारण खासगी क्रशर कंपन्या आजही अर्जेंटिना आणि ब्राझीलमधील स्वस्त पुरवठ्यालाच प्राधान्य देत आहेत.

“जोपर्यंत अमेरिकन सोयाबीनच्या किमती दक्षिण अमेरिकन किमतींशी स्पर्धा करण्यायोग्य होत नाहीत, तोपर्यंत सप्टेंबरमध्ये येणाऱ्या नव्या अमेरिकन पिकापर्यंत, सोयाबीनची पुढील खरेदी होण्याची शक्यता कमी आहे,” असे या शिपमेंटच्या तपशीलांशी परिचित असलेल्या एका स्त्रोताने सांगितले.

सर्व स्रोतांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली असून, त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची अधिकृत परवानगी नाही.

राखीव सरकारी साठे

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट झाल्यानंतर, चीनने अमेरिकन सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू केली. व्हाईट हाऊसने याआधी म्हटले होते की, चीनने 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी किमान 2 कोटी 50 लाख मेट्रिक टन इतकी खरेदी करण्यासही सहमती दर्शवली आहे.

खरेदी करण्यात आलेले 1 कोटी 20 लाख टन अमेरिकन सोयाबीन, डिसेंबर ते मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येणार असल्याचे स्रोतांनी सांगितले.

डिसेंबरच्या सुरुवातीला रॉयटर्सने वृत्त दिले होते की, अमेरिकन गल्फ कोस्ट टर्मिनल्सवरून चीनसाठी किमान सहा मोठ्या मालवाहू जहाजांमध्ये सोयाबीन लोड करण्याचे नियोजन होते, तर सातवे जहाज आधीच मार्गस्थ होते.

एलएसईजी आणि केपलर यांच्या जहाज-ट्रॅकिंग डेटानुसार, यापैकी ‘ओशन हार्वेस्ट’ नामक एक जहाज, सुमारे एका आठवड्यात पूर्व बंदर झांगजियागांग येथे पोहोचणार आहे.

खरेदी करण्यात आलेल्या एकूण साठ्यापैकी, सोयाबिनचा मोठा भाग बहुधा सरकारच्या राखीव साठ्यासाठी नियुक्त केला आहे. अलीकडच्या आठवड्यात, सिनोग्रेनने अमेरिकन सोयाबीनच्या शिपमेंटसाठी साठवणूकीची जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने चार लिलाव आयोजित केले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article‘बोर्ड ऑफ पीस’ प्रकरणी, फ्रान्सवर 200% टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची धमकी
Next articleIndian Navy’s Republic Day Tableau to Showcase Maritime Heritage, Indigenous Warships and Women Sailors

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here