चिनी मालकीचे सोशल मीडिया ॲप टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली तर मेटा अधिक सक्षम होईल, असे वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्यानंतर मेटाच्या समभागांच्या किमतीमध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.
सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “टिकटॉकशिवाय तुम्ही आपोआपच फेसबुकला मोठे बनवू शकता आणि मी फेसबुकला लोकांचा शत्रू मानतो”.
याआधी ट्रम्प यांनी फेसबुकला “लोकांचा खरा शत्रू” म्हटल्यानंतर मेटाचे समभाग शुक्रवारीही 1.2 टक्क्यांनी घसरले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गच्या कार्यक्षमतेमुळे मेटाने आतापर्यंतचा सर्वात मोठा नफा कमावल्याच्या बातम्या आल्यानंतर मेटाच्या समभागांच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर लगेचच काही महिन्यांनंतर ट्रम्प यांनी हे विधान केले.
जाणकारांच्या अंदाजानुसार, या एकाच दिवशी सुमारे 7.7 अब्ज डॉलर्स गमावल्यानंतर, जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या झुकेरबर्गच्या निव्वळ संपत्तीत देखील घट झाली.
आपण टिकटॉक ॲप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे मानतो असे ट्रम्प यांनी मुलाखतीत स्पष्ट केले होते. तरी आता त्यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येते. टिकटॉक ही सोशल मीडिया कंपनी चिनी इंटरनेट दिग्गज बाईटडान्सच्या मालकीची असून लहान व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी सर्वच वयोगटातील लोक या व्यासपीठावर लॉग इन करत असल्याने एक आंतरराष्ट्रीय सेन्सेशन म्हणून त्याची ओळख आहे.
चिनी सरकारच्या विनंतीवरून सोशल मीडिया दिग्गज खाजगी वापरकर्त्यांची माहिती शेअर करतील अशी चिंता टीकाकारांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत जरी या ॲपवर बंदी घातली तरी, इथल्या तज्ज्ञांनी विचारल्यास बाइटडान्सला अशी माहिती उघड करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.
ट्रम्प प्रशासनाने 2020 मध्ये अमेरिकेमधील ॲप स्टोअरमधून टिकटॉक काढून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
टिकटॉकला त्याच्या चीनमधील संबंधित मूळ कंपनीपासून फारकत घेण्यासाठी अंदाजे पाच महिने दिले जाणार आहेत. या काळात ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर अमेरिकेतील ॲप स्टोअर्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध करून देता येणार नाही, अशा विधेयकावर या आठवड्यात मतदान होणार आहे. कॉंग्रेसने याला मंजूरी दिली तर, आपण टिकटॉक विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर करू असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे.
रामानंद सेनगुप्ता