रविवारी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इराणने हल्ल्यांपूर्वी त्याची पुरेशी माहिती दिली असल्याचे सांगितले. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने शेजारील देशांना आणि अगदी अमेरिकेलाही हल्ल्यांबाबत सात तास आधी सूचित केले होते की ते हल्ले सुरू करणार आहेत.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याला रविवारी तुर्की, जॉर्डनियन आणि इराकी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. तुर्कीच्या मुत्सद्दी सूत्रांनी स्पष्ट केले की, तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यापूर्वी वॉशिंग्टन आणि तेहरान या दोघांनाही माहिती दिल्याचे सांगितले. इतकेच नाही तर या दोघांकडे गेलेले संदेश योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची मध्यस्त म्हणून आपण खात्री केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दमिश्कमधील इस्रायलच्या दूतावासावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही प्रतिक्रिया असेल आणि त्यापलीकडे आम्ही जाणार नाही, असे इराणने म्हटले आहे. आम्हाला अशा शक्यतांची कल्पना होती. ही घडामोडी आश्चर्यकारक नव्हती “, असे तुर्कीच्या मुत्सद्दी सूत्रांनी सांगितले.
इराकच्या बाजूने, सरकारी सुरक्षा सल्लागार आणि सुरक्षा अधिकारी अशा दोन इराकी सूत्रांनी सांगितले की इराणने बगदादला हल्ल्याची माहिती देण्याच्या किमान तीन दिवस आधी राजनैतिक माध्यमांचा वापर केला होता.
सीरियातील आपल्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या संशयास्पद हल्ल्यानंतर इराणने शनिवारी प्रत्युत्तरादाखल शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागली. यातील बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायली प्रदेशात पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आली. या हल्ल्यात आतापर्यंत एक तरुण मुलगी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी याची व्याप्ती आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेने मात्र इराणचे हे दावे फेटाळले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमीर बदोल्लाहियन यांचा दावा फेटाळला असून, वॉशिंग्टनने स्वीस मध्यस्थांद्वारे इराणशी संपर्क साधला होता परंतु 72 तास आधी हल्ल्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नव्हती असे स्पष्ट केले.
“हे पूर्णपणे खरे नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले. “हे लक्ष्य असेल, म्हणून त्यांना बाहेर काढा’… अशी त्यांनी कोणतीही सूचना किंवा कोणतीही कल्पना दिली नाही.’ असा दावा त्यांनी केला. इराणने हल्ला सुरू झाल्यानंतरच अमेरिकेला संदेश पाठवला आणि त्याचा हेतू” अत्यंत विध्वंसक हल्ला करण्याचा” शक्यता होती. या हल्ल्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले तर त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न इराणच्या या व्यापक चेतावणी दिल्याच्या दाव्यामागे असू शकतो.
“हे हल्ले सुरू असताना आम्हाला स्वित्झर्लंडच्या माध्यमातून इराणचा एक संदेश मिळाला. त्यानुसार असे सुचवण्यात येत होते की त्यांच्या बाजूने हे हल्ले यानंतर संपले होते. पण तरीही हल्ले सुरूच होते. त्यामुळे आमच्यासाठी हाच (त्यांचा) संदेश होता “, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसकडून माध्यमांना झालेल्या ब्रीफिंगमध्ये इराणकडून इस्रायलवर “नंतर नव्हे तर लवकरच” हल्ला होऊ शकतो असे म्हटले होते. खरेतर त्यावेळी इराणकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता होती. बायडेन यांनी इराणला असे हल्ले न करण्याचा इशारा दिला आणि इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे सांगितले.
बायडेन यांनी पत्रकार परिषदेत “(हल्ला) करू नका” अशा शब्दांमध्ये इराणला संदेश पाठवला होता.
इराणविरुद्ध बदला घेण्याच्या कोणत्याही कारवाईत सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला या हल्ल्यानंतर स्पष्ट केले आहे. इस्रायलने रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती. तर बायडेन यांनी इराणच्या या कृतीवर “तातडीचा राजनैतिक प्रतिसाद” कसा देता येईल यावर चर्चा करण्यासाठी जी 7 ची आभासी बैठक घेतली.
इस्रायल अजूनही या हल्ल्याच्या प्रतिसादाचा विचार करत असून “आपल्यासाठी योग्य असलेल्या पद्धतीने आणि वेळेनुसार या हल्ल्याची किंमत इराणकडून वसूल करेल,” असे इस्रायलचे मंत्री बेनी गॅन्ट्झ यांनी रविवारी सांगितले.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)