रशिया आणि युक्रेन यांच्यात वाद 1990-91पासून धुमसत आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन रशिया व इतर 15 देश स्वतंत्र झाले. त्यापैकीच एक युक्रेन. युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक रशियाला खटकणारी असून युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या सीमेलगत सैन्य तैनात केले आणि उभय देशांतील तणाव वाढला. त्यावरुन अमेरिका आणि नाटोने नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपीयन देश युक्रेनची पाठराखण करत असतानाच 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटले. रशियाने एका पाठोपाठ हल्ले सुरूच ठेवले असून अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मंगळवारी (01 मार्च 2022) युक्रेनच्या खार्कीव्ह या शहरात तोफांचा मारा करण्यात आला. त्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रशिया हे भारताचे पूर्वीपासून जवळचे राष्ट्र. अमेरिकेने कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला तर, भारताचे रशियाशी चांगले संबंध होते आणि आहेत. रशिया सातत्याने भारताला तंत्रज्ञान, विशेषत: संरक्षणविषयक अद्ययावत तंत्रज्ञान पुरवत आहे. शिवाय, युक्रेनशी भारताचे तशाच प्रकारचे संबंध आहेत. मग अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांत भारताला तटस्थ भूमिका घ्यावी लागली.
रशियाने युक्रेनवर हल्ला का केला, तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी आहे का, भारतावर याचे नेमके काय परिणाम होणार आहेत, भारताने यूएनमध्ये घेतलेल्या तटस्थ भूमिकेमागचे नेमके कारण काय, माध्यमांमार्फत दाखवल्या जाणाऱ्या बातम्या आणि वस्तुस्थिती यात किती आणि कसा फरक आहे, या आणि अशा प्रश्नांबाबत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांच्याशी YouTube वरील ‘भारतशक्ती मराठी’च्या विशेष कार्यक्रमात चर्चा केली आहे.
सविस्तर मुलाखत पाहा –
https://youtu.be/DBtJGvqEVGg