ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (हीट) ‘अभ्यास’ या प्रणालीच्या सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
डीआरडीओच्या बंगळुरूस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने अभ्यासची रचना केली असून – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो या उत्पादक कंपन्यांनी ते विकसित केले आहे.
हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (हीट) ‘अभ्यास’ या प्रणालीच्या सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सुधारित रॉकेट (बूस्टर) जुळणीसह ‘अभ्यास’ प्रणालीच्या आत्तापर्यंत 10 विकास चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
High Speed Expendable Aerial Target ‘ABHYAS’ successfully completes developmental trials with improved booster configurationhttps://t.co/enMd5izREz pic.twitter.com/eWnsu3XOwT
— DRDO (@DRDO_India) June 27, 2024
यशस्वी उड्डाण चाचण्यांमुळे ‘अभ्यास’ प्रणालीच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला आहे.
सुधारित रडार क्रॉस सेक्शन, व्हिज्युअल आणि इन्फ्रारेड ऑगमेंटेशन सिस्टीमचा वापर करून या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्यांदरम्यान रॉकेटच्या सुरक्षित उड्डाणाबरोबरच प्रक्षेपकाची दीर्घकाळ टिकणारी क्षमता आजमावण्यात आली. ही स्वदेशी प्रणाली ऑटो पायलटच्या मदतीने स्वायत्त उड्डाणासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात लॅपटॉप-आधारित विमानासाठीची भूमी नियंत्रण प्रणाली, उड्डाणपूर्व तपासणी उपलब्ध आहे.
उड्डाणानंतरच्या विश्लेषणासाठी उड्डाण कालावधीतील माहितीची नोंद हे या प्रणालीचे एक वैशिष्ट्य देखील आहे.
चाचण्यांदरम्यान, बूस्टरचे सुरक्षित प्रक्षेपण, प्रक्षेपक मंजुरी आणि सहनशक्तीची कामगिरी यासह विविध मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीरित्या प्रमाणित करण्यात आली “, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
30 मिनिटांच्या अंतराने दोन प्रक्षेपणं पाठोपाठ केली गेली. त्यामुळे कमीतकमी लॉजिस्टिकचा वापर करून सहजपणे झालेली उड्डाणं करता आली. तीनही संरक्षण दल सेवांचे प्रतिनिधी या उड्डाण चाचण्यांसाठी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अभ्यास’ च्या विकासात्मक चाचण्या पूर्य केल्याबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संरक्षण क्षेत्राचे कौतुक केले. चाचण्यांचे यशस्वी होणे हे शास्त्रज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील समन्वयाची साक्ष देते असे ते म्हणाले.
संरक्षण आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी चाचण्यांशी संबंधित पथकांचे अभिनंदन केले. या प्रणालीत प्रचंड निर्यात क्षमता असून ती किफायतशीर असल्याचे कामत यांनी सांगितले.
आराधना जोशी
(पीआयबीच्या इनपुट्सह)