आजही चीन गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी असणाऱ्या नियमांची चौकट आणखी शिथिल केली जाईल, असे आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच दिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, अमेरिकेच्या कोषागार सचिव जेनेट येलेन यांनी चीनला इशारा दिला आहे की, जगाला स्वस्तात स्वच्छ ऊर्जेचा पूर वाटेल एवढी निर्यात करू नका.
कोषागार सचिव म्हणून जेनेट येलेना लवकरच चीन दौऱ्यावर जाणार असून त्याच्या काहीच दिवस आधी ही टीका करण्यात आली आहे. येलेन यांच्या या टीकेतून चीनच्या व्यापार पद्धतींविषयी बायडेन सरकारला वाटणारी चिंता देखील प्रतिबिंबित होताना दिसते. मात्र दुसऱ्यांदा चीनचा दौरा करणाऱ्या येलेना यांच्यासाठी ही टीका एक अडथळा ठरू शकते.
“अमेरिकन कंपन्या आणि कामगार यांना योग्य स्पर्धा करण्यासाठी समान संधी मिळायला हवी यावर अध्यक्ष आणि माझे एकमत आहे. आम्ही चीनबरोबरच्या मागील चर्चेमध्ये आमची अतिक्षमता वाढवली आहे आणि माझ्या पुढील दौऱ्यादरम्यान होणाऱ्या चर्चेसाठी तो एक महत्त्वाचा मुद्दा बनवण्याची माझी योजना आहे,” असे येलेन म्हणाल्या.
येलेन यांनी सौर ऊर्जा, विद्युत वाहने आणि लिथियम – आयन बॅटरीमधील चीनच्या वाढत्या उत्पादनावर टीका केली. ही उत्पादनक्षमता “जागतिक किंमतींवर वाईट परिणाम करणारी” तसेच अमेरिकन कंपन्या आणि कामगारांबरोबरच जगभरातील या क्षेत्रातील कंपन्या आणि कामगारांवर अन्याय करणारी स्पर्धा असल्याची, टीका केली आहे.
येलेन यांनी ही टीका करण्यामागे जॉर्जियामधील सोलार सेल उत्पादन सुविधा कारणीभूत आहे. 2017 मध्ये स्वस्त आयातीमुळे सोलार सेलच्या बाजारपेठेत अति उत्पादन आल्याने ही कंपनी बंद पडली. त्याच काळात बायडेन प्रशासन हरित ऊर्जा उत्पादन सुविधा उभारण्यासाठी विकासकांना कर सवलत आणि अनुदान देऊन हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करत होते.
जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या आगामी निवडणुक प्रचारात व्यापारविषयक धोरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर बायडेन यांनी त्यांच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी लादलेले बरेच दर कायम ठेवले आहेत आणि दुसऱ्यांदा जिंकल्यास ते चिनी उत्पादनांवर अधिक शुल्क लादण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या बॅटरींच्या उत्पादनामध्ये चीन सध्या आघाडीचा देश आहे आणि वेगाने विस्तारत असलेला हा वाहन उद्योग जागतिक स्तरावर जात असताना जगातील प्रस्थापित कार उत्पादकांना चीन आव्हान देऊ शकतो. पॅरिस येथील इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने असे नमूद केले आहे की, 2023 साली जागतिक इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये एकट्या चीनचा वाटा सुमारे 60 टक्के होता.
पिनाकी चक्रवर्ती
(एपीकडून मिळालेल्या इनपुट्सह)